Adani Group Makes Big Profit For LIC Earns 3347 Crores : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीसाठी सोमवारचा दिवस चांगला ठरला आहे. त्याला कारण म्हणजे गौतम अदाणी यांचा अदाणी समूह आहे. अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये १९ टक्क्यांनी वाढ झाल्याने एलआयसीला ३,४४७ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनेलने आपल्या अहवालात अदाणी समूहाला दिलासा दिला आहे. त्यामुळे अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
एलआयसीला झाला असा फायदा
अदाणी एंटरप्रायझेस १८.८४ टक्क्यांच्या वाढीसह अव्वल ठरला. ३१ मार्च २०२३ पर्यंत LIC ची कंपनीत ४.२६ टक्के हिस्सेदारी आहे. अदाणी पोर्ट्समध्ये ६.०३ टक्के वाढ झाली. विमा कंपनीचा आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत ९.१२ टक्के हिस्सा होता. अदाणी ट्रान्समिशन, अदाणी टोटल गॅस आणि अदाणी ग्रीन एनर्जी यांचेही अपर सर्किट ५ टक्क्यांनी घसरले. २२ मे रोजी अंबुजा सिमेंट आणि ACC ने देखील अनुक्रमे ५ टक्के आणि ४.९३ टक्क्यांची उसळी घेतली. एलआयसीने ३१ मार्च २०२३ पर्यंत कंपन्यांमध्ये १ टक्क्यांहून अधिक हिस्सा घेतला होता. यामुळे अदाणी शेअर्समधील LIC च्या शेअर्सचे बाजार मूल्य १९ मे रोजी ३९,८७८.६८ कोटी रुपयांवरून २२ मे रोजी ४३,३२५.३९ कोटी रुपये झाले.
एलआयसीच्या शेअर्समध्येही २ टक्क्यांहून अधिक वाढ
दुसरीकडे एलआयसीच्या शेअर्समध्येही २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एलआयसीच्या शेअर्समध्ये २.१९ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानंतर कंपनीचा शेअर ५७७.३० रुपयांवर बंद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचा शेअर आज ५६७.२५ रुपयांवर उघडला. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर ५७९.२५ रुपयांवर पोहोचला. तसेच कंपनीचा शेअर शुक्रवारी ५६४.९५ रुपयांवर बंद झाला होता.
हेही वाचाः टाटा समूहाने रचला नवा विक्रम; वर्षभरात १० लाख कोटी रुपये कमावले