मुंबई : विद्यमान आठवड्यात कंपन्यांच्या सुरू होणारा कमाईचा हंगाम आणि अर्थव्यवस्थेविषयक आकडेवारी प्रसिद्ध होणार असल्याने त्या आधी गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिले. परिणामी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने सकाळच्या सत्रातील तेजी गमावली आणि किरकोळ वाढीसह स्थिरावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३०.९९ अंशांनी वधारून ७१,३८६.२१ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ६८०.२५ अंशांची कमाई करत ७२,०३५.४७ या दिवसभरातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे निफ्टीनेही तेजी गमावली. निफ्टी दिवसअखेर ३१.८५ अंशांनी वाढून २१,५४४.८५ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने २११.४५ अंशांची भर घालत २१,७२४.४५ ही पातळी गाठली होती.

उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मागणीमुळे अमेरिकी भांडवली बाजारात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग तेजीत आहेत. देशांतर्गत आघाडीवर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांवर त्याचे सकारात्मक परिणाम उमटले. दुसरीकडे अमेरिकेतील महागाईच्या संभाव्य नरमाईने आगामी काळात व्याजदर कपातीच्या अपेक्षांना चालना मिळालेली आहे. मात्र आशियाई बाजारातील संमिश्र संकेतांमुळे तसेच उच्च मूल्यांकनाच्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, सन फार्मा आणि टाटा स्टील या कंपन्यांचे समभाग वधारले. तर दुसरीकडे, नेस्ले, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेच्या समभागात घसरण झाली.

बाजार – आकडेवारी

सेन्सेक्स – ७१,३८६.२१, ३०.९९ ( ०.०४)
निफ्टी – २१,५४४.८५, ३१.८५ ( ०.१५)
डॉलर – ८३.११, -३
तेल – ७७.४३, १.७२