Stock Market Closing On 19 January 2024: गेल्या तीन दिवसांच्या घसरणीनंतर शुक्रवारच्या व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली. एफएमसीजी, आयटी आणि ऊर्जा समभागांमध्ये खरेदीमुळे शेअर बाजारात तेजी दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमधील खरेदीमुळेही बाजारात उत्साह वाढला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स ४९७ अंकांच्या उसळीसह ७१,६८३ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६० अंकांच्या उसळीसह २१,६२२ अंकांवर बंद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BSE बाजार भांडवलामध्ये मोठी झेप

शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसईच्या बाजारमूल्यात मोठी उसळी आली आहे. आज बाजार बंद होताना बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे बाजारमूल्य ३७३.६५ लाख रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील सत्रात ३६९.७५ लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

हेही वाचाः RBIने ‘या’ पाच बँकांना ठोठावला ५० लाखांहून अधिकचा दंड, गुजरातच्या दोन बँकांचा समावेश, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज भारती एअरटेलच्या समभागांनी शुक्रवारी इंट्राडे ट्रेडमध्ये बीएसईवर ५ टक्क्यांच्या वाढीसह १,१३६ रुपयांच्या नवीन शिखर गाठले. तसेच टायटन, अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, इन्फोसिस आणि आयटीसीसह एचसीएल टेकचे शेअर्स वाढीसह बंद झाले. दुसरीकडे बँकिंग शेअर्समध्ये आज पुन्हा घसरण झाली. आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँक व्यतिरिक्त बीएसई सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेली इंडसइंड बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक घसरणीत बंद झाली.

एचडीएफसी बँकेचे समभाग सलग तिसऱ्या दिवशी घसरले

एचडीएफसी बँकेचे शेअर्स जे गेल्या दोन दिवसांत खूप घसरले होते, आज सुरुवातीच्या व्यवहारात वाढ नोंदवली. मात्र, नंतर बँकेचे शेअर्स पुन्हा लाल चिन्हावर परतले. शेवटी तो १.०८ टक्क्यांनी म्हणजेच १६.१० रुपयांनी कमी होऊन १४७०.७० वर बंद झाला.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After three days of decline the stock market has now recovered increasing the wealth of investors by rs 4 lakh crore vrd
Show comments