First Republic Bank : जागतिक बँकिंग संकट दिवसागणिक वाढत असून, अमेरिकेतील आणखी एक बँक बंद पडली आहे. प्रदीर्घ काळापासून रोखीच्या तुटवड्याचा सामना करत असलेली फर्स्ट रिपब्लिक बँक बंद करण्यात आली आहे. तसेच जे पी मॉर्गन आता फर्स्ट रिपब्लिक बँकेची संपत्ती ताब्यात घेणार आहे. फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या मालमत्तेचा बराचसा भाग विकत घेतला असून, बँकेचे काही दायित्वही आले आहेत, अशी माहिती जे पी मॉर्गन चेस अँड कंपनीने मंगळवारी दिली.
जे पी मॉर्गन फर्स्ट रिपब्लिक बँकेची सर्व संपत्ती ताब्यात घेतली असून, विमा नसलेल्या ठेवींशिवाय सर्व ठेवींवर ताबा मिळवला आहे, असंही कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे. फर्स्ट रिपब्लिक बँक ही प्रादेशिक बँक आहे. कॅलिफोर्निया नियामकाने अमेरिकन फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन(FDIC )ला बँकेचा रिसिव्हर म्हणून नियुक्त केले. FDIC द्वारे ठेवींचा विमा लागू मर्यादेच्या अधीन असल्याचंही डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने त्यांच्या विधानात म्हटले आहे. जेव्हा नियामकांना फर्स्ट रिपब्लिक बँक वाचवण्याची शक्यता दिसली नाही, तसेच खासगी क्षेत्राच्या पाठिंब्यानंतरही कोणताही करार होऊ शकला नाही, तेव्हा त्यांनी फर्स्ट रिपब्लिक बँक जे पी मॉर्गन चेसला देण्यावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचाः उरले फक्त ३ दिवस; लवकरात लवकर करा हे काम पूर्ण अन्यथा पेन्शन…
संकटामुळे इतर बँका फर्स्ट रिपब्लिक बँकेत अधिक गुंतवणूक करण्यास तयार नव्हत्या. पण बँकेचा लिलाव झाल्यास ऑफर देण्यास या बँका उत्सुक दिसत होत्या. मार्च महिन्यात ११ बँकांनी फर्स्ट रिपब्लिक बँकेत ३० अब्ज डॉलर जमा करून संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये जेपी मॉर्गन चेस, सिटीग्रुप, बँक ऑफ अमेरिका, वेल्स फार्गो, गोलेमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅनले यांचा समावेश आहे. या अधिग्रहणानंतर जे पी मॉर्गन अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकांमध्ये सामील होईल. १३ एप्रिल २०२३ पर्यंत फर्स्ट रिपब्लिक बँकेची एकूण संपत्ती २२९.१ अब्ज डॉलर आहे आणि बँकेची एकूण ठेव १०३.९ अब्ज डॉलर आहे. PNC फायनान्शिअल सर्व्हिसेस ग्रुप, JP Morgan Chase & Co, Citizens Financial Group व्यतिरिक्त फर्स्ट रिपब्लिक बँकेसाठी अंतिम बोली लावणाऱ्या बँकांमध्ये समाविष्ट होत्या.