आदित्य बिर्ला सन लाइफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालासुब्रमणियन हे गेली ३० वर्षे म्हणजे १९९४ पासून म्युच्युअल फंड उद्योगाशी जोडले गेलेले नाव आहे.

बाला सरांच्या कारकीर्दीची सुरुवात जीआयसी म्युच्युअल फंड, कॅन बँक फायनान्स सर्व्हिसेस आणि पंडित ॲण्ड कंपनी यांच्याकडे झाली. १९८९ ते १९९४ अशी तेथे ५ वर्षे पूर्ण केल्यानंतर ते आदित्य बिर्ला समूहाकडे १९९४ ला आले. गेली ३० वर्षे या संस्थेशी आणि म्युच्युअल फंडाची शिखर संस्था ‘ॲम्फी’ या दोन संस्थांशी कायमस्वरूपी जोडले गेलेले हे नाव आहे. २००६ ते २००९ ते या फंड घराण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर २००९ मध्ये या पदाबरोबरच ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकसुद्धा झाले.

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ

हेही वाचा…‘मलेशिअन डेव्हलपमेंट बरहाद’ : घोटाळ्यांचा बाप! (भाग १)

बंगळुरू येथे इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट आणि हावर्ड बिझनेस स्कूल या ठिकाणी त्यांनी ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केले. उल्लेखनीय म्हणजे ते गणित या विषयातले पदवीधर आहेत. ग्लोबल नेक्स्ट युनिव्हर्सिटी या संस्थेतून त्यांनी एमबीएची पदवी मिळविली आहे.

साहजिकच ते म्युच्युअल फंड उद्योगाविषयी, या उद्योगातल्या अडचणींसंबंधी जेव्हा बोलतात, लिहितात किंवा मुलाखती देतात त्या वेळेस म्युच्युअल फंड हा विषय त्यांच्या रक्तात भिनलेला आहे, असे जाणवते. यामुळेच म्युच्युअल फंडाची शिखर संस्था ‘ॲम्फी’मध्येदेखील एकामागोमाग एक वरच्या जागा त्यांना मिळाल्या. २००९ पासून ते ‘ॲम्फी’चे बोर्ड मेंबर आहेत. २०१५-१६ या आर्थिक वर्षात ‘ॲम्फी’चे उपाध्यक्ष तर त्यानंतर दोन वेळा ॲम्फीचे अध्यक्ष होण्याचा त्यांना मान मिळाला. २०१६ ते २०१८ आणि २०२१ ते २०२३ या ठिकाणी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्या संपूर्ण कामाचा आढावा एका लेखात घेता येणार नाही. परंतु तरीसुद्धा म्युच्युअल फंड उद्योग वाढवण्यासाठी ॲम्फीने मार्च २०१७ ला ‘म्युच्युअल फंड सही है’ ही प्रचार मोहीम राबवली. या मोहिमेद्वारे अनेक संकल्पना यशस्वीपणे सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचल्या. आणि म्युच्युअल फंड हा एक विश्वसनीय प्रकार आहे. हे गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी पूर्ण केली.

हेही वाचा…माझा पोर्टफोलियो : ‘पोर्टफोलिओ’ला देई पोलादी ताकद ! रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड

या ठिकाणी म्युच्युअल फंडाची संस्था ॲम्फी आणि सेबी या दोन संस्थांचे एकमेकांशी असलेले नाते स्पष्ट केले पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मराठीत ‘तुझं माझं पटेना, तुझ्याविना करमेना’ असा प्रकार घडतो. म्युच्युअल फंडांना जास्तीत जास्त सवलती हव्या असतात, तर सेबीला म्युच्युअल फंडाना जास्तीत जास्त नियमामध्ये कसे बांधता येईल याचे प्रयत्न करावे लागतात. यामुळे बऱ्याच वेळा संघर्ष होण्याची शक्यता असते.

म्युच्युअल फंड वितरकांना असे वाटते की, ‘ॲम्फी’ने आपली बाजू घ्यावी. कारण जेव्हा म्युच्युअल फंड वितरकांचे मेळावे घेतले जातात. त्या वेळेस ‘तुम्ही तर आमच्या व्यवसायातील भागीदार’, अशी गोंडस वाक्ये वापरली जातात. म्युच्युअल फंडाचे उत्पादन म्हणजे म्युच्युअल फंडाच्या योजना होय. त्या योजना गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी वितरक आवश्यक असतो. परंतु काही वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात. उत्पादन करणाऱ्या कंपन्यांबाबत उत्पादित केलेली वस्तू तिच्यात काही दोष वितरण झाल्यानंतर आढळला. उदाहरणार्थ, एखाद्या वाहनाचा एखादा सुटा भाग योग्य नाही असे आढळले तर कंपन्या जाहिरात करून त्या काळातले उत्पादन परत मागवतात. मग हाच नियम वेगवेगळ्या योजना आणणाऱ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांनासुद्धा लागू केला जावा. आणि त्यांनी आपले उत्पादन परत घ्यावे. परंतु असे कधीही या व्यवसायात होणार नाही. आम्ही योग्य वेळी योग्य उत्पादन आणले, असे उत्पादक सांगणार. उत्पादन विक्रीस आणले म्हणून वितरकांनी विकले, असे वितरक सांगणार. ज्या गुंतवणूकदारांवर नव्या उत्पादनाचे प्रयोग होतात त्यांना जर फटके बसले तर वाक्य ठरलेले, छापलेले असते. ते वाक्य म्हणजे – ‘म्युच्युअल फंडस् आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क.’ यामुळे सेबीने फक्त ॲम्फीला बरोबर घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी म्युच्युअल फंड वितरकांची बाजू समजून घेतली तर म्युच्युअल फंड तळागाळात पोहोचू शकेल.

हेही वाचा…बदलत्या बाजाराचे लाभार्थी; ‘एफएमसीजी’मधील गुंतवणूक संधी

मार्च २०१७ ला ‘म्युच्युअल फंड सही है’ ही मोहीम राबवली गेली. त्याचबरोबर ‘वितरक जरूरी है’ हे वाक्य जोडले असते तर ते चांगले झाले असते, हेही सांगावेसे वाटते. २०१३ ला ‘डिरेक्ट’ हा प्रकार अस्तित्वात आल्यानंतर, ११ वर्षे झाली तरी तो पर्याय मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकला नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे. बाला सरांनी जून २०१७ ला ॲम्फी आणि सेबी या दोन संस्थांना एकत्र आणून एक मोठा मेळावा आयोजित केला. सेबीचे तत्कालीन अध्यक्ष अजित त्यागी प्रमुख अतिथी होते, तर अनिल अंबानी या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे होते. म्युच्युअल फंड उद्योग १०० लाख कोटी रुपयांपर्यंत कसा पोहोचू शकेल या विषयावर सखोल विश्लेषण, चर्चा झाल्या. त्या वेळी तरी निदान वितरकांच्या भूमिकेच्या मुद्द्याची दखल घेतली जायला हवी होती.

ज्या ज्या वेळेस परदेशी गुंतवणूक संस्था आपल्या बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात, त्या त्या वेळेस पूर्वी बाजार कोसळायचा. परंतु भांडवल बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले की, छोटे गुंतवणूकदार बाजाराशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी नियमित गुंतवणूक योजनांद्वारे गुंतवणुकीचा प्रवाह चालू ठेवला आणि त्यामुळे बाजार सावरू शकला. म्युच्युअल फंडाबद्दलचा विश्वास आणि बाला सरांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले.

हेही वाचा…क… कमॉडिटीचा : हवामान वायद्यासाठी ‘सेबी’ने तत्परता दाखवावी

गुंतवणूकदारांमध्ये आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांबद्दल नाराजीची भावना निर्माण झालेली आहे. ती दूर करण्याचा प्रयत्न या पुढील काळात बाला सरांकडूनच झाला पाहिजे. ही छोट्या गुंतवणूकदारांची मागणी आहे. या अगोदरच्या काळात या फंड घराण्याने गुंतवणूकदारांना भरभरून दिलेले आहे.

हेही वाचा…पाच सत्रातील तेजीला खिंडार; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ला सहा शतकी झळ

भारतीय शेअर बाजार १४९ वर्षांचा झाला आहे. या वर्षी तो १५० व्या वर्षात पदार्पण करेल. बाजाराइतकीच जुनी संकल्पना म्हणजे डिव्हिडंड यील्ड. २००३ ला बिर्लाने प्रथम म्युच्युअल फंड प्रकारात आणली. म्युच्युअल फंडांना कॉपीराइट हा कायदा नसल्याने अनेक फंड्स या संकल्पनेवर आधारलेल्या योजना घेऊन आले. काही फंड्स बिर्लापेक्षा फार पुढे निघून गेले. असे अनेक योजनांबाबत सांगता येईल. अलायन्स म्युच्युअल फंडाच्या योजना बिर्लाकडे आल्या. वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत एसआयपी चालू ठेवा आणि मासिक हप्त्याच्या १०० पट विमा संरक्षण विनामूल्य घ्या, असा प्रचार करून आणलेल्या योजना बिर्ला, आयसीआयसीआय आणि निप्पॉन यांना चालू ठेवता आल्या असत्या. परंतु सेबीकडे आपली बाजू योग्य प्रकारे मांडण्यात हे तिन्ही म्युच्युअल फंड यशस्वी झाले नाहीत. ज्या योजना अगोदरपासून अस्तित्वात होत्या. ज्या योजनांमध्ये गुंतवणूकदार विमा संरक्षण मिळण्यासाठी विम्याचा हप्ता भरत होता. त्या योजनाही बंद झाल्या. त्याच्या विरोधात प्रयत्न झाले नाहीत हा एक काळा अध्यायच.