-अजय वाळिंबे

गेल्याच वर्षांत ‘आयपीओ’द्वारे शेअर बाजारात प्रवेश केलेली इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड ही एक सहल आयोजन क्षेत्रात कार्यरत कंपनी असून ‘इजमायट्रिप’ या प्रमुख ब्रँडअंतर्गत प्रवासाशी संबंधित उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी प्रस्तुत करते. कंपनी विमान तिकिटे, हॉटेल्स आणि हॉलिडे पॅकेजेस, रेल्वे तिकिटे, बस तिकिटे आणि टॅक्सी तसेच प्रवास विमा, व्हिसा प्रक्रिया आणि स्थानिक स्तरावर फिरण्यासाठी आकर्षक ठिकाणांची तिकिटे यासारख्या अतिरिक्त मूल्यवर्धित सेवांसह इत्थंभूत सहल आयोजनाची सेवादेखील पुरवते. इझी ट्रिप प्लॅनर्स ही भारतातील ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलमध्ये सर्वात वेगाने वाढणारी, दुसरी सर्वात मोठी आणि एकमेव फायदेशीर कंपनी आहे.

कंपनीचे भारतात सर्वात मोठे ६०,००० ट्रॅव्हल एजंटचे जाळे असून कंपनीच्या बी२सी, बी२ई आणि बी२बी२सी अशा तीन वितरण वाहिन्या आहेत. कंपनीचा सध्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त व्यवसाय बी२सी आहे तर उर्वरित ट्रॅव्हल एजंट किंवा कॉर्पोरेट व्यवसाय आहेत. आपल्या व्यवसायवृद्धीसाठी ईझी ट्रिपने अनेक अधिग्रहणे आणि भागीदाऱ्या केल्या आहेत. यात प्रामुख्याने स्प्री हॉस्पिटॅलिटी (४५ मालमत्तांसह) आणि योलो बस (प्रीमियम इंटरसिटी बस मोबिलिटी प्लॅटफॉर्म) यांचे अधिग्रहण, तर जस्ट डायल बरोबरीनेच, स्पाइसजेट आणि फ्लायबिग या दोन प्रवासी विमान सेवा कंपन्यांबरोबर भागीदारी यांचा समावेश आहे. याशिवाय कंपनीने नुटाना एव्हिएशन कॅपिटलमध्ये ७५ टक्के हिस्सा घेतला आहे. ही कंपनी भारत आणि परदेशातील ग्राहकांना चार्टर विमानांसंबंधी सेवा देते तसेच कंपनीने शेअर स्वॅप डीलमध्ये इको हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समधील ५१ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. कंपनीने लुधियाना, जालंधर, दिल्ली आणि आग्रा येथे नवीन फ्रँचायझी दालने उघडून उत्तर भारतात आपली उपस्थिती वाढवली असून कंपनीचे दुबई कार्यालयदेखील झपाट्याने वाढत आहे.

Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…
prime minister internship scheme
‘PM Internship Scheme’ काय आहे? योजनेसाठी पात्रता काय? बेरोजगार तरुणांना या योजनेचा कसा मिळणार लाभ?
Jet Airways Air Service Industry Employment of employees
जेट एअरवेज: उदय-अस्ताचा ३२ वर्षांचा प्रवास

हेही वाचा…वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष

कंपनीच्या तीन प्रमुख सेवा असल्या तरीही तिचा बहुतांश महसूल (९९.८ टक्के) एअरलाइन पॅकेजमधून आहे, ज्यात रेल्वे तिकिटे, बस तिकिटे, टॅक्सी भाडे आणि आनुषंगिक मूल्यवर्धित सेवांचादेखील समावेश आहे. आपल्या सेवा विस्तारण्यासाठी कंपनीने ड्यू डिजिटल ग्लोबलच्या सहकार्याने व्हिसा, पासपोर्ट आणि केवायसी संबंधित प्रक्रिया इ. नवीन सेवा पुरवणे सुरू केले आहे. याखेरीज कंपनीने भारतातील सर्वोत्कृष्ट सर्व-इलेक्ट्रिक राइड-हेलिंग सेवा आणि ईव्ही चार्जिंग सुपरहब ब्लू स्मार्ट ऑपरेटरसोबत हातमिळवणी केली आहे. सध्या, बेंगळूरु आणि दिल्ली (एनसीआर) या क्षेत्रात तिने कार्य सुरू केले आहे.

गेल्याच वर्षांत प्रति शेअर १८५ रुपये अधिमूल्याने (दर्शनी मूल्य २) कंपनीचा ‘आयपीओ’ आला होता आणि त्याला उत्तम प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर कंपनीने आपली शेअर्सचे विभाजन करून त्याचे दर्शनी मूल्य प्रति शेअर एक रुपया केले आहे. कंपनीचे २०२३-२४ या वर्षीचे आर्थिक निकाल लवकरच जाहीर होतील. डिसेंबर २०२३ पर्यंतचे आकडे पाहिले तर कंपनीने पहिल्या नऊ महिन्यांत ४३७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ११९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळाली असून ‘देखो मेरा देश’सारखे उपक्रम देशांतर्गत प्रवासाची मागणी वाढवत आहेत. बहुतांशी नवीन पिढी हल्ली पर्यटनासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करते. महत्त्वाचे म्हणजे ईझी ट्रिप प्लॅनर्ससारख्या कंपन्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्यवसाय करत असल्याने त्यांचा मार्केटिंगवर फारच कमी खर्च असतो. पर्यटनाबरोबरच कंपनीने विमा तसेच इतर अनेक संलग्न क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्याचे फायदे आगामी काळात दिसतीलच. सध्या ४५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून आकर्षक वाटतो.

हेही वाचा…बाजार रंग : पोर्टफोलिओचा डाव मांडताना….

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजार भावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

वेबसाइट: http://www.easemytrip.com

प्रवर्तक: निशांत पिट्टी

बाजारभाव: रु. ४५ /-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम

भरणा झालेले भाग भांडवल: रु. १७७.२० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६४.३०

परदेशी गुंतवणूकदार २.२८

बँकस्/ म्यूचुअल फंडस्/ सरकार २.३५

इतर/ जनता ३१.१६

पुस्तकी मूल्य: रु. ३.४६

दर्शनी मूल्य: रु. १ /-

गतवर्षीचा लाभांश: -%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ०.९५

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४८

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१९

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४७.६

इंट्रेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ५६.८३

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : ५४.५७

बीटा: ०.७

बाजार भांडवल: रु. ८०३१ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ५४/३७

हेही वाचा…क… कमोडिटीजचा : सोन्याचा ‘गाझा’वाजा

stocksandwealth@gmail.com
-प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.

-हा गुंतवणूक सल्ला नाही.

-लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.