लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीए सरकारला अपेक्षित बहुमत न मिळाल्याने मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४३९० अंकांनी घसरून ७२०७९ अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी १३७९ अंकांनी घसरून २१८८४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सवर सर्वाधिक परिणाम झाला. याबरोबरच गौतम अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २१ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली. मंगळवारी शेअर बाजाराच्या कमकुवत कामकाजामुळे बँक निफ्टी निर्देशांक सुमारे ८ टक्क्यांनी घसरला, तर निफ्टीचा मिडकॅप १०० देखील सुमारे आठ टक्क्यांनी घसरला. BSE स्मॉल कॅप निर्देशांक सात टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

कोरोना संकटानंतरची सर्वात मोठी घसरण

मंगळवारी निवडणूक निकालाच्या दिवशी शेअर बाजाराला कोरोना संकटानंतर एका दिवसातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. दिवसाच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स एकदा ६१०० अंकांनी घसरला आणि ७०,३०० च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. तसेच राष्ट्रीय शेअर बाजारच्या निफ्टीनेही दुपारी १२ वाजताच्या सुमारास २१२८५ चा नीचांक गाठला होता. मंगळवारी शेअर बाजाराच्या कामकाजात ८० टक्के कंपन्यांचे समभाग घसरले.

Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
RBI rate cut delay will lead to more growth sacrifice
रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीस विलंब केल्यास विकासवेग मंदावेल; फेब्रुवारीमध्ये पाव टक्का कपात अपेक्षित 
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
Why Market is Falling Today
Why Market is Falling Today: शेअर बाजार आज का कोसळला? जाणून घ्या तीन कारणे…
Why FIIs are selling
Stock Market Crash: १० दिवसांमध्ये FII’s नी २२,२५९ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स का विकले? वाचा ६ कारणे…
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक

हेही वाचाः नवे सरकार येण्यापूर्वीच गुंतवणूकदारांचे ३९ लाख कोटी बुडाले, ४ वर्षांनंतर पहिल्यांदाच बाजारात एवढी घसरण

मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण होऊनही हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, हिरो मोटोकॉर्प, नेस्ले इंडिया, टाटा कंझ्युमर, सिप्ला आणि टीसीएस यांच्या समभागांनी वाढ नोंदवली, तर अदाणी पोर्ट्स २१ टक्के, अदाणी एंटरप्रायझेस २० टक्के, ओएनजीसी १७ टक्क्यांनी घसरले. एनटीपीसी १५ टक्क्यांनी घसरले, कोल इंडिया १४ टक्क्यांनी खाली आले आणि लार्सन अँड टुब्रो १३ टक्क्यांनी घसरले.

दिवसभराच्या कामकाजात बँक निफ्टी निर्देशांकात मोठी घसरण नोंदवण्यात आली. दुपारी १२ वाजता बँक निफ्टी निर्देशांक ४६०७० अंकांच्या नीचांकी पातळीवर गेला होता. मंगळवारी शेअर बाजारात पीएसयू, रेल्वे आणि संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. BHEL चे समभाग २१ टक्क्यांनी घसरले, तर कंटेनर कॉर्पोरेशन, भारत इलेक्ट्रॉनिक्स, BEML लिमिटेड, टिटागड रेल्वेचे समभाग टॅक्स मेको रेल, माझगाव डॉक, इरकॉन इंटरनॅशनल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि गेल इंडिया लिमिटेडचे ​​समभाग सुमारे २० टक्क्यांनी घसरले.

Story img Loader