प्रमोद पुराणिक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
म्युच्युअल फंड उद्योगात वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची माणसे आहेत. वर्षानुवर्षे एकाच कंपनीमध्ये निवृत्त होईपर्यंत नोकरी करणारे अनेक नोकरदार असतात. परंतु सर्वसाधारणपणे खासगी कंपन्यांतील पर्सोनेल मॅनेजर दोन, पाच वर्षांपेक्षा जास्त एका कंपनीत नोकरी करत नाही. अर्थातच अपवाद असू शकतो. म्युच्युअल फंडाच्या क्षेत्रात आशीष सोमय्या यांनी वेगवेगळ्या प्रकारची कामे केलेली आहेत. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडात ते कंपनीचा रिटेल व्यवसाय सांभाळत होते. त्यानंतर ते भारती अक्सा या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडे मे २००७ ते ऑक्टोबर २००८ अशी दीड वर्षे झोनल हेड म्हणून काम सांभाळत होते. त्यानंतर मोतीलाल ओसवाल या कंपनीच्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. एकूण २० वर्षांचा म्युच्युअल फंडांच्या क्षेत्रात काम करण्याचा त्यांना अनुभव. आता आशीष सोमय्या हे सध्या व्हाइट ओक म्युच्युअल फंड या नवीन फंड घराण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.मोतीलाल ओसवालला चांगली कामगिरी करीत असताना, अचानक एक दिवस प्रसारमाध्यमांनी बातमी दिली. आशीष सोमय्यांनी मोतीलाल ओसवाल सोडली आणि ते व्हाइट ओक म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्याचे वृत्त आले.
व्हाइट ओक या म्युच्युअल फंडाबद्दल काही माहिती देणे आवश्यक आहे. या फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत खेमका हे अगोदर गोल्डमन सॅक्स या ठिकाणी नोकरीला होते. त्यांचा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसचा चांगला अभ्यास असून त्यांनी त्यात अत्यंत चांगले नैपुण्य मिळवले आहे. येस बँकेने सुरू केलेला येस म्युच्युअल फंड हा व्हाइट ओक म्युच्युअल फंडाने खरेदी केला. त्यानंतर मग व्हाइट ओकने वेगवेगळ्या योजना आणण्यास सुरुवात केली. योजनांपेक्षा म्युच्युअल फंडातील माणसं एकत्र करण्यावर लक्ष केंद्रित केलेले असल्याने त्याविषयी जास्त माहिती करून घेणे आवश्यक आहे.आशीष सोमय्या यांचा अगोदरच्या अनुभवाचा व्हाइट ओकला चांगला उपयोग झाला. आजसुद्धा वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांमध्ये येणारा पैसा हा म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरमार्फत येतो. कितीही वेगळे प्रयत्न झाले तरी गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड दोघांना जोडणारा हा दुवा किंवा साखळी कायम राहील.
हेही वाचा >>>Money Mantra : मार्ग सुबत्तेचा दूरदृष्टीचे ‘ॲसेट ॲलोकेशन’
आशीष सोमय्या यांचा वेगवेगळ्या म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरशी असलेला संबंधाचा उपयोग झाला. व्हाइट ओक म्युच्युअल फंड नवीन असला तरी त्याचा विस्तार होण्यास सुरुवात झाली. मुख्यत्वे हा व्यवसाय असा आहे की, वर्षानुवर्षे व्यावसायिक संबंध निर्माण करावे लागतात. त्यातूनच व्यवसाय वाढीला मदत होते. एकामागोमाग एक नवनवीन म्युच्युअल फंडस नवीन नवीन योजना घेऊन बाजारात येऊ लागले आहेत. त्यामुळे बाजारात मोठे फंडस्, छोटे फंडस् डिस्ट्रिब्युटर्सवर अवलंबून असलेले म्युच्युअल फंडस् ज्यांच्या परिवारात एखादी दुसरी बँक आहे. म्हणून बँकेचा वापर करून मोठे होण्याचे प्रयत्न करणारे म्युच्युअल फंड असे खूप प्रकार आढळून येतील. सामान्य गुंतवणूकदार या सर्व प्रकारांना धीराने तोंड देत आहेत. त्यांचे कौतुक करायलाच हवे.
आशीष सोमय्या यांनी संपूर्ण भारतात दौरे सुरू केले आहेत. ठिकठिकाणी जाऊन गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणे, म्युच्युअल फंडस् डिस्ट्रिब्युटर्सच्या भेटीगाठी घेणे यामुळे आपल्या ओळखीचा माणूस नवीन फंडस् बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे, त्याला साथ दिली पाहिजे या विचारानेसुद्धा व्हाइट ओक म्युच्युअल फंडाला नवनवीन डिस्ट्रिब्युटर्स मिळत गेले आहेत. एकत्र आणण्याचे हे काम आशीष सोमय्यांनी चांगल्या प्रकारे केले. नवीन फंडाबद्दल सुरुवातीला विश्वास निर्माण करण्याचे काम करावे लागते. निधी येण्याची सुरुवात नंतर होते. आशीष सोमय्या यशस्वी का होऊ शकले याचे आणखी एक कारण म्हणजे मोतीलाल ओसवालने गावोगाव बोल्ट, टर्मिनल सुरू केलेले आहेत. त्यामुळे शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोतीलाल ओसवालची मदत झाली तशीच ती मदत आशीष सोमय्या यांनासुद्धा झाली. शिक्षण आणि अनुभव दोन्ही घटक त्यांच्या मदतीसाठी योग्य ठरले. वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांचा अनुभव नवीन प्रयोग करण्यास उपयुक्त ठरला. अनेक नवीन वितरकांना आशीष सोमय्या आपला एक मित्र आहे असे वाटते. त्यांचाही चांगला उपयोग होतो. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी या ठिकाणी त्यांनी एमबीए फायनान्स ही पदवी १९९८ ते २००० या दोन वर्षांत मिळवली. त्याअगोदर ते पॉलिमार सायन्समध्ये १९९३ ते १९९७ या ४ वर्षांत बी टेक झाले. आणि त्यानंतर मग बाजाराशी संबंध आला तो आजपर्यत कायम आहे. बाजारात वादळे निर्माण होत असतात. त्याची तयारी ठेवा हे त्यांचे मुख्य सांगणे असते. कधी कधी एकरकमी गुंतवणुकीवर जोर द्यावा लागतो, तर कधी कधी एखाद्या योजनेबाबत फक्त ‘एसआयपी’ याच पद्धतीचा वापर करता येईल, असेही या फंडाकडून सांगितले जाते. त्यामुळे झटपट मोठे होण्यासाठी हा फंड बाजारात आलेला नाही, या सांगण्यावर विश्वास बसू लागतो. जर तीन, पाच वर्षे गुंतवणूक ठेवायची तयारी असेल तर एकरकमी गुंतवणूक करण्यास घाबरू नका, असेही त्यांचे सांगणे असते. या ठिकाणी नवीन म्युच्युअल फंड योजनांना भेडसावणाऱ्या समस्या या विषयीसुद्धा थोडा विचार होणे आवश्यक आहे. विशेषत: सेबीने अतिशय व्यवस्थितपणे योजनांची विभागणी केली आणि ज्या गुंतवणूकदारांची एखाद्या ठिकाणी जास्त गुंतवणूक आहे. त्यांच्या गुंतवणुकीची विभागणी ही गुंतवणूक सल्लागारांच्या मदतीने करता येते.
हेही वाचा >>>Money Mantra : सीआरबी घोटाळा (भाग २)
उद्योगजगतात छोट्या उद्योगांच्या आणि मोठ्या उद्योगांच्या वेगवेगळ्या संघटना असतात. म्युच्युअल फंड उद्योगात मात्र सर्वांचे प्रतिनिधित्व करणारी एकच संस्था आहे. आणखी एक संस्था निर्माण करावी असा विचार काही वेळा छोट्या फंडाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या डोक्यात निर्माण होत असतो. कार्यकारी अधिकाऱ्याला दिवसभरात वेगवेगळ्या अटीमुळे, नियमांमुळे दिवसभर वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या कराव्या लागतात. म्हणून सेबीचे काही नियम छोट्या फंडांना त्रासदायक ठरतात. म्युच्युअल फंडाच्या क्षेत्रात छोटा म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर अनाथ असतो. त्याच्या काय अडचणी असतात हे समजून घेण्याचा प्रयत्न सेबी, ॲम्फी या संस्थांकडून पुरेसा झालेला नाही हे खेदाने नमूद करावे लागते. बँकांच्या शाखा त्यांच्याकडे गुंतवणूकदारांची आर्थिक आकडेवारी उपलब्ध असते. त्याचा उपयोग योजना गळ्यात मारण्याच्या कामासाठी केला जातो. काही वेळा म्युच्युअल फंड योजनांमध्ये मोठी गुंतवणूक डिस्ट्रिब्युटरमार्फत करण्याअगोदर गुंतवणूकदाराला धनादेशाची माहिती बँकेत द्यावी लागते ही पद्धत चुकीची आहे. ती बंद व्हायला पाहिजे. तरच म्युच्युअल फंड्स आणखी वेगाने वाढू शकतील .