एखाद्या छोट्याशा गावाचे जेव्हा मोठ्या शहरात रुपांतर होत असते तेव्हा गावातील चांगल्या-वाईट बातम्यांची खडान् खडा माहिती गावातील सर्व लोकांना असायची; पण गावाच्या कक्षा रुंदावत गेल्या तसे या बातम्यांना मर्यादा येत गेल्या. त्या बातमीतील आपुलकीचा ओलावादेखील लुप्त होत गेला. आता चांगल्या-वाईट गोष्टींकडे ‘घटना’ म्हणून बघितले जाते. त्या वाईट गोष्टींची व्याप्ती मोजून ती मामुली की विपरीत हादसा हे ठरविले जाते. तसेच काहीसे आता निफ्टीबद्दल घडत आहे. मार्चअखेरीस १६,८०० चा स्तर निफ्टी राखणार की तोडणार अशी परिस्थिती होती. पुढे अवघ्या दोन-तीन महिन्यांत निफ्टीने कक्षा रुंदावत १८,००० ची वेस ओलांडली आणि हा निर्देशांक १८,७७७ वर झेपावला. या १६,८०० पर्यंतची गावाची वेसच आताच १८,७७७ पर्यंत रुंदावली. भविष्यातील २०,००० ते २१,००० च्या महानगरात तिचे रुपांतर होत असताना, अध्येमध्ये वाईट गोष्टींमुळे येणारी, निफ्टी निर्देशांकावर येणारी दोनशे-पाचशे अंशांची घसरण म्हणजे ‘बडे बडे शहरों मे छोटे छोटे हादसे’ स्वरुपातील म्हणायला हवी. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

 शुक्रवारचा बंद भाव:
सेन्सेक्स:६२,६२५.६३ / निफ्टी: १८,५६३.४०

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

निफ्टी निर्देशांकाच्या १६,८०० ते १८,७७७ पर्यंतच्या वाटचालीला चांगल्या रस्त्यावरील आरामदायी गाडीतील प्रवास खचितच म्हणता येणार नाही. या तीन महिन्यांतील वाटचालीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमेरिकेची आर्थिक विवंचना ज्यात महागाई, बँकबुडी, तसेच भारतातील कर्जावरील वाढते व्याजदर, पर्जन्यमानाबद्दल परस्परविरोधी भाकिते असे सर्व निराशाजनक वातावरण आसपास होते. तशात निफ्टी निर्देशांक आपल्या कक्षा रुंदावत असताना येणाऱ्या दिवसांतील या निर्देशांकावरील ‘छोट्या छोट्या हादशांची व्याप्ती आणि त्यांचा घात’ काय असेल याचा विस्तृत आढावा आज आपण घेऊ या.

हेही वाचा – माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलियोसाठी शेअर्स निवडताना : ‘बीटा’चे सांगणे

नुकतेच गुजरातला चक्रीवादळ येऊन गेले आणि आमच्या निफ्टीची चालदेखील वादळीच असते. तेव्हा वादळाच्या परिभाषेत निफ्टीची भविष्यकालीन वाटचाल रेखाटू या. सरलेल्या २० मार्च ते ३० मेपर्यंत निफ्टी निर्देशांकावर १,९७७ अंशांच्या तेजीचे वादळ घोंघावत होते. सध्या निफ्टी निर्देशांकावर ३१७ अंशाचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचा परीघ हा १८,४६० ते १८,७७७ असा आहे. जूनअखेरपर्यंत निफ्टी निर्देशांकाने १८,१०० ते १७,८०० चा स्तर राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १९,००० ते १९,२०० असेल. या स्तरावरून ५०० ते १,००० अंशांची घसरण गृहीत धरावी. या तेजीच्या वादळाचा केंद्रबिंदू निफ्टी निर्देशांकावर १७,५०० असून तो सप्टेंबर महिन्यापर्यंत राखला जायला हवा जे आव्हानात्मक भासते, कारण यात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक जगतातील निराशाजनक हादरे, भारतातील पर्जन्यमानाची वास्तविकता या छोट्या, छोट्या धक्क्यांना/ हादशांना निफ्टी निर्देशांक १७,५०० चा स्तर राखू शकल्यास भविष्यातील तेजीसाठी… वादल वारं सुटलं गं, तेजीचं २१,०००-२२,००० पर्यंतचे तुफान उठलं गं… म्हणायला हरकत नाही!      

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ संकल्पनेची

हल्ली कंपन्यांचे जे वित्तीय निकाल जाहीर होतात त्याबद्दल गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत असतात. कंपनीचा जाहीर झालेला तिमाही निकाल चांगला असतो, पण निकालापश्चात त्या कंपनीचा बाजारभाव भांडवली बाजारात कोसळतो, तर याच्या अगदी बरोबर उलट वित्तीय तिमाही निकाल निराशादायक, पण भांडवली बाजारात समभागाच्या भावात तेजी असेही घडते. मग खरं काय? यासाठी मूलभूत व तांत्रिक विश्लेषणातील महत्त्वाच्या संकल्पना एकत्र करून, त्यावर अभ्यास करून ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना विकसित केली गेली आहे. गुंतवणूकदारांनी फक्त एकच गोष्ट करायची, निकालापश्चात समभागाचा बाजारभाव ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ राखण्यात यशस्वी ठरल्यास, वित्तीय निकाल बाजारास पसंत आहे आणि लेखात नमूद केलेले वरचे लक्ष्य साध्य होणार हे गृहीत धरावे. या संकल्पनेमुळे गुंतवणूकदारांची संभ्रमावस्था दूर होण्यास मदत होईल.

या स्तंभातील ८ मेच्या लेखात वाहन उद्योगातील ‘टाटा मोटर्स’ समभागाचा निकालपूर्व आढावा घेतला होता. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख ही १२ मे होती. ५ मेचा बंद भाव ४७७ रुपये होता. निकालोत्तर ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ४५० रुपये होता. जर निकाल उत्कृष्ट असेल तर ४५० रुपयांचा स्तर राखत, ५२५ रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. १२ मेला जाहीर झालेला वित्तीय निकाल नितांतसुंदर असल्याने अवघ्या तीन दिवसांत लेखात नमूद केलेले ५२५ रुपयांचे वरचे लक्ष्य १५ मेला ५३७ रुपयांचा उच्चांक मारत साध्य केले गेले, अल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत १० टक्क्यांचा परतावा मिळविला. ग्यानबाची मेख म्हणजे गुंतवणूकदारांनी जोखीम असलेल्या वायदा बाजारात ज्यात ‘एफ अँण्ड ओ’ येते त्या तुलनेत ८ ते १५ मे हा सुवर्णकाळात (यात ‘टाइम व्हॅल्यू’ हा घटक महत्त्वाचा असतो) प्रति समभाग ४८ रुपयांचा फायदा (५२५-४७७ रु.) असा सरस निकालपूर्व विश्लेषणाच्या टिपणाचा आधार घेत कमावला. म्हणजेच  गुंतवणूकदारांना या वाहन उद्योगातील समभागाने ‘फरारी की सवारी’चा अनुभव मिळवून दिला म्हणायला हरकत नाही. आजही शुक्रवार, ९ जूनचा टाटा मोटर्स बंद भाव ५६२ रुपये आहे.  
(क्रमशः)

शिंपल्यातील मोती

ग्रेफाइट इंडिया लिमिटेड (शुक्रवार, ९ जूनचा भाव : ३७७.४० रु.)

ग्रीक भाषेत ‘ग्रेफाइट’ या शब्दाचा अर्थ लिखाण करणे. यात लहान मुलांच्या भविष्यापासून देशाचे भाग्याविधान लिहिण्यात या धातूचे महत्त्वाचे योगदान आहे. लहान मुलांच्या हातातील पेन्सिलपासून देशाच्या अणुभट्टीपर्यंत शिसे या धातूचे मोलाचे योगदान आहे. शिसे धातू उष्णता, वीज यांचा उत्तम वाहक असल्यामुळे बॅटरी, वीजवाहक तारा, फौंड्रीज अशा विविध उद्योगांमध्ये या धातूची मागणी आहे आणि १९६० पासून कार्बन इलेक्ट्रोड्स या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी ‘ग्रेफाइट इंडिया लिमिटेड’ हा समभाग आपला आजचा शिंपल्यातील मोती असणार आहे.

हेही वाचा – मे महिन्यात ‘इक्विटी’ फंडातील गुंतवणुकीत घसरण; पण ‘SIP’च्या माध्यमातून योगदान १४,७४८.६८ कोटींच्या विक्रमी पातळीवर

ग्रेफाइटच्या समभागाने आपल्या भोवती ४० रुपयांचा परीघ (बँण्ड) निर्माण केला असून, समभाग ३५० ते ३९० रुपयांमध्ये वाटचाल करत आहे. समभाग ४०० रुपयांवर १५ दिवस टिकल्यास, समभागात शाश्वत तेजी अपेक्षित असून भविष्यकालीन अल्प मुदतीचे वरचे लक्ष्य हे ४४०, ४८०, ६०० रुपये असेल, तर दीर्घ मुदतीचे लक्ष्य हे ८०० रुपये असेल. जेव्हा समभागात मंदी येईल तेव्हा ३६० ते ३५०च्या दरम्यान हा समभाग २० टक्क्यांच्या पाच तुकड्यांत प्रत्येक घसरणीत खरेदी करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला २९० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेलं आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader