Avalon Technologies IPO ची लिस्टिंग मंगळवारी (१८ एप्रिल) झाली. बीएसईवर ४३६ रुपये प्रति शेअरच्या इश्यू किमतीवर १.१५ टक्के सूटसह ४३१ रुपये प्रति शेअर या दराने सूचीबद्ध झाला. तर एनएसईवर ४३६ रुपये प्रति शेअरवर व्यापार करीत होता. Avalon Technologies ने IPO द्वारे ८६५ कोटी रुपये उभे केले आहेत. यामध्ये ३२० कोटी रुपयांच्या ताज्या इश्यूचा आणि ५४५ कोटी रुपयांच्या OFSचा समावेश आहे, ज्यामध्ये प्रवर्तक आणि इतर गुंतवणूकदारांनी शेअर्स विकले आहेत. हा IPO ३ ते ६ एप्रिलदरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला होता. त्याची किंमत ४१५-४३६ रुपये प्रति शेअर होती.

IPO लिस्टिंग

Avalon Technologies IPO ची लिस्टिंग NSE आणि BSE वर सकाळी १०:०० वाजता बाजार उघडल्यानंतर झाली. या स्टॉकच्या ओपनिंगचा अंदाज तज्ज्ञांनी आधीच वर्तवला होता.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ

२.३४ पट सबस्क्राइब झाला

Avalon Technologies चा IPO २.३४ पट सबस्क्राइब झाला. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेला कोटा ३.७७ पट, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ०.४३ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ०.८८ पट सदस्यता घेण्यात आला. IPO मध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ७५ टक्के, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १० टक्के कोटा ठेवण्यात आला होता.

हेही वाचाः आता तूर आणि उडीद डाळीचे भाव उतरणार; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

२४ अँकर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली

IPO पूर्वी कंपनीने २४ अँकर गुंतवणूकदारांकडून ३८९.२५ कोटी रुपये उभे केले आहेत. अँकर गुंतवणूकदारांमध्ये गोल्डमन सॅक्स फंड, एचडीएफसी लार्ज अँड मिडकॅप फंड, फ्रँकलिन इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड, व्हाईटओक कॅपिटल फंड, आयआयएफएल सिलेक्ट सीरीज II, महिंद्रा मॅन्युलाइफ फंड आणि नोमुरा इंडिया स्टॉक मदर फंड यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे.

हेही वाचाः वयाच्या २० व्या वर्षी कमावले १२०० कोटी; वर्षभरात कोट्यवधींची कंपनी स्थापन, कोण आहे आदित पालिचा?

एव्हलॉन टेक्नॉलॉजीज

Avalon Technologies ची स्थापना १९९९ मध्ये चेन्नई येथे झाली. ही एक EMS कंपनी आहे. कंपनी आपली उत्पादने देशांतर्गत बाजारपेठेत तसेच अमेरिका, चीन, नेदरलँड आणि जपानमध्ये विकते.