-प्रमोद पुराणिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उगवत्या सूर्याला सर्व जण नमस्कार करतात. परंतु एक वर्षापूर्वी ज्या व्यक्तीने एचडीएफसी म्युच्युअल फंड सोडण्याचा निर्णय घेतला आणि तेसुद्धा सर्व काही व्यवस्थित असताना. १९ वर्षे अत्यंत चांगल्या प्रकारे योजनांचे व्यवस्थापन करणारे प्रशांत जैन यांच्या कार्याचा आज धावता आढावा घेणार आहोत.

मे १९९१ला त्यावेळेस एसबीआय म्युच्युअल फंडामध्ये नोकरीला असलेल्या दिवंगत एन. श्रीराम यांनी प्रशांतना सांगितले, “क्षमस्व, बाकी सर्व जागांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, फक्त शेअर्स विश्लेषक या पदावर मी तुमची नियुक्ती करू शकतो.”

आणखी वाचा-माझा पोर्टफोलियो: विलीनीकरणातून सक्षमता, विशालता…

गुंतवणूक क्षेत्रात प्रशांतचा प्रवास सुरू झाला. बी. टेक. आणि एम.बी.ए. झालेल्या प्रशांतना दर शेअर मिळकत गुणोत्तर, किंमत/ उत्पन्न गुणोत्तर, भांडवली गुंतवणुकीवर मिळणारा परतावा असे अनेक शब्द प्रथमच ऐकायला मिळाले, परंतु ते त्यांनी वेगाने आत्मसात केले.

प्रथम एसबीआय नंतर झुरीच, ट्वेंटिएथ सेंच्युरी, आयटीसी थ्रेट निडल आणि त्यानंतर शेवटी २००३ मध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंड हा त्यांनी केलेला प्रवास. योजनांची नावे बदलत गेली, फंडांची नावे बदलली, बाजारात बदल झाले. अपवाद फक्त एकच प्रशांत जैन यांनी एचडीएफसी प्रुडन्सनंतर बॅलन्स ॲडव्हान्टेज, एचडीएफसी टॅाप १०० फंड या योजनांचे व्यवस्थापन १९ वर्षे सातत्याने सांभाळण्याची विक्रमी कामगिरी केली आणि त्याचबरोबर सर्वात मोठा फंड, सर्वात जास्त कालखंड आणि सर्वात चांगली कामगिरी असे अनेक विक्रम करून दाखविले.

अशी व्यक्ती अचानकपणे मागील वर्षी जुलै महिन्यात एचडीएफसी म्युच्युअल फंड सोडण्याचा निर्णय जाहीर करते. त्यावेळेस बाजाराला, या क्षेत्रातील सर्वांना हा निर्णय धक्कादायक होता. सुरुवातीला अनेक वावड्या उठल्या आणि शेवटी महिनाभरातच प्रशांत जैन यांनी दुसऱ्या कोणत्याही म्युच्युअल फंडाकडे जाण्याऐवजी स्वतःची गुतंवणूक सेवा संस्था सुरू केली.

आणखी वाचा- बाजारातील माणसं : वाहन उद्योगाचा अनभिषिक्त प्रवक्ता : आर. सी. भार्गव

एचडीएफसी म्युच्यअल फंडाचे त्यावेळेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एचडीएफसी लिमिटेडमधून आलेले मिलिंद बर्वे निवृत्त होण्याच्या मार्गावर होते. म्युच्युअल फंडाकडे दोन महत्त्वाच्या, जबाबदारीच्या जागा असतात. एक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दुसरा गुंतवणुकीचा मुख्य अधिकारी. प्रशांतना मुख्य कार्यकारी अधिकारी होण्याची इच्छा अजिबात नव्हती, त्यामुळे बर्वे यांच्या पश्चात ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे एचडीएफसी एमएफने नवनीत मुनोत यांना मुख्य कार्यकारी पदावर घेतले. प्रशांत जैन यांच्या कामांची जबाबदारी चिराग सेटलवाल यांच्यावर टाकली. प्रशांत जैन एचडीएफसी म्युच्युअल फंडामधून निवृत्त झाले. अर्थातच आर्थिकदृष्ट्या अत्यंत भक्कम पायावर उभे असल्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची वर्षानुवर्षे डोक्यात असलेली इच्छा यापुढे पूर्ण करावी हा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे या पुढील काळात ते कशाप्रकारे आपले उद्दिष्ट पूर्ण करणार यावर लक्ष ठेवायचे.

प्रशांत जैन यांच्यासारखा आपल्या विचारसरणीशी ठाम असणारा फंड मॅनेजर होणे शक्य नाही. मूल्य (व्हॅल्यू) विरुद्ध भांडवलवृद्धी (ग्रोथ) हा बाजारातील एक सनातन संघर्ष आहे. प्रशांत जैन पहिल्या पद्धतीचे कट्टर पुरस्कर्ते होते. एचडीएफसी एमएफने सुद्धा त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. एक अत्यंत हट्टी फंड मॅनेजर असा त्यांचा लौकिक होता. परंतु शेवटी कोणताही माणूस संस्थेपेक्षा मोठा नसतो. बदलत्या परिस्थितीत वाढत्या स्पर्धेत एचडीएफसीला काही बदल, व्यवसायातील तडजोडी करणे आवश्यक झालेले होते. प्रशांत जैन यांना ‘इंडेक्स फंड’ मान्य नव्हते. काही वेळा योजनांची कामगिरी खराब झाल्याने गुंतवणूकदारांची नाराजी वाढू लागली होती. बदलत्या परिस्थितीत एचडीएफसी म्युच्यु्अल फंडाने प्रशांत जैन यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

भट्टाचार्य, मिलिंद बर्वे, प्रशांत जैन ही एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे नेतृत्व करणारी मंडळी निवृत्त झाली. या सर्वांची कारकीर्द ही एचडीएफसी म्युच्युअल फंडासाठी झळाळता कालावधी कसा होता याचा धावता आढावा आपण घेतला. पुढील सोमवारी नव्या व्यवस्थापनाने काय बदल केले यांचे अवलोकन आणि त्याचबरोबर उद्याचा एचडीएफसी म्युच्युअल फंड कसा राहील, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू. शेवटी ‘बाजारातील माणसं’ संस्था कशा चालवायच्या याचे निर्णय घेत असतात म्हणून त्यांच्या शैलीचा अभ्यास आवश्यक असतो.

pramodpuranik5@gmail.com