अजय वाळिंबे

नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (बीएसई कोड ५३२२३४)

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त

प्रवर्तक : भारत सरकार

बाजारभाव: रु. ७७/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : अलुमिना/ ॲल्युमिनियम/मायनिंग

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ९१८.३२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ४७.४९

परदेशी गुंतवणूकदार १९.४४

बँक/ म्यु. फंड/ सरकार २२.८२

इतर/ जनता १०.२५

पुस्तकी मूल्य : रु. ७०.७

दर्शनी मूल्य : रु. ५/-

गतवर्षीचा लाभांश : १३०%

प्रतिसमभाग उत्पन्न : रु. १३.८

पी/ई गुणोत्तर : ५.६

समग्र पी/ई गुणोत्तर : १६.६

डेट इक्विटी गुणोत्तर : नगण्य

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १२८

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : ३४ %

बीटा : १.२

बाजार भांडवल : रु. १४,१२३ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १३३/६७

सरकारी कंपन्यांपैकी ज्या काही यशस्वी कंपन्या आहेत त्यात नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (नाल्को) या १९८१ मध्ये स्थापन झालेल्या ‘नवरत्न’ कंपनीचा समावेश करावा लागेल. नाल्को देशातील बॉक्साइट-ॲल्युमिना-ॲल्युमिनियम- वीजनिर्मिती अशा सर्वात मोठ्या एकात्मिक प्रकल्प चालविणाऱ्या कंपन्यांपैकी एक असून कंपनीने गेल्या ३५ वर्षांपासून (व्यावसायिक उत्पन्न सुरू केल्यापासून) सतत नफा कमावला आहे. कंपनी ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील दमनजोडी येथील पिट हेड ॲल्युमिना रिफायनरी आणि त्याच राज्यातील अंगुल येथील ॲल्युमिनियम स्मेल्टर आणि कॅप्टिव्ह वीजनिर्मिती प्रकल्पासाठी तिच्या कॅप्टिव्ह पंचपतमाली बॉक्साइट खाणी चालवत आहे. हरित उपक्रमाचा एक भाग म्हणून, नाल्कोने कार्बन न्यूट्रॅलिटीसाठी हातमिळवणी करण्यासाठी भारतातील विविध ठिकाणी १९८ मेगावाॅट क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प आणि ८०० किलोवाॅट क्षमतेचे छतावरील सौर वीज प्रकल्प स्थापित केले आहेत. जागतिक कोविड-१९ ची साथ असूनही, कंपनीने १४,१८१ कोटींचा आतापर्यंतचा सर्वोच्च विक्री महसूल आणि रु. २,९५२ कोटींचा सर्वाधिक नफा नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ४.६ लाख टन पूर्ण क्षमतेचे उत्पादन केले आहे. तसेच आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ७५.११ लाख टन बॉक्साइट उत्पादनदेखील साध्य केले आहे.

कंपनीकडे वार्षिक ६८.२५ लाख टन क्षमतेची बॉक्साइट खाण आणि २१ लाख टन वार्षिक उत्पादन क्षमतेची (सामान्य क्षमता) ॲल्युमिना रिफायनरी आहे. तसेच वार्षिक ४.६० लाख टन क्षमतेची ॲल्युमिनियम स्मेल्टर आणि १२,००० मेगावाॅटचे कॅप्टिव्ह वीजनिर्मिती प्रकल्प अंगुल, ओडिशा येथे आहेत. कंपनीची दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई येथे प्रादेशिक विक्री कार्यालये आहेत आणि देशांतर्गत ग्राहकांच्या सोयीसाठी देशातील विविध ठिकाणी आठ ऑपरेटिंग स्टॉकयार्ड आहेत. याशिवाय, उत्पादनांच्या निर्यातीसाठी नाल्कोची स्वतःची बल्क शिपमेंट सुविधा आहे. उत्पादन क्षमता वापर, तंत्रज्ञान, गुणवत्ता, निर्यात कामगिरी आणि सातत्यपूर्ण नफा करणारी नाल्को ही भारताच्या औद्योगिक क्षमतेचे उज्ज्वल उदाहरण आहे. लंडन मेटल एक्स्चेंजवर (एलएमई) नोंदणीसह मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करणारी नाल्को ही देशातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या नाल्कोची सप्टेंबर २०२२ साठी संपणारी तिमाही मात्र फारशी चांगली नव्हती. या कालावधीत कंपनीने ३,४८९.५७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर केवळ १२५.४३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच काळाच्या तुलनेत तो तब्बल ८३ टक्क्यांनी घसरला आहे. तर ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या सहामाहीसाठी कंपनीने ७,४०५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर, ३७ टक्क्यांची घट नोंदवत केवळ ६८३ कोटी रुपयांचा (गेल्या वर्षीच्या सहमाहीत १,०९५ कोटी) नक्त नफा कमावला आहे. जागतिक बाजारपेठेत ॲल्युमिनियमच्या घसरलेल्या किमती, कॉस्टिक सोडयाची कमतरता तसेच कोळसा आणि ऊर्जा किमतीत झालेली वाढ ही त्याची प्रमुख कारणे आहेत. मात्र लवकरच उत्कल (ओडिशा) येथील कोळशाचे उत्पादन तसेच गुजरात अल्कलीच्या संयुक्त विद्यमाने कॉस्टिक सोडा उत्पादन सुरू होईल. चीनमधील बदलती परिस्थिती आणि जागतिक बाजारपेठेत ॲल्युमिनियमच्या किमतीत वाढ झाल्यास कंपनीच्या उलाढालीत आणि नफ्यात भरीव वाढ होईल. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी कंपनीने गेल्या वर्षीइतकाच (१३० टक्के) लाभांश दिल्यास, सध्या ७८ रुपयांच्या आसपास असलेल्या या शेअरचा केवळ लाभांशरूपी परतावा (डिव्हिडंड यील्ड) ८.३३ टक्के होते. त्यामुळे एक सुरक्षित खरेदी तसेच भांडवली वृद्धीसाठी कुठलेही कर्ज नसलेला आणि सातत्याने लाभांश देणारा नाल्को आकर्षक वाटतो.

सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

अजय वाळिंबे / stocksandwealth@gmail.com

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.