टाटा मोटर्सने आपले डीव्हीआर शेअर्स सामान्य शेअर्समध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जून तिमाहीच्या निकालांनंतर मंगळवारी २५ जुलै रोजी ही घोषणा केली. डीव्हीआर शेअर्सना “ए’ ऑर्डिनरी शेअर्स” असेही म्हटले जाते. कंपनीच्या संचालक मंडळाने ‘A’ सामान्य समभाग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्या बदल्यात भागधारकांकडे असलेल्या प्रत्येक १० ‘A’ शेअर्ससाठी ७ सामान्य समभाग जारी करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. ‘A’ शेअर्समधील मतदानाचे अधिकार सामान्य शेअर्सच्या फक्त १/१० वा आहेत. तसेच ते लाभांशामध्ये सुमारे ५ टक्के अधिक रकमेचे हक्कदार आहेत.

हे शेअर्स BSE आणि NSE वर Tata Motors DVR म्हणून सूचिबद्ध आहेत. मात्र, या योजनेनंतर हे शेअर्स एक्सचेंजमधून डिलिस्ट केले जाणार आहेत. टाटा मोटर्सने २००८ मध्ये पहिल्यांदा ‘A’ सामान्य शेअर्स म्हणजेच DVR शेअर्स जारी केले होते. हे शेअर्स नंतर २०१० मध्ये QIP आणि २०१५ मध्ये राइट्स इश्यूद्वारे पुन्हा जारी करण्यात आले. तेव्हापासून नियमांमधील बदलांमुळे असे समभाग जारी करण्यावर बंदी घातली गेली आणि असे समभाग जारी करणारी टाटा मोटर्स ही एकमेव सूचिबद्ध कंपनी ठरली आहे.

bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
Nearly 90000 Honda Elevate Suvs Sold Since Launch, See This Details Honda Elevate Suvs price details
वर्षभरात तब्बल ९० हजार ग्राहकांनी खरेदी केली होंडाची ‘ही’ एसयूव्ही कार; जाणून घ्या काय आहे एवढं खास
Lumax Auto Technology Limited
माझा पोर्टफोलियो : वाहन उद्योगाचा भक्कम कणा

हेही वाचाः आतापर्यंत २००० रुपयांच्या किती नोटा परत आल्या? सरकारने संसदेत दिली मोठी माहिती

सध्या टाटा मोटर्सचे डीव्हीआर शेअर्स टाटा मोटर्सच्या शेअर्सच्या तुलनेत सुमारे ४३ टक्के डिस्काऊंटवर व्यापार करीत आहेत. टाटा मोटर्सचा डीव्हीआर मंगळवारी ४.२९ टक्क्यांनी वाढून ३७३ रुपयांवर बंद झाला. दुसरीकडे टाटा मोटर्सचे शेअर्स जवळपास २ टक्क्यांनी वाढून ६४१.८० रुपयांवर बंद झाले. टाटा मोटर्सने सांगितले की, या योजनेमुळे त्यांचे एकूण इक्विटी शेअर्स ४.२ टक्क्यांनी कमी होतील, ज्यामुळे ते सर्व भागधारकांसाठी अधिक मूल्य निर्माण करणारा पर्याय ठरू शकतील.

हेही वाचाः बँकांकडे ५,७२९ कोटींची दावा न केलेली रक्कम; तुमचे पैसे तर नाहीत ना, कसा दावा करणार?

DVR म्हणजे काय?

DVR म्हणजे विभेदक मतदान हक्क (differential voting rights). हे देखील एक सामान्य शेअर सारखे आहे, परंतु शेअरहोल्डरला त्यात कमी मतदानाचे अधिकार आहेत. कमी झालेल्या मतदानाच्या अधिकारांमुळे कंपनी मतदानाचा हक्क न गमावता हे शेअर्स जारी करून पैसे उभारू शकते. त्यामुळे कंपनीला निधी मिळणे सोपे होते. तसेच ओपन ऑफर्स किंवा सक्तीच्या खरेदीची भीती नाही. मतदानाचा हक्क गमावल्याच्या बदल्यात या भागधारकांना सामान्य समभागांपेक्षा ५ टक्के जास्त लाभांश मिळतो.

Story img Loader