OLA Electric IPO : ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या आयपीओसाठी बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे आणि आता त्यासंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. Ola Electric च्या IPO साठी डायरेक्ट हेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट्स (DRHP) या महिन्यात दाखल केला जाऊ शकतो. ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ पुढील वर्षी बाजारात येऊ शकतो. हा IPO नवीन इक्विटी शेअर्स तसेच ऑफर फॉर सेल शेअर्सचे संयोजन असेल. या वर्षी ऑक्टोबर २०२३ मध्ये कंपनीने इक्विटी आणि कर्जाच्या माध्यमातून ३२०० कोटी रुपये उभारले आहेत.

वाहन उत्पादकाचा IPO २० वर्षांनी भारतात येणार

ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओच्या बातम्यांवरील संभ्रमावस्था आता संपताना पाहायला मिळत आहे आणि असे मानले जाते की, त्याचा आयपीओ २०२४ च्या सुरुवातीला बाजारात प्रवेश येण्याची शक्यता आहे. भारतातील कोणत्याही ऑटोमोबाईल उत्पादक कंपनीचा हा IPO जवळपास २० वर्षांनंतर बाजारात येणार आहे. याआधी २००३ मध्ये शेवटच्या वेळी मारुती सुझुकीचा (तेव्हाचा मारुती उद्योग) IPO होता, ज्याने भारतीय शेअर बाजारात प्रवेश केला होता.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
Sale of fake oil Bhiwandi, fake oil Bhiwandi,
ठाणे : ब्रँडचे नाव वापरून बनावट तेलाची विक्री
Success Story kalyani and dinesh Engineer couple
Success Story: इंजिनिअर जोडप्याने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; वर्षाला कमावतात करोडो रुपये
employee provident fund atm withdrawl
एटीएममधून काढता येणार पीएफ खात्यातील पैसे? ‘EPFO ​​3.0’ नक्की काय आहे?
Lumax Auto Technology Limited
माझा पोर्टफोलियो : वाहन उद्योगाचा भक्कम कणा
Congress led UDF accuses Kerala government of increasing electricity bills for Adani  benefit
अदानींच्या फायद्यासाठी वीजबिलात वाढ; काँग्रेसप्रणीत ‘यूडीएफ’चा केरळ सरकारवर आरोप

हेही वाचाः Money Mantra : ५ कोटींचा निधी कसा तयार करायचा? निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा अडीच लाख रुपये मिळणार

ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओचा आकार १ अब्ज डॉलर एवढा असेल. कंपनीने वेळोवेळी दिलेल्या माहितीनुसार, ओला इलेक्ट्रिकचा IPO ८५०० कोटी रुपये किंवा १ अब्ज डॉलर्सचा असणार आहे. देशातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीचा हा पहिला IPO असेल. या ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा आयपीओ १ अब्ज डॉलर्सच्या देशातील टॉप १५ IPO मध्ये समाविष्ट केला जाणार आहे.

ओलाने स्वतःची पब्लिक लिमिटेड कंपनी बनवली

इलेक्ट्रिक वाहन कंपनी ओला इलेक्ट्रिकने देखील IPO च्या तयारीचा एक भाग म्हणून मोठा बदल केला आहे. बदलानंतर ओला इलेक्ट्रिक ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहिली नसून आता तिने स्वतःचे पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतर केले आहे. यानंतर ओला इलेक्ट्रिकचे अधिकृत नावही बदलले आहे. पूर्वी कंपनीचे नाव ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड होते, जे बदलून ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड असे करण्यात आले आहे.

हेही वाचाः Money Mantra : अवघ्या १५० रुपयांच्या बचतीतून खिशात २२ लाख ७० हजार ५९२ रुपये जमा होणार, पण कसे? जाणून घ्या

ओला इलेक्ट्रिकमध्ये कॉर्पोरेट पुनर्रचना झाली

ओला इलेक्ट्रिकने नोव्हेंबर २०२३ मध्ये शेअर बाजारांना प्रायव्हेट लिमिटेडमधून पब्लिक लिमिटेड कंपनीत बदलण्याबाबत माहिती दिली होती. ओला इलेक्ट्रिकचे मालक भाविश अग्रवाल यांनी हे काम कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग अंतर्गत केले आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांची काय आहे योजना?

भाविश अग्रवाल यांनी जुलैमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ यंदा आणला जाऊ शकतो. ओला इलेक्ट्रिक स्कूटरला मिळालेला चांगला प्रतिसाद आणि उत्कृष्ट विक्रीचे आकडे त्यांनी याचे कारण सांगितले. भाविश अग्रवाल यांनी २०२३ च्या अखेरीस मोटारसायकल लॉन्च करण्याच्या आणि २०२४ मध्ये बॅटरीवर चालणारी कार बाजारात आणण्याच्या योजनेबद्दल सांगितले होते. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही.

कंपनीचा ७०० मिलियन डॉलर एवढा निधी उभारण्याचा मानस

मिळालेल्या माहितीनुसार, ओलाने २०२३-२५ या वर्षातील विक्रीचे लक्ष्य अर्ध्यावर आणले आहे. ओलाच्या आर्थिक दस्तऐवजांतून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने नफा मिळविण्यासाठी अंतिम मुदत देखील बदलली आहे. २०२३-२४ या वर्षासाठी कंपनीचा विक्री अंदाज ६६ टक्क्यांनी कमी झाला आहे. कागदपत्रांनुसार, ओला इलेक्ट्रिकने नफा देणारी कंपनी बनण्याचे आपले लक्ष्य आता एक वर्ष पुढे ढकलले आहे, म्हणजेच हे लक्ष्य २०२४-२५ पर्यंत गाठले जाण्याची शक्यता आहे. तसेच या आयपीओच्या माध्यमातून कंपनीचा ७०० मिलियन डॉलर एवढा निधी उभारण्याचा मानस आहे.

रॉयटर्सने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत दस्तऐवजात चालू आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी ओला इलेक्ट्रिकचे महसूल लक्ष्य आता ५९१ दशलक्ष डॉलर आहे, तर पूर्वीचे लक्ष्य १.५५ अब्ज डॉलर होते. मे २०२३ मध्ये भारत सरकारने कोणतेही स्पष्टीकरण न देता ई-स्कूटर खरेदीदारांसाठी विद्यमान रोख प्रोत्साहन कमी केले होते. ओला इलेक्ट्रिकला आगामी काळात आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता असून, महसुलाचे लक्ष्य सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाले आहे.

ओला इलेक्ट्रिक व्यवसाय

ओला इलेक्ट्रिक प्रामुख्याने इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या क्षेत्रात काम करते आणि पुढील वर्षी बॅटरीवर चालणाऱ्या कारसह इलेक्ट्रिक पॅसेंजर कार विभागात प्रवेश करण्याची तयारी करत आहे.

Story img Loader