आजच्या लेखाचा विषय वाचून तुम्ही म्हणाल की, वेगळे पान उघडले का? पण जे बॉलीवूड किंवा फिल्मी जगताकडे वित्तीय केंद्र म्हणून पाहतात त्यांच्यासाठी हा विषय काही नवीन नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरकारसाठी देखील हा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण आपण जेव्हा चित्रपट बघायला जातो तेव्हा आपसूकच सरकारला भरपूर कर देखील देऊन जातो. भारतातील वित्त आणि अर्थ जगत बॉलीवूडच्या डोळ्यांनी पाहायचे तर अक्षरशः डोळे दिपून जातील. त्यात प्रादेशिक, वेबसीरिज किंवा जाहिरातीचे विश्व गृहीत धरले तर कितीतरी पटीने वित्तीय प्रभाव वाढेल. उगाचच देशभरातील तरुण मंडळी तिकडे आकर्षित होत नाहीत! एका अंदाजानुसार, हे सर्व सर्जनशील चित्रपट निर्मिती उद्योग मिळून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कमीतकमी २० लाख लोकांना रोजगार देते आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आता फक्त भारतातच त्याचा प्रभाव राहिला नसून जगभरातील लोक विशेषतः भारतीय लोकसुद्धा त्याला अर्थसाहाय्य करतात. विचार करा पूर्वी सिल्वर ज्युबिलीला महत्त्व होते. आता चित्रपट किती दिवस चालला याला महत्त्व राहिले नसून किती गल्ला गोळा केला यावर त्याचे यश ठरवले जाते. निर्माते देखील त्यांचे हक्क विकून बराचसा खर्च आधीच वसूल करतात. तारे-तारकासुद्धा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी देवाचा धावा करतात, त्याचे मुख्य कारण त्यात लागलेला बराचसा पैसा असतो.

चित्रपट व्यवसाय गेल्या काही वर्षात जास्त मोठा झाला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, देशात वाढते मध्यमवर्गीयांचे प्रमाण. कुठले चित्रपटगृह बंद पडले आणि त्याजागी अजून काहीतरी सुरू झाले असे क्वचितच ऐकिवात येते. कुठलाही चित्रपट सुरू करायचा असल्यास त्यासाठी सुमारे ६५ परवानग्या घ्याव्या लागतात, म्हणून फार काही परदेशी चित्रपटांचे चित्रीकरण भारतात होत नाही. अर्थात सरकारचे त्यावर काम सुरू असून प्रोत्साहनाचे धोरण आखते आहे. चांगल्या चित्रपटांचे चित्रीकरण म्हणजे तेथील पर्यटनाला चालना देणे. वेगवेगळे देश आपल्या देशामध्ये चित्रपटांचे चित्रीकरण व्हावे म्हणून करांमध्ये मोठ्या प्रमाणात सवलती देतात. फिल्मी जगताचा वित्तीय दृष्टीने महत्त्वाचा दोष म्हणजे फिल्म यशस्वी होण्यासाठी कित्येक लोक मेहेनत घेतात. पण त्याचा मोबदला मात्र ठरावीक लोकांनाच जास्त मिळतो. याला वित्तीय भाषेत उपयुक्ततेची साखळी असे म्हणतात आणि त्याचा विरोधाभास इकडे अधिक निदर्शनास येतो.

pakistan google search indian movie 1
भारतीय चित्रपट व वेब सीरिजचं पाकिस्तानला वेड; बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे सीमेपल्याड ठरले सुपरहिट, पाहा यादी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Pushpa 2 News Marathi
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ मधल्या ‘या’ आडनावावरुन करणी सेना आक्रमक, निर्मात्यांना थेट घरात घुसून मारण्याचा इशारा
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य
banking amendment bill 2024 benefits banking rules
RBI Rules: तुम्ही आता बँक अकाउंटमध्ये जोडू शकता चार नॉमिनी; केंद्र सरकारचा नवीन नियम काय सांगतो? वाचा…

काहीही असो शेवटी पिढ्यानपिढ्या बॉलीवूडचे आकर्षण काही कमी होत नाही आणि होण्याची शक्यता देखील नाही. रामोजी फिल्म सिटीमुळे हैदराबादच्या अर्थकारणावर बराच फरक पडला आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यामध्ये बॉलीवूडचे मोठे योगदान आहे.

आशीष थत्ते
@AshishThatte
ashishpthatte@gmail.com

Story img Loader