आजच्या लेखाचा विषय वाचून तुम्ही म्हणाल की, वेगळे पान उघडले का? पण जे बॉलीवूड किंवा फिल्मी जगताकडे वित्तीय केंद्र म्हणून पाहतात त्यांच्यासाठी हा विषय काही नवीन नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरकारसाठी देखील हा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण आपण जेव्हा चित्रपट बघायला जातो तेव्हा आपसूकच सरकारला भरपूर कर देखील देऊन जातो. भारतातील वित्त आणि अर्थ जगत बॉलीवूडच्या डोळ्यांनी पाहायचे तर अक्षरशः डोळे दिपून जातील. त्यात प्रादेशिक, वेबसीरिज किंवा जाहिरातीचे विश्व गृहीत धरले तर कितीतरी पटीने वित्तीय प्रभाव वाढेल. उगाचच देशभरातील तरुण मंडळी तिकडे आकर्षित होत नाहीत! एका अंदाजानुसार, हे सर्व सर्जनशील चित्रपट निर्मिती उद्योग मिळून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कमीतकमी २० लाख लोकांना रोजगार देते आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आता फक्त भारतातच त्याचा प्रभाव राहिला नसून जगभरातील लोक विशेषतः भारतीय लोकसुद्धा त्याला अर्थसाहाय्य करतात. विचार करा पूर्वी सिल्वर ज्युबिलीला महत्त्व होते. आता चित्रपट किती दिवस चालला याला महत्त्व राहिले नसून किती गल्ला गोळा केला यावर त्याचे यश ठरवले जाते. निर्माते देखील त्यांचे हक्क विकून बराचसा खर्च आधीच वसूल करतात. तारे-तारकासुद्धा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी देवाचा धावा करतात, त्याचे मुख्य कारण त्यात लागलेला बराचसा पैसा असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा