मुंबई: देशातील बड्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांच्या शेअर्समधील तेजी आणि एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या दिग्गज शेअर्समध्ये झालेल्या खरेदीने मंगळवारी सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी दमदार वाढ साधली. मात्र सोमवारप्रमाणेच शेअर बाजारावर अस्थिरतेचे गहिरे सावट दिसून आले.

सत्रारंभ वाढीसह आणि अल्पावधीत सुरू झालेल्या नाट्यमय विक्रीच्या लाटेतून सोमवारी बाजारात मोठा रक्तपात घडून आला. वाढत्या अस्थिरतेदरम्यान आघाडीच्या निर्देशांकांनी सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर लोळण घेतली. एक्सचेंजकडून उपलब्ध तपशिलानुसार, या पडझडीतून गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे तब्बल साडेसात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारीही दुपारच्या सत्रात उच्चांकापासून ३०० अंश खाली ७५,९४७.६९ पर्यंत घरंगळलेला सेन्सेक्स पाहता, सोमवारच्याच पडझडीची पुनरावृत्ती दिसेल अशी भीती होती. मात्र दुपारी खुल्या झालेल्या युरोपीय बाजारातील तेजी पाहता निर्देशांकांनी चढती भाजणी कायम राखत, उच्चांक पातळीवरच दिवसाला निरोप दिला. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स ५६६.६३ अंशांनी वाढून ७६,४०४.९९ वर स्थिरावला; तर निफ्टी १३०.७० अंशांनी वाढून २३,१५५.३५ वर स्थिरावला. सेन्सेक्स पाऊण टक्क्यांनी, तर निफ्टी ०.५७ टक्क्यांनी वधारला.

Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
Big concern over rupee falling to 86 against dollar
डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता;  परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका

‘एआय’ला ट्रम्प चालना

मंगळवारी उशीरा, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचा मानस व्यक्त केला. ओपनएआय, सॉफ्टबँक आणि ओरॅकल या कंपन्यांसह संयुक्तपणे स्टारगेट नावाचा उपक्रम स्थापन करण्याचे आणि एआय पायाभूत सुविधांमध्ये ५०० अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणुकीच्या त्यांच्या या घोषणेचे जगभरात स्वागतपर प्रतिसाद उमटले. स्थानिक शेअर बाजारात विप्रो, टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्र हे प्रामुख्याने आघाडीचे आयटी क्षेत्रातील शेअर्स चांगलेच वधारले. निफ्टी आयटी Nifty IT निर्देशांक दमदार २.१४ टक्क्यांनी वधारला. त्या उलट बीईएल, ट्रेंट, टाटा मोटर्स, अदानी एंटरप्रायझेस आणि एनटीपीसी हे शेअर्स पिछाडीवर राहिले. स्टेट बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील सलगपणे सुरू राहिलेल्या विक्रीमुळे निर्देशांकांतील वाढीवर मर्यादा आणल्या. निफ्टी पीएसयू बँक Nifty PSU Bank निर्देशांक १.०१ टक्क्यांनी घसरला, तर त्या उलट खासगी क्षेत्रातील बँकांचे प्रतिनिधित्व करणारा निफ्टी प्रायव्हेट बँक Nifty Pvt Bank निर्देशांक जवळपास अर्धा टक्क्यांनी वधारला.

अर्थसंकल्पातील तरतुदींवर नजर

कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील कामगिरीनंतर, आता लक्ष भारताच्या आगामी अर्थसंकल्पाकडे वळेल, ज्याबाबत गुंतवणूकदारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्याने, सरकारी भांडवली खर्चात (Capex) वाढ, वित्तीय तुटीच्या (Fiscal Deficite) मर्यादेचे पालन आणि प्राप्तिकरात संभाव्य सवलती या अर्थसंकल्पाकडून प्रमुख अपेक्षा आहेत. कंपन्यांची मिळकत कामगिरी आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये मजबूतीची चिन्हे जोवर दिसत नाहीत तोपर्यंत परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांना (FII) आपल्या शेअर बाजारात खरेदीसाठी पुन्हा सरसावणार नाहीत, असे बीएनपी परिबाचे संशोधनप्रमुख कुणाल व्होरा म्हणाले.

वैयक्तिक किरकोळ गुंतवणूकदारांना तोटा कसा?

व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिड आणि स्मॉल-कॅप निर्देशांकांनी बाजाराती एकूण प्रवाहापासून फारकत घेत वेगळी वाट चोखाळली. सेन्सेक्स-निफ्टीत वाढ असताना, हे निर्देशांक मात्र अनुक्रमे १.५६ टक्के आणि १.२० टक्क्यांनी घसरले. या विभागातील शेअर्सचे मूल्यांकन हे ऐतिहासिक सरासरीपेक्षा खूप जास्त आहे, ज्यामुळे याच क्षेत्राला पुढील काळातही पडझडीचा मोठा फटका बसण्याच्या शक्यतेबाबत, विश्लेषकांना वारंवार इशारा दिला आहे. त्यामुळे मजबूत आर्थिक पाया आणि कमाईतील वाढ सुस्पष्टपणे दृश्यमान आहे अशाच शेअर्सवर लक्ष केंद्रित करण्याची तज्ज्ञांची शिफारस आहे. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांकांना सरलेल्या काही दिवसांत विक्रीच्या दबावाचा सामना करावा लागला आहे आणि याच विभागात सर्वाधिक शेअर्सची मालकी असलेल्या छोट्या वैयक्तिक गुंतवणूकदारांना बाजारातील पडझडीतून मोठे नुकसान होत असल्याचेही दिसून आले. मुंबई शेअर बाजारातील सुमारे १,११० शेअर्स वधारले, तर त्या तुलनेत घसरणाऱ्या शेअर्सची संख्या २,६७७ इतकी जास्त होती, हे आकडेच पुरेसे बोलके आहेत.

अमेरिकी बाजारात हर्षोल्हास

मंगळवारी वॉल स्ट्रीटचे अर्थात अमेरिकी बाजारांचे मुख्य निर्देशांकांत हर्षोल्हासाने उसळले. एस अँड पी ५०० (वाढ ०.८८%) आणि डाउ जोन्स (वाढ १.२४%) हे निर्देशांक महिन्याहून अधिक काळातील त्यांच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच टाकलेली पहिली काही आक्रमक पावले तेथील गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरली असल्याचे हे द्योतक आहे. ट्रम्प यांच्या निवडणुकीतील मोठ्या विजयाच्या निकालापासून अमेरिकी बाजार नवनव्या शिखर पातळ्या गाठत चालला आहे. युरोपीय बाजाराचा निर्देशांक स्टॉक्स ६०० STOXX 600 मंगळवारच्या सार्वकालिक उच्चांकावर व्यवहार करताना दिसून आला.

Story img Loader