जागतिक अर्थपटलावर उदासीनता, खिन्नता असताना एप्रिलपासून भारतीय भांडवली बाजारांनी वेगळी वाट चोखाळली आणि मंदीची कात टाकत, तेजीचा मार्ग अनुसरला. निर्देशांकांचा हा तेजीमय प्रवास म्हणजे आज अधिक मासात बहरला, २० हजारांचा मधुमास नवा! या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स : ६६,६८४.२६ / निफ्टी: १९,७४५.००

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

जेव्हा जेव्हा निर्देशांक नवीन उच्चांकाला गवसणी घालतो तेव्हा त्या तेजीबद्दलच शंका उपस्थित केल्या जातात… हा तेजीचा फुगा की शाश्वत तेजी, तेजीची झुळूक की शाश्वत तेजी अशी शीर्षक असलेले लेख या स्तंभातूनदेखील पूर्वी लिहिले गेले आहेत. त्या वेळेला त्या तेजीचा फायदा करून घ्या असे सुचविले गेले. कारण त्या तेजीचा कालावधी हा क्षणिक होता. आता परिस्थिती वेगळी आहे. या तेजीचे विस्तृतपणे विवेचन, त्याचे विविध पदर, कंगोरे समजून घेण्याची गरज आहे.

हेही वाचा – माझा पोर्टफोलियो: विलीनीकरणातून सक्षमता, विशालता…

दीर्घमुदतीच्या तेजीची गृहीतके

१) परदेशी गुंतवणूकदार संस्थांचे शल्य

२) भविष्यकालीन तेजीचे आलेखन (अ) २००३ ते २००७ या पाच वर्षांतील तेजीच्या काळातील निर्देशांकाचा आढावा (ब) लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर बाजारात येते तेजीची बहार हे गृहीतक

३) या तेजीच्या वाटचालीतील, निर्देशांकावरील संभाव्य घसरण

१) परदेशी गुंतवणूकदार संस्थाचे शल्य : निफ्टी निर्देशांकावर १६,८०० ते १९,९९० अशी ३,००० अंशांची तेजी ही केवळ आणि केवळ देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या अथक खेरीदीमुळे शक्य बनली आहे. निफ्टी निर्देशांकावर २०,०००च्या समीप १९,९९० असा नवीन उच्चांक दृष्टीपथात आला. या तेजीचे शिल्पकार आणि तिचे श्रेय हे सर्वस्वी भारतीय म्युच्युअल फंड, भविष्य निर्वाह निधी, भारतीय आयुर्विमा मंडळ यांना जाते. आता भविष्यात जेव्हा बाजारात घसरण होईल तेव्हा, या आकर्षक तेजीत आपण सहभागी न झाल्याचे शल्य हे परदेशी गुंतवणूकदार संस्थांना असल्याने ते भविष्यातील बाजारातील घसरण ही त्यांच्यासाठीची खरेदीची संधी असेल. त्यांची ही कृती घसरणाऱ्या बाजाराला / निर्देशांकाला भविष्यकालीन आधार देणारी असेल. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकानी आपल्या भोवती ३०० अंशांचा परीघ निर्माण केला आहे जसे की – १९,२००… १९,५००… १९,८००… २०,१०० आता चालू असलेल्या घसरणीत, निफ्टी निर्देशांकाला १९,६०० ते १९,५०० आणि द्वितीय आधार १९,२०० असेल. या स्तराचा आधार घेत निफ्टी निर्देशांक २०,१०० ते २०,४०० च्या स्तराला गवसणी घालेल.चार महिन्यांत ३,००० अंशांची भरीव अशी वाढ झाल्याने, भविष्यात १,५०० ते २,००० अंशांची जरी घसरण आली तरी, भविष्यात निफ्टी निर्देशांक नवनवीन शिखर सर करेल ते संभाव्य उच्चांक, तो साध्य होण्याचा कालावधी, या प्रक्रियेतील मंदीची व्याप्ती याचा आढावा या स्तंभात पुढील लेख शृंखलांमधून क्रमशः घेऊ या.

शिंपल्यातील मोती

टाटा स्टील लिमिटेड

(शुक्रवार, २१ जुलैचा भाव ११६.६० रु.) ऐंशीच्या दशकात एक जाहिरात झळकायची… समाजजीवनातील विविध क्षेत्रांत ज्यात शिक्षण, आरोग्य, क्रीडा, विविध क्षेत्रांतील संशोधन यात तर आमचा सहभाग आहेच. पण आम्ही स्टीलदेखील बनवतो (वूई आल्सो मेक स्टील), असा स्वातंत्र्यपूर्व काळापासून, स्वतंत्र भारताचा औद्योगिक पाया रचण्यात सिंहाचा वाटा असलेली टाटा उद्योगसमूहाची ध्वजाधारी कंपनी ‘टाटा स्टील’ हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे.

आताच्या घडीला आपण ज्या समभागाचा विचार करत आहोत तो अर्थव्यवस्थेत पायाभूत प्रकल्प, उद्योग, आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार चक्रात, अर्थव्यवस्था उर्जितावस्थेत आहे की ढेपाळलेली आहे त्याचे दिशानिर्देशन हा धातू करतो. समभागाची भांडवली बाजारातील वाटचाल पाहता, समभागाने आपल्या भोवती २० रुपयांचा परीघ (बॅण्ड) निर्माण केला असून समभागाची १०० ते १४० रुपयांमध्ये वाटचाल करत आहे. समभाग १२० रुपयांवर पंधरा दिवस टिकल्यास, समभागात शाश्वत तेजी अपेक्षित असून भविष्यकालीन अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य हे १४०-१६० रुपये असतील, तर दीर्घमुदतीचे लक्ष्य हे १८० ते २२० रुपये असेल. (अल्पमुदतीच्या वाटचालीसाठी निकालपूर्व विश्लेषणातील ‘टाटा स्टील लिमिटेड’च्या टाचणाचा आधार घ्यावा.) जेव्हा समभागात मंदी येईल तेव्हा ८० ते १०० रुपयांच्या दरम्यान हा समभाग २० टक्क्यांच्या पाच तुकड्यांत प्रत्येक घसरणीत खरेदी करावा. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला ७० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची नाही, पण जवळच्या नातेवाईकांची दीर्घमुदतीची गुंतवणूक आहे.

हेही वाचा – बाजारातील माणसं : मावळत्या दिनकरा- प्रशांत जैन

निकालपूर्व विश्लेषण

१) टाटा स्टील लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, २४ जुलै

२१ जुलैचा बंद भाव- ११६.६० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ११४ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ११४ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १२४ रुपये, द्वितीय लक्ष्य १३४ रुपये.

ब) निराशादायक निकाल : ११४ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १०८ रुपयांपर्यंत घसरण.

२) बजाज ऑटो लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार,२५ जुलै

२१ जुलैचा बंद भाव- ४,८६२.७० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ४,७७० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४,७७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४,९९० रुपये, द्वितीय लक्ष्य ५,१५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४,७७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४,५७० रुपयांपर्यंत घसरण.

३) केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेड.

तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २५ जुलै

२१ जुलैचा बंद भाव – १,०००.९० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,०१५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,०१५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,१०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,१६० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,०१५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८५० रुपयांपर्यंत घसरण.

४) टाटा मोटर्स लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २५ जुलै

२१ जुलैचा बंद भाव – ६२५.७५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ६०७ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६०७ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६५० रुपये, द्वितीय लक्ष्य ६७५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : ६०७ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५७५ रुपयांपर्यंत घसरण.

५) पंजाब नॅशनल बँक

तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २६ जुलै

२१ जुलैचा बंद भाव – ६२.६० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६५ रुपये, द्वितीय लक्ष्य ७४ रुपये.

ब) निराशादायक निकाल : ६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५५ रुपयांपर्यंत घसरण .

(लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.)

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader