अदाणी समूहाच्या अडचणी हळूहळू दूर होताना दिसत आहेत. आता BSE आणि NSE ने अदाणी समूहाच्या ३ कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. अदाणी समूहाच्या या तीन कंपन्या म्हणजे अदाणी टोटल गॅस लिमिटेड, अदाणी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्रत्यक्षात दोन्ही शेअर बाजारांनी अदाणी समूहाच्या या तीन कंपन्यांच्या शेअर्सवर पाळत ठेवली होती. या तिघांचे शेअर्स अतिरिक्त पाळत ठेवणे उपाय (Additional Surveillance Measures (ASM)) फ्रेमवर्कच्या कक्षेत ठेवण्यात आले होते, ज्यातून त्यांना आता वगळण्यात आले आहे.
१५ मेपासून कंपन्या ASM मधून बाहेर पडतील
बीएसई आणि एनएसई १५ मेपासून या तीन कंपन्यांचे शेअर्स एएसएम फ्रेमवर्कच्या बाहेर काढणार आहेत. यापूर्वी या कंपन्यांच्या भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, स्टॉक एक्सचेंजने त्यांना एएसएम फ्रेमवर्कमध्ये ठेवले होते. अदाणी टोटल गॅस आणि अदाणी ट्रान्समिशन या रेंजमध्ये २४ मार्च रोजी ठेवण्यात आले होते. अदाणी ग्रीन एनर्जीला गेल्या महिन्यातच या चौकटीत आणण्यात आले होते.
अदाणी ट्रान्समिशन ८,५०० कोटी उभारणार
दरम्यान, अदाणी ट्रान्समिशन कंपनीच्या संचालक मंडळाने बाजारातून ८,५०० कोटी रुपये उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. अदाणी ट्रान्समिशन पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे ही रक्कम उभारेल. तसेच अदाणी एंटरप्रायझेसनेही या मार्गाद्वारे १२,५०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. अशा प्रकारे अदाणी समूह बाजारातून २१,००० कोटी रुपये उभारणार आहे. हिंडेनबर्ग संशोधन अहवाल समोर आल्यापासून अदाणी समूहाच्या कंपन्यांची अवस्था वाईट आहे. यामुळे कंपनीला बाजारातून पैसे उभे करण्यात सतत अडचण येत आहे. मात्र आता समूहाच्या विविध कंपन्यांच्या मंडळांनी बाजारातून पैसे उभारण्यास मान्यता दिली आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चने गंभीर आरोप केले होते
अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने जानेवारीच्या अखेरीस अदाणी समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध केला. अहवालात, समूहावर त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स फुगवल्याचा आणि अकाउंटिंग फसवणूक केल्याचा आरोप होता. एवढेच नाही तर अदाणी समूहाच्या २ लाख कोटी रुपयांच्या कर्जाबाबतही या अहवालात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हा अहवाल आल्यापासून अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
हेही वाचाः लाखात एक खाट! अमेरिकन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लाखो रुपयांत विकली जातेय खाट