मुंबई : भांडवली बाजारात ग्राहकोपयोगी वस्तू, दूरसंचार आणि कमॉडिटीशी संबंधित कंपन्यांच्या समभागांमधील तेजीने गुरुवारी सलग सहाव्या सत्रात प्रमुख निर्देशांकांनी सकारात्मक वाढ नोंदवली. सेन्सेक्स ८१,००० अंशांच्या पातळीवर, तर निफ्टी २४,८०० या महत्त्वाच्या पातळीपुढे स्थिरावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४७.८९ अंशांनी वधारून ८१,०५३.१९ पातळीवर बंद झाला. दिवसभरात, त्याने ३३१.१५ अंशांची कमाई करत ८१,२३६.४५ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४१.३० अंशांची वाढ झाली आणि तो २४,८११.५० पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>> ‘फ्युचर’च्या विमा व्यवसायासाठी सेंट्रल बँकेकडून यशस्वी बोली

सकारात्मक जागतिक घडामोडींमुळे देशांतर्गत बाजारात तुलनेने माफक वाढ दिसून आली. विशेषत: अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या ताज्या बैठकीच्या प्रसिद्ध झालेल्या इतिवृत्तातून, सप्टेंबरमध्ये संभाव्य व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये भारती एअरटेलचा समभाग १.६३ टक्क्यांनी वधारला, त्यापाठोपाठ टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टायटन, एशियन पेंट्स आणि अल्ट्राटेक सिमेंट्सचे समभागही तेजीत होते. दुसरीकडे महिंद्र अँड महिंद्र, टाटा मोटर्स, टीसीएस आणि पॉवरग्रीड यांची कामगिरी निराशनजनक राहिली.

सेन्सेक्स ८१,०५३.१९     १४७.८९   (०.१८%)

निफ्टी    २४,८११.५०      ४१.३०      (०.१७%)

डॉलर      ८३.९४             ४

तेल         ७६.२१          ०.२१

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex gain 147 points to close over 81000 points nifty settle above 24800 print eco news zws