BSE Smallcap News : बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक सोमवारी झालेल्या व्यवहारात २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर २५ टक्के अधिक कर लादण्याची योजना जाहीर केल्यानंतर या निर्देशांक मूल्यात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, बीएसई स्मॉलकॅपची १००० अंकांची गटांगळी यामागे काही महत्वाचे घटक देखील आहेत. या पार्श्वभूमीवर आपण चार महत्त्वाचे घटक जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निर्देशांक किती घसरला?

सोमवारी झालेल्या व्यवहारात बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक १,०६५.९७ अंकांनी घसरला आणि ४९,०९८.२५ पर्यंत खाली आला. निर्देशांकाच्या अलिकडच्या काही घसरणीचा विचार केल्यास आता जवळजवळ १५ टक्के खाली आला आहे. २००५ मध्ये सुरू झालेला हा निर्देशांक बीएसईच्या एकूण बाजार भांडवलाच्या १५ टक्के प्रतिनिधित्व करतो. हा निर्देशांक भारताच्या शेअर बाजारातील स्मॉल-कॅप विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डिझाइन केला आहे. आर्थिक आघाडीवर निर्देशांकाला इक्विटीच्या किंमतीच्या (PE) ३० पट आणि बुकच्या किंमतीच्या (PB) ३.४८ पट मूल्य मिळते.

कोणते शेअर्स सर्वाधिक घसरले?

फोर्टिस हेल्थकेअर , ब्लूस्टार कंपनी, केफिन टेक्नॉलॉजीज, वोक्हार्ट फार्मा आणि ज्योती सीएनसी ऑटोमेशनच्या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सच्या मूल्यात सर्वाधिक घसरण झाल्याचं पाहायला मिळतं. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकात एनजीएल फाइन-केमचा शेअर २० टक्के घसरला. त्यानंतर बँको प्रॉडक्ट्स इंडिया १९ टक्के, एक्सेल इंडिया १६ टक्के, टीआय १५ टक्के, ओम इन्फ्रा १२.२२ टक्के व इतर काही शेअर्स घसरले.

बीएसई स्मॉलकॅप घसरणीचं कारण काय?

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एक घोषणा केली आहे की, अमेरिका स्टील आणि अॅल्युमिनियमवर २५ टक्के आयात शुल्क लादणार आहे. हे अतिरिक्त आयात शुल्क लागू होईल. त्यामुळे हे आयात शुल्क आठवड्याच्या शेवटी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. रविवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असंही सांगितलं होतं की, मंगळवारपासून परस्पर शुल्क जाहीर करतील. जे जवळजवळ लगेचच लागू होतील, असं वृत्त रॉयटर्सने वृत्त दिलं होतं.

बीएसई स्मॉलकॅपचा आढावा

दरम्यान, गेल्या पाच व्यवहार सत्रांमध्ये निर्देशांक १.३३ टक्क्यांनी घसरला आहे. मागील एका महिन्यात तो ६.८ टक्क्यांनी घसरला आहे आणि गेल्या सहा महिन्यांत तो ८.८ टक्क्यांनी घसरला आहे. तथापि गेल्या एका वर्षात निर्देशांकाने ११ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse smallcap falls news bse smallcap falls 1000 points know 4 key factors gkt