आठवड्याचा पहिला व्यवहारी दिवस भारतीय शेअर बाजारासाठी चांगला ठरला आहे. शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक सुरुवातीच्या व्यापार सत्रापासूनच वाढीसह हिरव्या रंगात व्यवहार करीत होते आणि दिवसाचा व्यवहार संपण्यापूर्वीच प्रमुख निर्देशांक निफ्टी ५० ने इतिहास रचला आहे. या निर्देशांकाने प्रथमच २० हजारांची पातळी ओलांडली आहे.

व्यापार सत्राच्या शेवटच्या तासात चमत्कार घडला

खरं तर दुपारी ३.३० वाजता निफ्टी निर्देशांकाने मागील सर्व विक्रम मोडून विक्रमी उच्चांक गाठला आणि २० हजारांचा टप्पा पार केला. जुलै २०२३ नंतर निफ्टीचा हा नवा विक्रमी उच्चांक आहे, हे उल्लेखनीय आहे. यापूर्वी हा आकडा १९,९९५ होता. निफ्टी १८७.१० अंकांच्या वाढीसह २०,००७.०५ च्या पातळीवर व्यवहार करीत होता. सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली असून, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक सकाळी ९.१५ वाजता १९,८९० च्या पातळीवर उघडला. बाजारातील व्यवहारात प्रगती होत असताना निफ्टीलाही गती मिळाली. ट्रेडिंगदरम्यान तो २०,००८.१५ च्या उच्च पातळीवर पोहोचला होता. निफ्टीने ही पातळी ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. निफ्टीने ३६ व्यापार सत्रांत पहिल्यांदाच ही विक्रमी पातळी गाठली आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
bull Fight Viral Video | Bull Attack on boy Wearing Red Shirt
“शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवणार इतक्यात…”, पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

हेही वाचाः विश्लेषण : जी २० मध्ये सहमती झालेलं ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स काय? पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता

मार्चपासून १५ टक्के वाढ

निफ्टी ५० ने त्याच्या सर्वकालीन उच्चांकाला (Nifty All Time High) स्पर्श केला आहे आणि मार्च २०२३ पासून १५ टक्के वाढ नोंदवली आहे. आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर व्यवहाराच्या शेवटच्या मिनिटांत शेअर बाजारात काहीशी घसरण झाली आणि निफ्टी २०,००० च्या खाली बंद झाला. बाजाराच्या शेवटी तो १७६.४० अंकांच्या वाढीसह १९,९९६.३५ च्या पातळीवर बंद झाला. Nifty Bank ही ४१४.३० अंकांच्या वाढीसह ४५५७०.७० च्या पातळीवर बंद झाला.

हेही वाचाः जी २० परिषदेमुळे व्यापाऱ्यांचं ४०० कोटी रुपयांचे नुकसान, नेमकं कारण काय?

सेन्सेक्सने ५०० हून अधिक अंकांची उसळी घेतली

निफ्टीबरोबरच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या ३० शेअर्सच्या सेन्सेक्सनेही दिवसभर झपाट्याने व्यवहार केले आणि शेवटी मजबूत वाढीसह बंद झाला. गेल्या शुक्रवारच्या ६६,५९८.९१ बंदच्या तुलनेत सोमवारी सकाळी ९.१५ वाजता सेन्सेक्स ६६,८०७.७३ वर उघडला. व्यवहारादरम्यान त्याने ६७,१७२.१३ ची उच्च पातळी गाठली आणि शेवटी ५२८.१७ अंकांच्या वाढीसह ६७,१२७.०८ च्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारात आज सर्व क्षेत्र निर्देशांकांमध्ये वाढीचा कल कायम राहिला. धातू, ऑटो आणि ऊर्जा समभागांमध्ये वाढ झाली, तर बँकिंग, एफएमसीजी आणि आयटी समभागांनीही मोठी उसळी घेतली.