लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : आघाडीची दुचाकी कंपनी असलेल्या बजाज ऑटोच्या संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत, एकंदर ४,००० कोटी रुपये खर्चाच्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेला मंजूरी देण्यात आली. कंपनीकडून एकूण ४० लाख समभाग खरेदी केली जाणार असून, १० रुपये दर्शनी मूल्याचे समभाग हाती असणाऱ्या भागधारकांना प्रत्येकी १०,००० रुपये इतका मोबदला देण्याचे कंपनीने ठरविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपनीने समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजना आखत असल्याचे जाहीर केल्यानंतर, बजाज ऑटोच्या समभागाने गेल्या आठवड्यात बुधवारी जवळपास ५ टक्क्यांनी झेप घेत ७,०५९.८५ ही ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली होती. सोमवारच्या बाजारातील पडझडीत तो ७ हजारांच्या किंचित खाली ६,९८३.८५ रुपयांवर बंद झाला. या बंद भावाच्या तुलनेत जाहीर झालेली ‘बायबॅक’ किंमत सुमारे ४३ टक्के फायदा देणारी आहे. कंपनीने या ‘बायबॅक’ योजनेसाठी पात्र भागधारक ठरवणारी ‘रेकॉर्ड तारीख’ मात्र अद्याप जाहीर केलेली नाही.

हेही वाचा >>>बाजारातली माणसं: एचडीएफसी म्युच्युअल फंडाची भक्कम पायाभरणी –मिलिंद बर्वे

समभाग पुर्नखरेदी हा भागधारकांना उत्पन्न परत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. ज्या ज्यावेळी ताळेबंदातील रोख रक्कम १५,००० कोटींच्या पुढे जाते तेव्हा आम्ही गुंतवणूकदारांना ती परत देण्याचा प्रयत्न करतो, असे बजाज ऑटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बजाज म्हणाले.बजाज ऑटोने नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्या व्यवसायाची पुनर्रचना केली. कंपनीने अलीकडेच डिसेंबर २०२३ मध्ये एकूण विक्रीत १६ टक्क्यांनी वाढ नोंदवून ३.२६ लाख दुचाकींची विक्री केली. तर या कालावधीत २.८३ लाख दुचाकींची विक्री केली. जी गेल्यावर्षी याच कालावधीत २.४७ लाख राहिली होती.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buy back shares from bajaj auto at rs 10000 each print eco news amy
Show comments