भारताच्या चांद्रयान ३ ने चंद्रावर पाऊल ठेवून तिरंगा फडकावून इतिहास रचला आहे. हे यश फक्त इस्रोचे नाही, तर त्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्व कंपन्यांचेही आहे. विशेष म्हणजे चांद्रयान चंद्रावर पाऊल ठेवण्यापूर्वीच देशातील १३ कंपन्यांनी २० हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. या अशा कंपन्या आहेत, ज्या एरोस्पेस व्यवसायाशी संबंधित आहेत. येत्या काळात त्यांची कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. खरं तर १३ कंपन्यांनी भारताच्या शेअर बाजारातून कमाई केली आहे. जवळपास आठवडाभरापासून या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होत असून, त्यामुळे त्यांच्या मार्केटमध्येही वाढ झाली आहे. याचा अर्थ चांद्रयान ३ ने चंद्रावर पाऊल ठेवण्यापूर्वीच डझनभर कंपन्यांच्या बाजारमूल्यामध्ये २० हजार कोटी रुपयांची वाढ झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, रॉकेट कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशनमध्ये वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स घटकांपासून ते धातूच्या गिअर्सपर्यंतच्या उपकरणांचा पुरवठा करणार्‍या १३ कंपन्यांच्या शेअर्सनी या आठवड्यात बाजारमूल्यामध्ये २.५ अब्ज डॉलर म्हणजे २० हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ नोंदवली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चांद्रयान ३ रॉकेटने बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. असे करणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे.

हेही वाचाः स्पाइसजेटला मोठा झटका, कलानिधी मारन यांना २७० कोटी देण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये किती वाढ?

अंतराळयान पुरवठादारांपैकी औद्योगिक गॅस कंपनी लिंडे इंडियाला सर्वाधिक फायदा झाला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सेन्टम इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स, ज्याने मिशनसाठी महत्त्वपूर्ण मॉड्यूल्स आणि सिस्टम्सचा पुरवठा केला, त्या कंपनीच्या शेअर्समध्ये ११ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रोव्हायडर Avantel, ज्यांचे ग्राहक स्वतः ISRO आहेत, त्यांच्या शेअर्समध्ये १२ टक्के वाढ झाली आहे. लिंडे इंडियाज, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स, अवांटेल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपन्यांसह चांद्रयानाच्या मोहिमेत योगदान दिलेल्या इतर ९ कंपन्यांनी मजबूत नफा कमावला आहे.

हेही वाचाः सरकारी ई-मार्केटप्लसने अत्यंत विक्रमी कालावधीत पार केला एक लाख कोटी सकल व्यापार मूल्याचा टप्पा

तज्ज्ञ काय म्हणतात?

मुंबईस्थित वेल्थमिल्स सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडच्या स्ट्रॅटेजिस्ट क्रांती बथिनी यांनी सांगितले की, चंद्र मोहिमेसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये भाग घेतल्याने या क्षेत्रातील कंपन्यांसाठी संधी उपलब्ध होऊ शकते. ते भविष्यात जागतिक प्रकल्पांचा एक भाग बनू शकतात आणि त्यांची उत्पादने आणि सेवा निर्यात करू शकतात.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 hoisted the tricolor on the moon and on the other hand 13 companies earned 20 thousand crores vrd
Show comments