जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर आज ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबई क्राईम ब्रँचने कांदिवली पूर्व येथे राहणाऱ्या जतीन सुरेश मेहता (४५) याला अटक केली आहे. मेहता यांच्यावर ‘डब्बा ट्रेडिंग’ रॅकेट चालवल्याचा आरोप आहे आणि त्यांनी ४ महिन्यांत ४,६७२ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे ‘डब्बा ट्रेडिंग’ म्हणजे काय? तुमचा ब्रोकरही यात सहभागी आहे का? शेअर बाजारात गुंतवलेले तुमचे सर्व पैसे सुरक्षित आहेत की नाही? याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

खरं तर जतीन सुरेश मेहता यांच्या या ‘डब्बा ट्रेडिंग’मुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीचे १.९५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तेथून त्याला २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी जतीन मेहता (४५) याच्याकडून पाच मोबाइल, एक टॅब, एक लॅपटॉप व ५० हजार रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मेहताने आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्टॉक एक्सचेंजकडून कोणताही परवाना घेतला नसल्याचे निदर्शनास आले. मेहताने ‘मुडी’ ॲप्लीकेशनमार्फत सर्व व्यवहार रोख स्वरूपात केल्याचे निष्पन्न झाले. आता आपण ‘डब्बा ट्रेडिंग’बद्दल जाणून घेऊयात.

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?

‘डब्बा ट्रेडिंग’ म्हणजे काय?

‘डब्बा ट्रेडिंग’ला ‘ब्लॅक मार्केट’ किंवा शेअर्सचा ‘सट्टा’ म्हणूनही ओळखले जाते. या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीसाठी रोख व्यवहार ब्रोकर (ज्याला डब्बा ब्रोकर असेही म्हणतात) आणि गुंतवणूकदार यांच्यात होतो. रोखीच्या व्यवहारांमुळे हे व्यवहार बँकिंग आणि सेबी इत्यादी नियामकांच्या कक्षेबाहेर आहेत म्हणून लोक कर वाचवण्यासाठी डब्बा ट्रेडिंग करतात. शेअर मार्केटमध्ये निर्देशांक आणि समभागांवर गुंतवणूक व ट्रेडिंग करण्यात येते. शेअर मार्केटमधील निर्देशांकाच्या चढ-उताराचा बेकायदेशीर वापर करून त्यावर एक प्रकारचा सट्टा खेळला जातो. त्यात सर्व व्यवहार रोखीने केले जातात. यामुळे सरकारचा मोठा महसूल आणि कर बुडतो. रोखीने व्यवहार होत असल्यामुळे त्यात सर्रास काळ्या पैशांचा वापर करण्यात येतो. आता हे सुद्धा थोड्या सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिल्यांदा डब्बा ट्रेडिंगमध्ये केवळ गुंतवणूकदारच नाही तर ब्रोकरचाही कर वाचतो. त्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होत आहेत. दुसरीकडे रोखीच्या व्यवहारामुळे कोणतेही खाते हाताळावे लागत नाही, म्हणजे ज्यांच्याकडे ‘काळा पैसा’ आहे, त्यांची चांदीच झाली आहे.

२५ दिवसांत पैसे खरोखर दुप्पट होतील का?

आता या प्रकारच्या शेअर ट्रेडिंगमधील डब्बा ब्रोकरची ना कोणतीही नोंदणी असते आणि ना त्याच्याकडे सेबीचा कोणताही परवाना असतो. म्हणजे तो बेपत्ता झाला तर त्याला कठोर परिश्रम करून फक्त गुन्हे शाखाच पकडू शकते, इतर कोणी त्याला पकडू शकत नाही. याचे कारण त्यावर कोणत्याही नियामकाचे नियंत्रण नाही. तुम्हाला ‘फिर हेरा फेरी’ मधील ‘२५ दिन में पैसा डबल’ हा डायलॉग आठवतोय का? जिथे बिपाशा बसू लोकांचे पैसे घेऊन गायब होते. डब्बा ट्रेडिंगची पद्धतही तशीच काहीशी आहे, त्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होतात. डब्बा ट्रेडिंग म्हणजे शेअर बाजार किंवा सेबीच्या कक्षेबाहेरील शेअर ट्रेडिंग आहे. हे आता आपण उदाहरणाने समजून घेऊयात. समजा एबीसी कंपनीचा शेअर १००० रुपयांचा आहे आणि एका गुंतवणूकदाराने डब्बा ब्रोकरशी १५०० रुपयांपर्यंत पोहोचण्याचा करार केला आहे. आता जर शेअरची किंमत १५०० रुपयांपर्यंत पोहोचली तर ब्रोकर त्यानुसार गुंतवणूकदाराला पैसे देईल, परंतु जर १००० रुपयांचा तोच शेअर ८०० रुपयांवर राहिला तर गुंतवणूकदार ब्रोकरला २०० रुपये देईल.

हेही वाचाः निवृत्ती वेतन पुनर्विचार समितीचा अहवाल अद्याप नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाचे स्पष्टीकरण

डब्बा ट्रेडिंगचा हिशेब सरळ असतो. यामध्ये गुंतवणूकदाराचा नफा हा ब्रोकरचा तोटा आणि ब्रोकरचा नफा हा गुंतवणूकदाराचा तोट्यावर अवलंबून असतो. आणि त्यात सरकारचे नुकसान नेहमीच होते, कारण हे सर्व व्यवहार रोखीने होतात. दुसरे म्हणजे नियामकाच्या कक्षेबाहेर असल्यामुळे सरकारला कराचा फटका सहन करावा लागतो. भारतातील शेअर बाजाराशी संबंधित कायद्यानुसार ‘डब्बा ट्रेडिंग’ पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

हेही वाचाः थरमॅक्सने गुजरातमध्ये उभारला पवन-सौर संमिश्र ऊर्जा प्रकल्प; ‘एवढी’ मेगावॉट वीजनिर्मिती होणार

आता हे कसे टाळायचे?

तुमच्या स्टॉक ब्रोकरची सेबीकडे नोंदणी आहे की नाही याची खात्री करून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. दुसरे शेअर्सचे व्यवहार रोखीने करू नका. तसेच नेहमी डीमॅट स्वरूपात शेअर्सची खरेदी आणि विक्री करा आणि यासाठी अस्सल ब्रोकर अॅप किंवा टूल किंवा सॉफ्टवेअरचा आधार घ्या, कारण डब्बा ब्रोकर ट्रेडिंगसाठी स्वतःचे विकसित सॉफ्टवेअर वापरतात.