प्रमोद पुराणिक

काकांनी उभी केलेली इमारत पुतण्याने पाडून नवीन निर्माण करण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न आता विचारता येणार नाही. कारण आता निर्णय झाला आहे. उद्योगपती रतन टाटा म्हणतात, निर्णय अगोदर घ्यावा लागतो आणि तो योग्य ठरविण्यासाठी नंतर प्रयत्न करावे लागतात. प्रतिकूल परिस्थिती अथवा कारणामुळे दोन पावले मागे यावे लागले तरी तोदेखील निर्णय असतो. सौदी अरेबियाच्या आराम्को कंपनीला भागीदारी देण्यासाठी रिलायन्सने विभाजन (डिमर्जर) करण्याचा प्रस्ताव जाहीर केला होता, मात्र नंतर तो निर्णय रद्द केला. उद्या एचडीएफसीने एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव रद्द केला तर २०२७ ला एचडीएफसी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करेल आणि १९९४ ला स्थापन केलेली एचडीएफसी बँक २०२८ ला तिशीत पदार्पण करेल. एचडीएफसी बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी इंश्युरन्स, एचडीएफसी जनरल ॲश्युरन्स, एचडीएफसी एएमसी अशा अनेक पारंब्या एचडीएफसीला आहेत.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई

१८ ऑक्टोबर १९४४ ला जन्मलेल्या दीपक पारेख यांची त्यांचे काका एच टी पारेख यांनी एचडीएफसीमध्ये उपव्यवस्थापकपदी वर्णी लावली. तेव्हाच समूहाचा वारसदार तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, म्हणून त्यावेळी प्रदीप शहा बाहेर पडले. शहा यांनी पुढे जाऊन आघाडीची पतमानांकन संस्था ‘क्रिसिल’ची स्थापना केली.

आता गेल्यावर्षी एचडीएफसीचे देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. इमारत पाडण्याचा निर्णय घेतला की, त्या इमारतीत राहणारे लोक दरवाजे, खिडक्यादेखील काढून घेतात. त्याचप्रमाणे परदेशी वित्त संस्था वागल्या. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोन्ही संस्थांमध्ये परदेशी वित्त संस्था मोठ्या गुंतवणूकदार का झाल्या? तर याला सर्वस्वी देशांतर्गत गुंतवणूकदार कारणीभूत आहेत. एचडीएसीकडून कर्ज मिळाले तर चालेल किंवा त्यामध्ये ठेवी ठेवल्या तर चालतील, मात्र एचडीएफसीचे समभाग नको या मनोवृत्तीमुळे परदेशी वित्त संस्था एचडीएसीमध्ये मोठ्या भागधारक बनल्या. या काळात दीपक पारेख यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. एचडीएफसी संस्थेला प्रवर्तक नाहीत तर इतर कंपन्या त्यावेळी मात्र प्रवर्तकांच्या कंपन्या म्हणून ओळखल्या जात होत्या. एचडीएफसीचे आपण प्रवर्तक नाही असा विचार कधीच दीपक पारेख यांनी केला नाही, याबाबत नक्कीच त्यांचे कौतुक करावेसे वाटते. अगदी सुरुवातीपासून म्हणजे १९६५ ला सनदी लेखापालचा (सीए) अभ्यासक्रम पूर्ण करून थेट मॅनहॅटन बँक सोडून पन्नास टक्के कमी पगारात एचडीएफसीमध्ये रुजू झाले. त्यांनतर पुढे १९९४ ला एचडीएफसी बँकेची स्थापना केली. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेनंतर एचडीएफसी बँक ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक झाली. दीपक पारेख एकापाठोपाठ एक कंपन्या स्थापन करत गेले आणि त्याच वेगाने त्या मोठ्या होत गेल्या. याचदरम्यान माध्यमांनी दोन संस्थांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू केल्या, त्यावेळी दीपक पारेख यांना मात्र विलीनीकरण करता येणार नाही असे सांगावे लागत होते. विलीनीकरणाऐवजी पारेख यांच्या डोक्यात एक मुख्य कंपनी आणि त्याच्या उपकंपन्या उभारण्याचा आराखडा होता. जी ई कॅपिटल त्यांच्या डोळ्यासमोर होते. त्यामुळे आधी दोन्ही कंपन्या मोठ्या करा आणि त्यानंतर ज्या कंपन्या खेळीमेळीच्या वातावरणात ताब्यात घेता येतील त्या घेण्याचे धोरण समोर ठेवले होते. प्रचंड ऊर्जा असलेल्या या माणसाने निवृत्तीचे यशस्वी नियोजन केले. ज्या ज्या संस्थांना जन्म दिला, त्यांना वारसदार निर्मितीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

शिवाय कंपनीच्या कामाबरोबर सामाजिक भान जपत सामान्यांच्या हितासाठी पारेख केंद्र सरकारच्या विविध समित्यांवरदेखील कार्यरत आहेत. गेल्या वर्षी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा करताना त्यांनी अतिशय हृदयस्पर्शी भाषण केले. वय झाल्यांनतर मुलांच्या घरी वडिलांना जावे लागते, त्याप्रमाणे एचडीएफसीला एचडीएफसी बँकेच्या रूपात घर मिळाले. तुम्हाला रात्री शांत झोप लागणार नाही असा कोणताही निर्णय घेऊ नका, असे आर्थिक क्षेत्रात अत्यंत कठीण निर्णय घेणारे पारेख सांगतात.

(लेखक नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)