देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) गेल्या पंधरा सत्रांमध्ये देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये सुमारे १०,००० कोटी रुपयांची विक्री केली आहे. खरं तर विश्लेषकांनी याला यंदाच्या एप्रिलमध्ये सुरू झालेल्या मजबूत व्यापक आधारित रॅलीच्या पार्श्वभूमीवरचे नफा बुकिंग म्हटले आहे. २८ जूनपासून आजपर्यंत DII ने भारतीय शेअर्समध्ये १०,३७८ कोटी रुपयांची विक्री केली आहे. १५ पैकी ११ सत्रांसाठी ते निव्वळ विक्रेते राहिलेत, असंही नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या डेटावरून दिसून आले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी उच्चांक गाठत असताना ही विक्री झाली आहे.

एप्रिलच्या सुरुवातीपासून दोन्ही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने प्रत्येकी १४ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली होती, तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपने प्रत्येकी २४ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. जूनमध्ये यूएस चलनवाढीचा दर दोन वर्षांहून अधिक काळातील सर्वात कमी वेगाने वाढल्यानंतर भारतीय बाजारपेठांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्सने ६६,००० अंकांची तर निफ्टीने १९,५०० अंकांची पातळी गाठली.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asian development bank marathi news
विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
quantum chip Willow solves in 5 minutes
Quantum Chip :सुपर कॉम्प्युटरलाही हजारो वर्षे लागतील; पण गूगलची ‘ही’ नवी चिप ५ मिनिटांत उत्तर देईल
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

हेही वाचाः दोन लाखांच्या गुंतवणुकीने सुरुवात अन् आज २ लाख कोटींचे मालक, आता कन्येच्या हाती कंपनीची कमान

विश्लेषकांच्या मते, शेअर बाजारामधील अलीकडच्या वाढीमुळे DII ने बाजारातून काही पैसे काढून घेतले आहेत आणि नंतर मूल्यमापन आकर्षक झाल्यावर एक किंवा दोन सुधारणेनंतर रोख पुन्हा बाजारात जमा केली. याव्यतिरिक्त काही विक्री हालचाली समान दृष्टिकोन शेअर करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या दबावास कारणीभूत ठरत असल्याचंही निदर्शनास आलं. “वर्षाच्या सुरुवातीच्या काळात ट्रेंड कमकुवत असताना DII हे प्रमुख खरेदीदार होते. पण आता FII आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी ही भूमिका घेतली आहे, तर DII धोरणात्मकपणे नफा बुक करीत आहेत. विक्री हा पोर्टफोलिओशी जोडण्यासाठी पुन्हा शेअर खरेदी करणे हा भाग देखील असू शकतो. योजनेची उद्दिष्टे आणि दृष्टिकोन इक्विटी आणि इतर मालमत्तेमध्ये समतोल राखणे आणि तो सुनिश्चित करणे आहे,” असंही जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

हेही वाचाः विश्लेषण : चांद्रयान ३ मुळे भारतही ‘मून इकॉनॉमी’चा स्पर्धक देश बनणार?

एप्रिल २०२३ नंतर DII खरेदीचा प्रवाह मंदावला. एप्रिलमध्ये त्यांनी फक्त २,२१६.५७ कोटी रुपयांची खरेदी केली, तर मे महिन्यात त्यांनी १,१०७.५८ कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली. जूनमध्ये त्यांनी सुमारे ४,४५८ कोटी रुपयांची खरेदी केली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DIIs) FPI च्या तुलनेत विरोधाभासी स्वरूपाचे प्रदर्शन करीत आहेत. FPIs विकत असताना DII ने खरेदीदार म्हणून काम केले आणि आता परिस्थिती उलट झाली आहे, DII विक्री करत असताना FPIs खरेदीदार बनले आहेत. १ एप्रिलपासून FPIs निव्वळ खरेदीदार राहिले आणि एकूण १५.९४ अब्ज डॉलर मिळवले, असंही विश्लेषकांनी असे निरीक्षण नोंदवले आहे. “डीआयआय विक्री करत असल्याचे खरे असले तरी याउलट एफआयआयने यंदा १ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे, असंही प्रभुदास लिलाधरचे प्रमुख सल्लागार विक्रम कासट म्हणाले.

Story img Loader