पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) जानेवारी महिन्यामध्ये ५.२ टक्के वाढ नोंदवल्याचे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट केले.

उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जाणाऱ्या या निर्देशांकाने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत निराशाच केली आहे. सांख्यिकी मंत्रालयाच्या निवेदनानुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची डिसेंबर महिन्याची आकडेवारी ४.३ टक्क्यांवरून सुधारून ४.७ टक्के करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील दहा महिन्यांत औद्योगिक उत्पादन निर्देशांक ५.४ टक्के राहिला आहे. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत हा निर्देशांक १३.७ टक्के होता. त्यामुळे मागील वर्षापेक्षा औद्योगिक उत्पादन दर लक्षणीय मंदावल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – बहुप्रसवा, बहुवारिक रसायन : तेगा इंडस्ट्रीज लिमिटेड

हेही वाचा – बाजारातील माणसं : दृढ ध्यास, कठोर बोली… उदय कोटक

जानेवारी महिन्यात औद्योगिक उत्पादनात वाढ होईल, असे अपेक्षित होते. कारण जानेवारी महिन्यात आठ मूलभूत उद्योग क्षेत्रात ७.८ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात ही वाढ ७ टक्के होती. औद्योगिक उत्पादन वाढीसाठी मूलभूत उद्योग क्षेत्रांची कामगिरी ही निदर्शक मानली जाते. कारण या आठ मूलभूत उद्योगांची औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ४० टक्के हिस्सेदारी असते. निर्मिती क्षेत्राची वाढ डिसेंबरमध्ये ३.१ टक्क्यांवर होती, ती जानेवारीत ३.७ टक्क्यांवर पोहोचली. तर वीजनिर्मिती क्षेत्र १२.७ टक्के, खाण उद्योग क्षेत्राने ८.८ टक्के वाढ नोंदवून चांगली कामगिरी केली आहे. प्राथमिक आणि भांडवली वस्तू क्षेत्राने डिसेंबरच्या तुलनेत चांगली वाढ नोंदवली. मात्र, पायाभूत सुविधा आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रांची कामगिरी असमाधानकारक राहिली.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disappointing performance of industrial production rate 5 4 percent in the first ten months of the financial year ssb