Effects Of Donald Trump Second Term On Indian Share Market : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे विजयी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७वे अध्यक्ष म्हणून सोमवारी शपथ घेतली. शपथ घेतल्यांनतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावाला आहे. यामध्ये कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के अतिरिक्त आयात कर लागू करण्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर ते भारताबाबत कोणते महत्त्वाचे निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात दिग्गज गुतवणूकदार विजय केडिया आणि अरुण केजरीवाल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर याचा भारत आणि शेअर बाजारावर काय परिणाम होईल, यावर भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान नोव्हेंबर २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यानंतर प्रमुख भारतीय निर्देशांकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता आणि सेन्सेक्समध्ये ९०० अंकांपेक्षा जास्त वाढ झाली होती. पण, डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेताच, आज भारतीय शेअर बाजार निर्देशांक गॅप अप खुले झाले. एनएसई निफ्टी ५० ६४ अंकांनी तर बीएसई सेन्सेक्स ७६.४४ अंकांनी खुला झाला. पण, निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही आता नकारात्म व्यवहार करत आहेत. निफ्टी ५०.१७२ अंकांनी तर सेन्सेक्स ७०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे.

२० जानेवारी रोजी मार्टिन लूथर किंग ज्युनियर डे मुळे अमेरिकन बाजार बंद होते परंतु यूएस स्टॉक फ्युचर्समध्ये तेजी दिसून येत आली होती. सुरुवातीला भारताच्या बाजूने अनेक धोरणात्मक उपाययोजनांच्या अपेक्षेमुळे शेअर बाजारात उत्साह होता, परंतु आता विविध धोरणांचे परिणाम आणि पुढे बदलणाऱ्या एकूण भू-राजकीय समीकरणांमुळे चिंता निर्माण झाली आहे.

ट्रम्प यांची भूमिका सध्या शेअर बाजारासाठी अनुकूल वाटत नाही

भारतातील बहुतेक शेअर बाजार तज्ञ सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. आघाडीचे गुंतवणूकदार विजय केडिया म्हणाले, “ट्रम्प यांची भूमिका सध्या शेअर बाजारासाठी अनुकूल आहे असे वाटत नाही. आपल्याला पुढे होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवायला लागेल. ट्रम्प यांनी केलेल्या धोरणात्मक घोषणा पहाव्या लागतील. शिवाय, ट्रम्प यांची धोरणे पूर्णपणे चीनविरोधी असतील अशी मला अपेक्षा नाही. भारताच्या बाजूने कोणतीही मोठी धोरणे असतील अशीही मला अपेक्षा नाही.”

…तर ते बाजारांसाठी सकारात्मक संकेत ठरतील

शेअर बाजारातील आणखी एक दिग्गज अरुण केजरीवाल यांनी स्पष्ट केले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान आयात शुल्क वाढवण्याबाबत बरीच विधाने केली आहेत, परंतु त्यांची नेमकी व्याप्ती अद्याप स्पष्ट झालेली नाही. आयात शुल्कामध्ये तीन पट वाढ होण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे सध्याच्या परिस्थितीत आपल्या बाजारपेठा आधीच एफआयआय कडून होणारी विक्री, तणावाखाली असलेली अर्थव्यवस्था आणि मंदीच्या चिंतेचा सामना करत आहेत. अर्थसंकल्प जवळ आला असल्यामुळे कर दरांमध्ये कपात होण्याची अपेक्षा आहे. जर असे झाले तर ते बाजारांसाठी सकारात्मक संकेत ठरतील.”

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump second term indian share market us india trade relations indian stock market trump policies indian economy aam