आज केवळ भारतातच नाही तर जगभरात चांद्रयान ३ मोहिमेची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाची चंद्र मोहीम लुना अयशस्वी ठरली आहे. आता सर्वांच्या नजरा चांद्रयान ३ कडे लागल्या आहेत आणि संपूर्ण जग त्यांच्या यशासाठी प्रार्थना करीत आहे. ज्या कंपन्यांनी इस्रोमध्ये योगदान दिले आहे, त्यांच्या यशाबरोबरही चांद्रयान ३ चे यश जोडलेले आहे. आज चांद्रयान ३ च्या आधारे एका सरकारी कंपनीने इतिहास रचला आहे. ही सरकारी कंपनी दुसरी तिसरी कोणी नसून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे. शेअर बाजारात कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला आहे. HAL ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात जुनी एरोस्पेस कंपन्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे इस्रोला चांद्रयान ३ च्या चंद्र मोहिमेत या कंपनीनं खूप मदत केली आहे. जर चांद्रयान ३ चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले, तर जगाच्या नकाशावर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा प्रभाव आणखी वाढणार आहे.
कंपनीने रचला इतिहास
चांद्रयान मोहीम यशस्वी होण्याची हमी सर्वजण देत आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी पूजा-अर्चाही करून आशीर्वादही घेतले जात आहेत. खरं तर चांद्रयान मोहिमेच्या मागे इस्रोबरोबरच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे मोठे नाव आहे. याच कारणामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीमुळे कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार कंपनीचा शेअर ४०२४ रुपयांवर पोहोचला आहे. सुमारे २५ दिवसांत कंपनीने आपला विक्रम मोडला आहे. यापूर्वी ३१ जुलै रोजी कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला होता.
हेही वाचाः चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार, ‘या’ ७ कंपन्यांचे शेअर्स रॉकेट बनण्याची शक्यता
कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ
सकाळपासून एचएएलच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. दुपारी १२.५० वाजता कंपनीचा शेअर ३.१९ टक्क्यांनी म्हणजेच १२४.०५ रुपयांच्या वाढीसह ४०१५.०५ रुपयांवर व्यवहार करीत आहे. आज कंपनीचा शेअर तेजीसह ३९१४.९५ रुपयांवर उघडला. कंपनीचा शेअर एका दिवसापूर्वी ३,८९१ रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होऊ शकते.
हेही वाचाः मोदी सरकार पुढील महिन्यात महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत, पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता
कंपनीला ४४०० कोटींचा नफा
शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीच्या बाजारमूल्यातही वाढ झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, एका दिवसापूर्वी बाजार बंद झाला, तेव्हा कंपनीचे बाजारमूल्य १,३४,५५७.५२ कोटी रुपये होते. आज दुपारी १२.५० वाजता कंपनीच्या शेअरने ४०२४ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला, तेव्हा कंपनीचे बाजारमूल्य १,३०,११०.१७ कोटी रुपयांपर्यंत खाली आले. याचा अर्थ आज काही तासांत कंपनीने ४४४७.३५ कोटी रुपये कमावले.
चंद्र मोहिमेत एचएएलचे योगदान
चांद्रयान ३ मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजला (NAL) घटकांचा पुरवठा केला आहे, जे मिशनमध्ये उपयुक्त ठरत आहेत. कंपनीच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास ती विमाने आणि हेलिकॉप्टरची निर्मिती आणि दुरुस्ती आणि देखभाल यात गुंतलेली आहे. कंपनीला जून तिमाहीत ८१४ कोटी रुपयांचा नफा झाला होता, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी जास्त होता.