देशांतर्गत शेअर बाजाराने दिवाळीत नवीन वर्षाची चांगली सुरुवात केली आहे. विशेष मुहूर्ताच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक तेजीत राहिले होते. एक तासाचा विशेष व्यवहार संपल्यानंतर बाजार ३५० हून अधिक अंकांच्या वाढीसह बंद झाला होता.

दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून संवत २०८० सुरू झाले

शेअर बाजारासाठी दिवाळी विशेष मानली जाते. दिवाळीच्या दिवशी देशातील व्यापारी वर्ग संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा करतात. शेअर बाजारासाठीही महत्त्व वाढते, कारण प्रत्येक वेळी दिवाळी ही बाजारात नवीन वर्षाची सुरुवात होते. विक्रम संवत आणि संवत २०८० नुसार बाजारपेठा आणि व्यावसायिकांचे हे नवीन वर्ष दिवाळीपासून सुरू झाले आहे.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?

दिवाळीच्या दिवसापासून बाजाराला नव्यानं सुरुवात

संवतच्या पहिल्या दिवशी म्हणजे नवीन वर्षात व्यापारी वर्ग जुन्या हिशेबाच्या वह्या बदलतात. या पवित्र प्रसंगी दिवाळीच्या दिवशी बाजारात विशेष व्यापार सत्राचे आयोजन करण्यात येते. या ट्रेडिंग सत्राला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. दिवाळीला फक्त एक तास मुहूर्ताच्या खरेदीसाठी बाजार उघडतो जातो. त्यामुळेच काल रविवार असतानाही शेअर बाजारात एक तासाचा विशेष व्यवहार होता.

हेही वाचाः Future Group : ‘बिग बाजार’चे शटर डाऊन, ‘या’ कारणामुळे सर्व दुकाने बंद होणार

प्री ओपन सेशनपासून तेजी

मुहूर्त ट्रेडिंगच्या विशेष सत्रासाठी बाजार १२ तारखेला संध्याकाळी ६.१५ वाजता उघडला. त्यापूर्वी प्री ओपन सत्रात बीएसई सेन्सेक्स ६०० अंकांनी मजबूत होता, तर निफ्टीने १९,५८० अंकांची पातळी ओलांडली होती. सेन्सेक्सने ५०० हून अधिक अंकांच्या वाढीसह नव्या सत्राची सुरुवात केली. शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी जो संवत २०७९ चा शेवटचा व्यापार दिवस होता, तेव्हा सेन्सेक्स ६४,९०४.६८ अंकांवर बंद झाला होता.

हेही वाचाः Crorepati Fisherman : ‘या’ पाकिस्तानी मच्छीमाराचे नशीब पालटले, एका माशाने रातोरात बनवले करोडपती

वर्षाची सुरुवात झाली चांगली

काल मुहूर्त ट्रेडिंगच्या व्यवहारात सेन्सेक्स ६५,४१८.९८ अंकांवर उघडला. निफ्टीही सुमारे १ टक्क्यांच्या वाढीसह १९,५४७.२५ अंकांवर उघडला होता. संपूर्ण एक तासाच्या मुहूर्तावर बाजारपेठेत सगळीकडे तेजी होती. केवळ ब्लू चिप समभागांमध्येच वाढ झाली नाही, तर बहुतेक मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागही ग्रीन झोनमध्ये राहिले. बाजारातील सर्वच क्षेत्रात चांगले वातावरण राहिले होते. व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स ३५५ अंकांच्या म्हणजेच ०.५५ टक्क्यांच्या वाढीसह ६५,२६० अंकांच्या जवळ बंद झाला. निफ्टी १०० अंकांनी वाढून १९,५२५ अंकांच्या जवळ बंद झाला. सेन्सेक्सवरील विशेष व्यवहारात इन्फोसिसचा आयटी समभाग सुमारे दीड टक्क्यांनी वाढला होता. विप्रोही सुमारे एक टक्का वाढला होता.

गेले वर्ष छान गेले

गेल्या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास हे वर्ष शेअर बाजारासाठी शुभ ठरले. गेल्या दिवाळीपासून सुरू झालेल्या संवत 2079 मध्ये बाजारात सुमारे १० टक्के वाढ झाली, तर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी तब्बल ६४ लाख कोटी रुपयांची कमाई केली. गेल्या संवत्सरात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनी वारंवार नवीन उच्चांक गाठला. संवत २०७९ मध्ये २२० पेक्षा जास्त शेअर्स मल्टिबॅगर्स झाले.

असा मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास

मुहूर्ताच्या ट्रेडिंगबद्दल बोलायचे झाल्यास बाजाराची सुरुवात साधारणपणे तेजीने होते. मागील १० वर्षांचा रेकॉर्ड हे दर्शवतो. गेल्या १० वर्षात मुहूर्ताच्या व्यवहारात शेअर बाजाराची सुरुवात ८ वेळा वाढीसह झाली आहे. यावेळीही बाजाराने संवतच्या पहिल्याच दिवशी औपचारिक व्यवहाराला सुरुवात केली आहे.

Story img Loader