एजिस लॉजिस्टिक्स लिमिटेड

(बीएसई कोड ५००००३)

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Indraprastha Gas Limited bonus shares
इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग
Sale of fake oil Bhiwandi, fake oil Bhiwandi,
ठाणे : ब्रँडचे नाव वापरून बनावट तेलाची विक्री
Success Story kalyani and dinesh Engineer couple
Success Story: इंजिनिअर जोडप्याने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; वर्षाला कमावतात करोडो रुपये
Lumax Auto Technology Limited
माझा पोर्टफोलियो : वाहन उद्योगाचा भक्कम कणा
nitin Gadkari marathi news
इलेक्ट्रिक वाहन उद्योगात चार कोटी रोजगार… गडकरींनी थेट रोडमॅपच मांडला…
tender for plot auction sale, Big developers, Mumbai,
भूखंड लिलाव विक्री प्रक्रियेच्या निविदेला पंधरा दिवसांची मुदतवाढ, मोठमोठे विकासक आले पुढे

प्रवर्तक: राज चंदारिया

बाजारभाव: रु. ३७८ /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : स्टोरेज आणि लॉजिस्टिक
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ३५.१० कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५८.१०

परदेशी गुंतवणूकदार १८.८७
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ४.५३

इतर/ जनता १८.५०
पुस्तकी मूल्य: रु. १०४

दर्शनी मूल्य: रु. १/-

गतवर्षीचा लाभांश: ५७५ %

प्रति समभाग उत्पन्न: रु. १४.५
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २६

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.६५
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४१.४
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ७.८७

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): १५.९
बीटा: ०.६

बाजार भांडवल: रु. १३,२५४ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ४१०/२८०

वर्ष १९५६ मध्ये स्थापन झालेली एजिस लॉजिस्टिक लिमिटेड ही भारतातील आघाडीची तेल, वायू आणि रासायनिक लॉजिस्टिक कंपनी आहे. कंपनीने आपली उत्पादने आणि सेवा वितरित करण्यासाठी बल्क लिक्विड हँडलिंग टर्मिनल, लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) टर्मिनल, फिलिंग प्रकल्प, पाइपलाइन आणि एलपीजी गॅस वितरणाचे विस्तृत जाळे उभारले आहे. कंपनी मुख्यत्वे एलपीजीची आयात आणि वितरण तसेच एलपीजी व रासायनिक उत्पादनांसाठी साठवण आणि टर्मिनलिंग सुविधा या व्यवसायात कार्यरत आहे.

रसायनांची वाहतूक (लिक्विड लॉजिस्टिक्स) : एजिस सर्व प्रकारची द्रव रसायने, पेट्रोलियम उत्पादने आणि वनस्पती तेलांची आयात, निर्यात, वाहतूक आणि साठवण सेवा प्रदान करते. कंपनीची देशातील सहा बंदरांमध्ये (मुंबई, कांडला, पिपावाव, मंगलोर, हल्दिया आणि कोची) टर्मिनल्स आहेत, ज्यांची एकूण परिचालन क्षमता १६ लाख किलोलिटर आहे.

हेही वाचा – बाजारातील माणसं : सुनील सुब्रमणियम… म्युच्युअल फंड उद्योगाची मुलुखमैदान तोफ

एजिसच्या महसुलात गॅस सोर्सिंगचा मोठा वाटा आहे. एलपीजी सोर्सिंग ते औद्योगिक आणि किरकोळ ग्राहकांना वितरित करण्यापर्यंतची संपूर्ण शृंखला कंपनीची आहे. एजिसची एकूण एलपीजी स्थिर क्षमता १,१५,००० मेट्रिक टन आहे. तर वार्षिक क्षमता ९६,००,००० मेट्रिक टन आहे. एलपीजी गॅस सोर्सिंगसाठी कंपनीने जपानी बहुराष्ट्रीय कंपनी इटोचू कॉर्पोरेशनसोबत संयुक्त उपक्रम राबवला आहे. सध्या, एजिसचा भारतातील एलपीजी आयातीत १५.५ टक्के बाजार हिस्सा असून पुढील काही वर्षांत तो २५ टक्क्यांपर्यंत नेण्याची योजना आहे.

एलपीजी विक्री: एजिस सध्या भारतातील १० राज्यांमध्ये १४२ ऑटोगॅस स्थानकांच्या माध्यमातून आपला एलपीजी विक्रीचा व्यवसाय चालवते. तसेच १५ राज्यांमधील १४० शहरांमध्ये २९० एलपीजी वितरकांचे जाळे पसरले आहे. एजिसचे ३७ एलपीजी बॉटलिंग प्रकल्पदेखील आहेत. कांडला एलपीजी टर्मिनल कार्यान्वित झाल्यामुळे कंपनीने औद्योगिक विभागातील वितरणाच्या क्षेत्रात मोठा पल्ला गाठला आहे. दोन वर्षांपूर्वी कंपनीने जगातील आघाडीची साठवण (टँक स्टोरेज) कंपनी वोपकबरोबर संयुक्त करार केला आहे. त्याचा फायदा रासायनिक आणि गॅस साठवणूक क्षमतेचा विस्तार करण्यासाठी होईल.

कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये शेल, रिलायन्स, एचपीसीएल, बीपीसीएल, ओएनजीसी, एचयूएल, बॉम्बे डाइंग या प्रमुख कंपन्यांचा समावेश होतो. एजिसची एचपीसीएल, बीपीसीएलसारख्या प्रमुख ग्राहकांशी थेट पाइपलाइन जोडणी असल्याने ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध राखण्यात मदत झाली आहे.

हेही वाचा – वित्तरंजन : न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज

सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत गत वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या उलाढालीत ४१ टक्क्यांची घट होऊन ती १,२३५ कोटींवर आली आहे. निव्वळ नफ्यात मात्र ३६ टक्के वाढ होऊन १२७ कोटींवर पोहोचला आहे. पायाभूत क्षेत्राची तसेच तेल आणि वायू क्षेत्राची वाढती मागणी पाहता कंपनीने १,७५० कोटींच्या भांडवली गुंतवणुकीचा कार्यक्रम राबवला असून यांत १,३१,००० मेट्रिक टन एलपीजी स्थिर क्षमतेत वाढ आणि पिपावाव, मंगळूर आणि हल्दिया बंदरांमध्ये १,७०,००० किलोलिटर द्रव क्षमता वाढीचा समावेश आहे. याखेरीज कंपनी पुढील विस्तार करीत आहे :

१. मंगलोर येथे नवीन एलपीजी टर्मिनलचे बांधकाम सुरू झाले आहे. जे ८०,००० मेट्रिक टन क्षमतेचे भारतातील सर्वात मोठे क्रायोजेनिक एलपीजी टर्मिनल असेल.

२. जेएनपीटी बंदरावर १,१०,००० किलोलिटर लिक्विड टर्मिनलचे बांधकाम सुरू असून पुढील वर्षांत कार्यान्वित होण्याची अपेक्षा

३. पिपावाव येथे ३,००० मेट्रिक टन गोलाकारांची अतिरिक्त क्षमता पुढील आर्थिक वर्षांत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. तसेच पिपावाव येथे ४८,००० मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन क्रायोजेनिक एलपीजी टर्मिनलचे बांधकाम सुरू आहे.

४. कोची येथील ५०,००० किलोलिटरचा विस्तार पुढील वर्षापर्यंत सुरू होईल.

येत्या दोन वर्षांत या विस्तारीकरणाचा भरीव फायदा दिसून येईल. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून एजिस लॉजिस्टिक्स पोर्टफोलिओमध्ये समावेश करू शकता. सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत टप्प्याटप्प्याने समभाग खरेदीचे धोरण ठेवावे.

stocksandwealth@gmail.com

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Story img Loader