ही काही राजकीय घोषणा नव्हे, पण जेव्हा आपण कुणाचा आवाज ऐकतो तेव्हा हा आवाज नक्की कुणासाठी दिला गेला आहे याची कल्पना मात्र आपल्याला असायला हवी. मागील काही लेखांमध्ये आपण अशीच उदाहरणे बघितली, जिथे दूरचित्रवाणीवर एखादा समभाग विकत घ्यावा असे सांगितले जाते आणि सांगणाऱ्याच्या कुठल्यातरी मित्राने किंवा नातेवाईकाने तो आधीच घेतला असतो. दूरचित्रवाणीवर आवाज दिल्यानंतर तो थोड्यावेळासाठी का होईना तो समभाग वधारतो आणि त्यात नफा कमावला जातो. अशी कार्यपद्धती आपण पूर्वी पण बघितली होती. या घोटाळ्यातसुद्धा हीच कार्यपद्धती वापरण्यात आली. आपण आजसुद्धा दूरचित्रवाणी बघून कुणाचा तरी आवाज ऐकतो आणि त्यानुसार कृती करतो. प्रत्येक वेळेला फायदा होतोच असे नाही. पण इकडे एक अतिशय मोठी गोष्ट आपण दुर्लक्षित करतो आणि ती म्हणजे नक्की घोटाळा शोधायचा कसा? भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ला हे शोधणे अतिशय कठीण असते, कारण घोटाळेबाज नवीन नवीन क्लुप्त्या लढवत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेमंत घई हे एक असेच उदाहरण. गेली ४ वर्षे याचा तपास सुरू आहे. मात्र बहुधा हाती फारसे काही लागल्याचे दिसत नाही. आतापर्यंत घई यांनी सुमारे ३ कोटी रुपये एका खात्यात जमा करून ठेवले आहेत, जे सेबीच्या म्हणण्याप्रमाणे घोटाळ्याचे आहेत आणि त्यांना वापरता येणार नाही. आधीच्याच घोटाळ्याप्रमाणे घई यांनी दूरचित्रवाणीवर येण्यापूर्वी आपल्या बायको आणि आईच्या नावाने समभाग विकत घेऊन ठेवले होते आणि दूरचित्रवाणीवर ‘आवाज’ दिल्यावर ते समभाग विकले आणि नफा कमावला असा आरोप त्यांच्यावर आहे. या कार्यपद्धतीला बीटीएसटी म्हणजे ‘बाय टुडे सेल टुमारो’ असे संक्षिप्त रूपात म्हटले जाते. त्यांच्या शेअर २०-२० या कार्यक्रमाच्या १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या काळातील त्यांनी सुचवलेले समभाग आणि त्यांच्या बायको व आईच्या खात्यातील त्याच समभागांची खरेदी आणि विक्री यांचा तपास सुरू आहे. ‘सेबी’च्या २२ जुलै २०२२ च्या आदेशानुसार, हा तपास अजूनदेखील सुरू असल्याचे समजते. नंतर २५ ऑगस्ट २०२२ च्या एका आदेशानुसार, हेमंत घई यांच्यावरील शेअर बाजारात भाग घेण्याची बंदी उठवलेली दिसते.

हेही वाचा : बाजारातली माणसं : असा राकेश पुन्हा होणे नाही!

पण यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, दूरचित्रवाणीवर जे समभाग सुचवले जातात ते फक्त सूत्रसंचालकाला माहिती असतात असे नाही तर हे समभाग पडद्यामागील संशोधन करणारा चमू ठरवतो आणि सूत्रसंचालक फक्त ते सांगतो. तपासाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा चमू केव्हा या समभागाबद्दल सूत्रसंचालकाला सांगतो असा आहे. ‘सेबी’च्या तपासकर्त्यांना हे सिद्ध करायचे आहे की, घई यांना आदल्या दिवशीच याची माहिती मिळाली होती आणि त्यांनी हे समभाग विकत घेतले. जेव्हा दूरचित्रवाणीवर ते सुचवले गेले तेव्हा त्याचा भाव वाढला आणि लगेचच ते त्यांनी विकले. खरेदी विक्री ‘सेबी’ने सिद्ध केली आहे. मात्र ही खरेदी नक्की अशा माहितीच्या आधारे झाली, जी घई यांना सोडून कुणालाच माहिती नव्हती हे सिद्ध करणे मोठे जिकिरीचे आहे. हे अतिशय किचकट असले तरी गुंतवणूकदारांच्या विश्वासाला ‘सेबी’ला जागले पाहिजे.

हेही वाचा : खरेच शेअर बाजार महाग आहेत?

थोडक्यात काय तर घोटाळा नक्की झाला आहे वा नाही हे अजून पूर्णपणे सिद्ध व्हायचे आहे. मात्र फक्त धूर निघाला म्हणून आग लागली असे समजू नका. या घोटाळ्याचा अंतिम निकाल दुरोगामी परिणाम साधणारा असणार आहे यात काही शंकाच नाही. असो, समभाग निवडताना आंतरआत्म्याचा आवाज ऐका, बाकी ‘आवाज’ देणारे बरेच आहेत.