वर्ष २०२४ च्या ‘वित्तरंजन’मध्ये आपले स्वागत! आठवून बघा वर्ष २०२० च्या १ जानेवारीला आपण काय काय संकल्प केले होते आणि ते करोनामुळे कसे बदलावे लागले. प्रत्येक वर्ष काय घेऊन येईल याचा नेम नसतो. कारण भविष्य कुणालाच माहीत नसते. पण वर्तमान आणि भूतकाळातून मात्र आपण बरेच काही शिकू शकतो. वित्त क्षेत्रसुद्धा याला अजिबात अपवाद नाही. मागील गोष्टींतून आपण बरेच काही शिकतो म्हणूनच मागे घडलेल्या काही गोष्टींचा आणि चालू काळातील घटनांचा आपण अभ्यास चालू ठेवला पाहिजे. त्यातून शिकलेसुद्धा पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या वर्षीच्या वित्तरंजनमध्येसुद्धा आपण असेच काही करणार आहोत. आधी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला एखादी संकल्पना किंवा घटना आवडली असेल तर माहितीच्या महाजालातून त्या विषयीची अधिक माहिती हल्ली सहजगत्या उपलब्ध असते. या वर्षी ‘वित्तरंजन’ सदरातून आपण वित्त क्षेत्रातील घडलेले घोटाळे बघणार आहोत. हल्ली तसे घोटाळ्यालाच महत्त्व आले आहे, कारण त्यावर निघणारे चित्रपट किंवा वेबसिरीज! त्यामुळे घोटाळे समजायला जास्त सोपे जाते कारण ते दृकश्राव्य स्वरूपात मांडले जातात.

हेही वाचा – वित्तरंजन : वर्ष २०२४: घोटाळे उलगडण्याचे वर्ष

घोटाळे म्हणजे फक्त पैशांची अफरातफर नसून फसवणूक, लबाडी, खोटेपणा, बनावटपणा, ढोंगीपणा, आर्थिक अनियमितता आणि आर्थिक गुन्हे वगैरे. यात अशाही काही घटना असतील, ज्यात घोटाळा आहे असे वाटले पण न्यायालयाने त्यांना सोडून दिले. म्हणजे फक्त आरोप करणे हाच घोटाळा. कर चुकवेगिरी, बँकांना लुबाडणे, ग्राहकांना खोटी आश्वासने देणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक करणे, एटीएमशी संबंधित गुन्हे, ऑनलाइन बँकिंगमधील गुन्हे आणि त्यांच्या घोटाळ्यांच्या पद्धती, भांडवली बाजाराशी संबंधित गुन्हे आणि घोटाळ्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे सामान्य माणसांना त्यामधून काही बोध घेऊन कदाचित फसवणूक होण्यापासून वाचता येईल.

घोटाळे काही फक्त भारतात घडतात असे नाही तर परदेशातसुद्धा कित्येक घोटाळे किंवा अनियमितता घडतात. घोटाळे फक्त पैशांशी निगडित नाही तर अगदी लेखापालांचे घोटाळेसुद्धा घडले आहेत. आता यात नवीन भर पडली आहे ती दिवाळखोरी आणि नादारी कायद्याची. म्हणजे मोठी-मोठी कर्जे घेऊन सांगायचे आमचा धंदा चालत नाही आणि मग कुणीतरी येऊन अत्यंत कमी पैशात तो धंदा विकत घेतो. हे धंद्यातील अपयश असले तरीही नुकसान मात्र सर्वसामान्यांचे होते. अशाही काही घटना वित्तरंजनच्या माध्यमातून आपण पाहूया.

हेही वाचा – भारतीय गुंतवणूकदारांच्या जोरावर शेअर बाजार आत्मनिर्भर

वर्तमान काळातील जर काही याविषयीच्या घडामोडी घडल्या तर त्याचा आढावासुद्धा आपण २०२४ च्या वित्तरंजन सदरातून घेऊया. म्हणजे थोडक्यात काय तर जरा जास्तीचे रंजन चित्तरंजन किंवा मनोरंजन नसून फक्त ‘वित्तरंजन’.

@AshishThatte

ashishpthatte@gmail.com