भारतीय भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणुकीला चालू महिन्यात चांगलाच बहर आल्याचे दिसले असले, तरी सरलेल्या जानेवारी-मार्च तिमाहीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफपीआय) बाजारातून काढता पाय घेतल्याचे उपलब्ध आकडेवारी दर्शविते. तिमाहीच्या कालावधीत त्यांची गुंतवणूक वार्षिक तुलनेत ११ टक्क्यांनी घसरून, तिचे मूल्य ५४२ अब्ज अमेरिकी डॉलर इतके मर्यादित राहिले आहे.

‘मॉर्निंगस्टार’च्या अहवालानुसार, देशांतर्गत बाजारातून परकीय पैशाच्या निर्गमनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत ११ टक्क्यांनी घट झाली आहे. जानेवारी-मार्च २०२२ या तिमाहीत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भारतीय समभागांमधील गुंतवणुकीचे मूल्य ६१२ अब्ज अमेरिकी डॉलर होते. तिमाही-दर-तिमाही आधारावर, भारतीय समभागांमधील एफपीआयचे मूल्य डिसेंबर २०२२ मध्ये संपलेल्या तिमाहीत असलेल्या ५८४ अब्जवरून ७ टक्क्यांनी घसरले आहे. सलग तीन तिमाहीत त्यांच्या गुंतवणुकीच्या मूल्यात वाढ झाल्यानंतर सरलेल्या तिमाहीत ते घसरले आहे. ‘एफपीएआय’ची गुंतवणूक धारणेचे प्रमाण मार्च २०२२ मध्ये १७.८ टक्के होते, ते आता १७.३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, असे ‘मॉर्निंगस्टार इंडिया’चा अहवाल दर्शवितो.

Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
share market Major indices, share market ,
स्फुरणाअभावी निर्देशांकांना सुस्ती
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!

परदेशी गुंतवणूकदारांनी २०२१-२२ मध्ये विक्रमी निधी काढून घेतल्यानंतर, २०२२-२३ आर्थिक वर्षातही त्यांनी समभाग विक्री सुरू ठेवली आणि जागतिक स्तरावर मध्यवर्ती बँकांकडून करण्यात येत असलेल्या आक्रमक व्याजदर वाढीमुळे त्यांनी भारतीय भांडवली बाजारातून ३७,६३१ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला.

हेही वाचाः विश्लेषण: हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आता विकता येणं अवघड; सरकारने नियम बदलले, पुढे काय?

सलग दोन वर्षे नक्त विक्रेते

डिपॉझिटरीकडून प्राप्त आकडेवारीनुसार, त्यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १.४ लाख कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. विक्रीचा वेग २०२२-२३ मध्ये कमी झाला असला तरी तो ३७,६३२ कोटी रुपयांच्या घरात राहिला. भांडवली बाजारातून निधी काढून घेण्याआधी त्यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विक्रमी २.७ लाख कोर्टींची गुंतवणूक केली होती, तर त्याआधी २०१९-२० मध्ये ६,१५२ कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक केली होती. १९९३ मध्ये परकीय गुंतवणुकीला सुरुवात झाल्यापासून, सलग दोन आर्थिक वर्षांसाठी परदेशी गुंतवणूकदार हे नक्त विक्रेते असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा: ‘या’ बँका कमी व्याजावर देतात लाखो रुपयांचे वैयक्तिक कर्ज, परतफेड करण्यासही मिळणार बराच अवधी

जागतिक पतविषयक आक्रमक धोरण, खनिज तेलाच्या अस्थिर किमती, रशिया-युक्रेन संघर्षामुळे वस्तू-सेवा महागणे याचा नकारात्मक परिणाम म्हणून भारतीय भांडवली बाजारातून पैसा बाहेर पडला. देशांतर्गत आघाडीवरही परिस्थिती उत्साहवर्धक नव्हती. चलनवाढ चिंतेचे कारण बनल्याने रिझर्व्ह बँकेने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आक्रमकपणे रेपो दर वाढवले, ज्यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या शक्यतांवर मंदीची छाया पडली.

– हिमांशू श्रीवास्तव, संशोधन व्यवस्थापक, मॉर्निंगस्टार इंडिया

Story img Loader