जागतिक बाजारा (Global Cues) मध्ये घसरण सुरूच आहे. जागतिक बाजारातील घसरणीमुळे आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल रंगात व्यापार करीत आहेत. सेन्सेक्समध्ये ३२०.६३ अंकांनी घसरण पाहायला मिळत असून, तो ६५,५१९.०८ च्या पातळीवर व्यवहार करीत आहे. याशिवाय निफ्टी निर्देशांकातील १०६ अंकांच्या घसरणीमुळे तो १९,५१८.७० च्या पातळीवर व्यवहार करीत आहे. तसेच सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ५ पैशांनी घसरून ८३.१८ रुपयांवर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकन बाजारांमध्ये आजही येथे घसरण दिसून आली आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी चलनवाढीच्या संदर्भात एक विधान जारी केले आहे, ज्यामुळे जागतिक बाजारात विक्री झाली. वाढत्या व्याजदरांच्या चिंतेमुळे अमेरिकन बाजार दबावाखाली आहे. डाऊ जोन्स जवळपास ०.७५ टक्क्यांनी घसरला आहे. तसेच नॅस्डॅकमध्येही घसरण दिसून येत आहे.

कोणते शेअर्स विकले जात आहेत?

सेन्सेक्स शेअर्सच्या घसरणीबद्दल बोलायचे झाल्यास आज ITC शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री होत आहे. याशिवाय पॉवर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, एनटीपीसी, एलटी, अल्ट्रा केमिकल, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टायटन यासह अनेक समभागांमध्ये विक्री होताना दिसत आहे.

हेही वाचाः मॅगी बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने कमावले ९०० कोटी रुपये, तीन महिन्यांत झाली जबरदस्त कमाई

नेस्लेसह ‘या’ समभागांमध्ये खरेदी वाढली

याशिवाय जर आपणाला तेजीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर आज नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, कोटक बँक, टीसीएस, रिलायन्स, सन फार्मा, एचडीएफसी बँक आणि मारुती यांचे शेअर्स वधारत आहेत.

हेही वाचाः २४ तासांच्या आत सोन्याचे दर ६० हजारांच्या खाली घसरले, सोने-चांदी किती स्वस्त झाले?

कोणत्या क्षेत्रात विक्री होते?

क्षेत्रीय निर्देशांकात आज निफ्टी बँक, फायनान्शिअल बँक, FMCG, IT, मेटल, फार्मा, PSU बँक, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल आणि तेल व वायू क्षेत्रे लाल रंगात दिसत आहेत. याशिवाय तेजीच्या क्षेत्रांमध्ये निफ्टी ऑटो, मीडिया, प्रायव्हेट बँक आणि निफ्टी रिअॅल्टी क्षेत्रांमध्ये तेजी आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global markets fall after fed reserve statement sensex nifty also falls nestl shares rise vrd
Show comments