‘माझा पोर्टफोलियो’ या साप्ताहिक सदरातून गुंतवणुकीसाठी शेअर्स सुचविले जातात. हे सुचविलेले शेअर्स म्हणजे खरेदीची टीप नसून एक अभ्यासपूर्ण विवेचन असते. तुमचा पोर्टफोलियो तयार करताना सदरात सुचविलेल्या शेअरचादेखील विचार करावा. परंतु, तो स्वतः अभ्यासूनच. या सदराचे उद्दिष्ट केवळ सुचविलेले शेअर्स खरेदी करणे हे नसून वाचक-गुंतवणूकदारांनी लेखात दिलेल्या गुणोत्तराखेरीज आपलेही इतर निकष लावून मगच गुंतणूक करावी हा आहे. अनेक वाचकांनी ‘पोर्टफोलियो’ कसा करावा, शेअर्स कसे निवडावेत किंवा शेअर्स निवडताना इतर कुठले निकष लावावेत, असे प्रश्न विचारले होते. दर महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत.

‘पोर्टफोलियो’ कसा असावा?

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला आपला ‘पोर्टफोलियो’ सुरक्षित तसेच उत्तम परतावा देणारा असावा, असे वाटत असते आणि ते साहजिकच आहे. ‘पोर्टफोलियो’साठी कंपन्या निवडताना तो समतोल राहील याची काळजी घ्यायला हवी. ‘पोर्टफोलियो’त २० पेक्षा जास्त कंपन्या नसाव्यात. परंतु, त्याच वेळी पोर्टफोलियो वेगवेगळया क्षेत्रातील कंपन्यांनी समतोल आहे ना, याचीही खात्री करून घ्यायला हवी. पोर्टफोलियोत शेअर्स निवडताना ते कुठल्या क्षेत्रातील निवडावेत, तसेच त्याला कुठले निकष लावावेत, हे आजच्या लेखात आपण अभ्यासणार आहोत.

Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या राशीसाठी ठरेल लाभदायक? बाप्पा करणार का तुमच्या इच्छा पूर्ण; वाचा सोमवारचे राशिभविष्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
Ajit Pawar Questionnise the voters of Baramati about the retirement of Sharad Pawar Pune print news
शरद पवारांंच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार यांची बारामतीतील मतदारांना विचारणा
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Impact of US Elections 2024 on Indian Stock Market
दुरावलेला खरेदी उत्साह बाजारात परत दिसेल?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य

हेही वाचा – बाजारातील माणसं : अजय पिरामल – निपुण व्यवहार कारागिरी

– सर्वप्रथम किती गुंतवणूक करायची आहे आणि उद्दिष्ट काय हे ठरविणे आवश्यक आहे. ही गुंतवणूक तुम्ही टप्प्याटप्प्यानेही करू शकता. उदा. दर तीन अथवा सहा महिन्यांनी किंवा वार्षिक.

– गुंतवणुकीचा कालावधी. उदा. गुंतवणूक अल्प काळासाठी (एक वर्षाच्या आतील) आहे की दीर्घकालीन (किमान १२ महीने).

– शेअर खरेदी करण्याआधी सेक्टर (क्षेत्र) निवडा.

– पोर्टफोलियो १५ ते २० कंपन्यांच्या शेअर्सचा असावा. प्रत्येक कंपनी वेगळ्या सेक्टरमधील असावी.

– पोर्टफोलिओत एकाच समुहाचा समावेश करू नये. उदा. रिलायन्स, टाटा, बिर्ला. पोर्टफोलिओत एका समुहाच्या जास्तीत जास्त दोन कंपन्या असाव्यात.

– पोर्टफोलियोमध्ये ब्ल्यू चिप, डिफेन्सिव्ह, ग्रोथ, सायक्लिकल अशा विविध प्रकारच्या शेअर्सचा समावेश असावा, त्यामुळे गुंतवणुकीतील धोका कमी होतो.

– प्रत्येक शेअरचा धारण कालावधी (होल्डिंग पीरियड) तसेच इच्छित किंमत (टारगेट प्राइस) निश्चित करावी. ठरविलेल्या कालावधीत हवी तशी किंमत न मिळाल्यास प्रसंगी तोटा सहन करून विक्री करण्याचे धोरण ठरवावे.

– पोर्टफोलियोचा सतत आढावा घ्यावा. आवश्यक वाटल्यास त्यात वेळोवेळी बदल करावेत.

– एकाच वेळी संपूर्ण गुंतवणूक करू नका. नियोजनपूर्वक आणि वेळोवेळी केलेली गुंतवणूक नेहमी फायद्याची ठरते. दरमहा ठरावीक दिवशी शेअर खरेदी करण्याची सोय अनेक कंपन्या पुरवतात. ही ‘एसआयपी’ पद्धत गुंतवणुकीतील धोका कमी करते.

– पोर्टफोलियोची द्र्वनीयता (लिक्विडिटी) बघा. हवे तेव्हा बाहेर पडता आले पाहिजे.

– सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गुंतवणुकीसाठी कुठली चांगली संधी वाटत नसेल तर गुंतवणूक करणे टाळा. नुकसान सहन करण्यापेक्षा अनेक वेळा बँकेतील व्याज चांगला परतावा ठरू शकतो.

‘पोर्टफोलियो’साठी कंपन्या कशा निवडाल?

खरं तर या प्रश्नाचं गमतीशीर पण तितकंच खरं असं उत्तर माझ्या एका मित्राने दिलं होतं. तो म्हणतो – “तुम्ही सुपर मार्केटमध्ये जाता तेव्हा कुठले ब्रॅंड खरेदी करता. बस, त्याच कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे. अगदी सुरक्षित गुंतवणूक. टुथपेस्ट कुठली घ्यायची – कोलगेट, साबण – लक्स अथवा सिन्थॉल, पावडर- पाँन्ड्स, चहा – ताज – टाटा टी, तेल – पॅराशूट वा बजाज अल्मंड… बस, मग हे ब्रॅंड कुठल्या कंपनीचे आहेत ते शोधा आणि खरेदी करा.”

हेही वाचा – आहे मनोहर तरी!

इतकी वर्षे शेअर बाजारात काढल्यावर मला एक महत्त्वाची आणि गमतीशीर गोष्ट समजून चुकली आहे. या बाजारात ९० टक्के लोकांना/गुंतवणूकदारांना “आपल्याला” कळत नाही हे कळत नसते आणि १० टक्के लोकांना फार थोडी माहिती असते. कितीही सुशिक्षित गुंतवणूकदार असला तरीही त्याची मानसिकता अनेकदा निरक्षर गुंतवणूकदारासारखीच असते. एखादा शेअर कमी किमतीत उपलब्ध असला (पेनी स्टॉक) म्हणजे तो शेअर गुंतवणुकीसाठी चांगला, असे समजणारे अनेक शहाणे तुम्हाला भेटतील. रूफिट इंडस्ट्रीज, कार्ल्स रिफायनरीज, तुलिप टेलीकॉम, व्हिडिओकॉन इ. कंपन्यांत अनेक उच्चशिक्षित लोकांनी पैसे घालवल्याची उदाहरणे आहेत. केवळ पुस्तकी मूल्य, प्राइस अर्निंग गुणोत्तर किंवा त्या वर्षातील नफा तपासून एखादा शेअर खरेदी करणेदेखील चुकीचे ठरू शकते.

‘पोर्टफोलियो’साठी कुठल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावेत आणि संशोधन कसे करावे हे महत्त्वाचे आहे. ती माहिती पुढील भागात…

Stocksandwealth@gmail.com