मुंबई :  दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंडाई चालू वर्षाअखेरीस प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून सुमारे २५,००० कोटी रुपये (किमान ३ अब्ज अमेरिकी डॉलर) उभारण्याचा विचार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.ह्युंडाईची भारतातील उपकंपनी – ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड ही आघाडीच्या वाहन निर्माता मारुती सुझुकी इंडियानंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी मोटार निर्माता कंपनी आहे. भांडवली बाजारातून सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी प्रवर्तकांकडून कंपनीतील १५ ते २० टक्के भागभांडवली मालकी कमी केली जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समभागचा या प्रस्तावित ‘आयपीओ’ने ठरल्याप्रमाणे बाजाराला धडकल्यास, आपल्या भांडवली बाजारातील ती समभाग विक्रीद्वारे सर्वात मोठी निधी उभारणी ठरेल. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या आजवरच्या सर्वात मोठ्या जवळपास २१,००० कोटी रुपयांच्या समभाग विक्रीलाही ती मागे टाकणारी ठरेल.

हेही वाचा >>>Money Mantra : माझा पोर्टफोलियो :  पोर्टफोलियोची शान.. एशियन पेंट्स लिमिटेड

यासंदर्भात संपर्क साधला असता कंपनीने अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शवला. ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडने १९९६ मध्ये भारतात कार्यान्वयन सुरू केले आणि सध्या मोटार विभागांमध्ये तिच्या १३ मॉडेल विकल्या जातात. कंपनीची देशभरात १,३६६ विक्री केंद्रे आणि १,५४९ सेवा केंद्रांचे जाळे फैलावलेले आहे.