वृत्तसंस्था, नवी दिल्ली
वाहननिर्मिती क्षेत्रातील ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडे प्राथमिक अर्ज सादर केला आहे. कंपनी या माध्यमातून २५ हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार असून, हा देशातील आजवरचा सर्वांत मोठा ‘आयपीओ’ ठरण्याची शक्यता आहे.

कोरियातील कंपनीच्या या उपकंपनीचा हा ‘आयपीओ’ मागील २० वर्षांतील कोणत्याही वाहन निर्मात्या कंपनीकडून देशाच्या भांडवली बाजाराला आजमावण्याचा पहिलाच प्रसंग असेल. या आधी मारूती सुझुकी कंपनीचा आयपीओ २००३ मध्ये आला होता. या खुल्या समभाग विक्रीनंतर ह्युंदाईचे बाजारमूल्य १.५ लाख कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे. ‘सेबी’कडे दाखल मसूदा प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कंपनी हा सर्वांत मोठा आयपीओ बाजाराला धडक देण्याची शक्यता आहे.

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
ED raids Maharashtra, maharashtra assembly election 2024
निवडणूक गैरप्रकारासाठी १२५ कोटी रुपयांचा वापर, ‘ईडी’ने महाराष्ट्रातील २४ ठिकाणी छापे टाकले
maharshtra electoral history
महाराष्ट्राची निर्मिती, काँग्रेसचे वर्चस्व, हिंदुत्वाचा उदय; महाराष्ट्र निवडणुकीचा इतिहास काय सांगतो?
Stree 2 box office collection
‘स्त्री २’ नव्हे तर ‘हा’ आहे २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट; जगभरात कमावले तब्बल…
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

हेही वाचा >>>बाजारातली माणसं : वर्तमानात भविष्याची वाट दाखवणारा – ख्रिस्तोफर वुड

दक्षिण कोरियातील पालक कंपनीकडून ह्युंदाई मोटार इंडियातील १७.५ टक्के हिस्सा या आयपीओच्या माध्यमातून विकला जाईल. मारूती सुझुकीनंतर ह्युंदाई ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वाहन निर्मिती आणि निर्यातदार कंपनी आहे. कंपनी नवीन समभागांची विक्री आयपीओच्या माध्यमातून करणार नाही. याऐवजी सध्याचे भागधारक कंपनीतील त्यांचा समभाग हिस्सा कमी करून त्याची विक्री किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना आयपीओच्या माध्यमातून करतील.

देशातील पाच मोठ्या निधी-उभारणी
कंपनी        निधी उभारणी (कोटी रु.)        सूचिबद्धता तारीख
एलआयसी       २१,००८.४८    १७ मे २०२२
पेटीएम            १८,३००              १८ नोव्हें. २०२१
व्होडाफोन-आयडिया       १८,०००    २५ एप्रिल २०२४
कोल इंडिया लि.          १५,१९९.४४     ४ नोव्हें. २०१०
येस बँक            १५,०००          २७ जुलै २०२०
(यापैकी व्होडाफोन-आयडिया आणि येस बँके यांचे ‘एफपीओ’)

‘ई-व्ही’ किंमत स्पर्धात्मकतेवर भर

ह्युंदाई मोटर इंडिया भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) किंमतीच्या आघाडीवरील स्पर्धात्मकता वाढवण्याचा विचार करत असून, त्या दिशेने सेल, बॅटरी पॅक, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि ड्राईव्हट्रेन यांसारख्या प्रमुख भागांसाठी स्थानिक उत्पादन क्षमता विकसित करण्यावर आणि स्थानिक पुरवठा साखळी तयार करण्यावर ती लक्ष केंद्रित करत आहे. ‘आयपीओ’ तारखेच्या आसपास आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत क्रेटा ईव्हीसह भविष्यात, प्रत्येक किंमत विभागामध्ये आदर्श ठरेल अशी चार ई-व्ही मॉडेल्स आणण्याची तिची योजना आहे.