Hyundai Motor IPO : ह्युंदाई मोटरने (Hyundai Motor) आजपासून (२२ ऑक्टोबर) आयपीओ (IPO) सूचिबद्ध झाला. ह्युंदाई मोटरचा शेअर १,९३१ रुपयांना मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध झाला. भारतीय भांडवली बाजारातील हा सर्वात मोठा आयपीओ आहे. कंपनीने आयपीओमध्ये १ हजार ८६५ रुपये ते १ हजार ९६० या श्रेणीत रुपये १० चे दर्शनी मूल्य असलेल्या एका इक्विटी शेअरची किंमत ठेवली आहे.
दरम्यान, भारतीय भांडवली बाजारात कंपनीचे शेअर्स २.४ टक्के प्रीमियमवर ट्रेडिंग करत होते. ज्यामुळे गुंतवणूकदारांना काही नफा मिळण्याची अपेक्षा होती. आयपीओ (IPO) सूचिबद्ध होण्याच्या आधी हुंदाई मोटरच्या (Hyundai Motor) शेअर्समध्ये मार्केट प्रीमियममध्ये सतत घसरण होत होती. मात्र, आता ह्युंदाई मोटर्स इंडियाचा आयपीओ भारतीय शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच शेअर गडगडला. कंपनीने प्रत्येक इक्विटी शेअरसाठी आयपीओ प्राइस १८६५ ते १९६० या दरम्यान ठेवली.
हेही वाचा : ऐतिहासिक ७७,७०१ कोटींची विदेशी गुंतवणूक ऑक्टोबरमध्ये माघारी, सेन्सेक्स, निफ्टीच्या घसरणीत आणखी विस्तार
ह्युंदाई मोटर इंडियाची बहुप्रतिक्षित प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) गुंतवणूकदारांसाठी खुली झाली आहे. यासाठी प्रति समभाग किंमतपट्टा १,८६५ ते १,९६० रुपये आहे. दक्षिण कोरियातील मोटार निर्मिती कंपनी ह्युंदाईची उपकंपनी असलेली ह्युंदाई मोटार इंडिया या आयपीओच्या माध्यमातून २५ हजार कोटी रुपये उभारणार आहे.
आधी कोणते मोठे आयपीओ लाँच झाले होते?
हुंदाई मोटरने आयपीओ खुला केला होता. हुंदाई मोटरचा शेअर १,९३१ रुपयांना मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध झाला आहे. भारतीय भांडवली बाजारातील हा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. याआधीही आयुर्विमा कंपनीचा आयपीओ मे २०२२ मध्ये लाँच झाला होता. तसेच नोव्हेंबर २०२१ मध्ये पेटीएमनेही आपला लॉन्च लाँच केला होता. त्यामुळे आता ह्युंदाईचा आयपीओ लाँच होऊन गुंतवणूकदारांना फायदा होईल का? हे देखील महत्वाचं आहे.
आयपीओ म्हणजे काय?
जे नियमितपणे शेअर बाजारात पैसे गुंतवतात त्यांना ‘आयपीओ’ची संकल्पना माहिती असली तरी नवीन वाचकांसाठी ही प्रक्रिया समजून घेणं महत्वाचं आहे. एखाद्या कंपनीला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. ते भांडवल उभे करण्यासाठी कंपन्या आपले समभाग गुंतवणूकदारांना बाजारामध्ये उपलब्ध करून देतात. कंपनीच्या व्यवसायाचे प्रारूप, भविष्यात संभावणारे धोके आणि नफ्याची क्षमता याचा अंदाज घेऊन आयपीओमध्ये पैसे गुंतवायचे किंवा नाही याचा निर्णय घ्यायचा असतो.
आयपीओच्या माध्यमातून कंपनी आपल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचे जणूकाही आवाहन गुंतवणुकदारांना करते. जेवढे समभाग कंपनीला द्यायचे असतात त्याच्या तुलनेत समभागांना अधिक मागणी आली म्हणजेच अधिकाधिक लोकांनी समभाग खरेदी करण्याची इच्छा दर्शवली तर त्याला ‘ओव्हरसबस्क्राइब’ असे म्हणतात. अशा वेळी समभागांना मागणी जास्त असते हे त्यातून स्पष्ट दिसते. कंपनीचे समभाग एकदा सूचिबद्ध झाले की, ज्या गुंतवणुकदारांना आयपीओच्या माध्यमातून मिळत नाहीत ते आता बाजारमंचावरून खरेदी करू शकतात. अशा वेळी मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्यास शेअरची किंमत सूचिबद्ध (लिस्टिंग) झाल्यावर लगेचच वाढते.