मुंबई: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज अँड मिडकॅप फंडाने एक, दोन आणि तीन वर्षांच्या कालावधीत या श्रेणीतील अन्य फंडांच्या तुलनेत सरस कामगिरी करताना अनुक्रमे १७.३ टक्के, १७.५ टक्के आणि २३.८ टक्के असा सर्वोत्तम परतावा दिला. इतकेच नव्हे तर या फंडाने एक, दोन आणि तीन वर्षांत संदर्भ निर्देशांकाच्या (निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टोटल रिटर्न इंडेक्स) परताव्याला देखील अनुक्रमे ६.७ टक्के, ५.८ टक्के आणि २.४ टक्क्यांनी मागे टाकले आहे.
लार्ज आणि मिडकॅप फंड ही एक समभागसंलग्न योजना असून, निधी व्यवस्थापक लार्ज आणि मिडकॅपमध्ये प्रत्येकी किमान ३५ टक्के या प्रमाणात गुंतवणूक करतात. उर्वरित ३० टक्क्यांचे स्मॉलकॅपसह विविध बाजार भांडवल प्रकारामध्ये लवचीकपणे वाटप केले जाऊ शकते. समंजस समभाग निवड आणि स्मॉल कॅपमधील उच्च जोखीम पाहता गुंतवणुकीसाठी नकारात्मक सूचीचा दृष्टिकोन यांना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज अँड मिडकॅप फंडाच्या मजबूत कामगिरीचे श्रेय दिले जाऊ शकते. नकारात्मक सूची म्हणजे कमकुवत ताळेबंद किंवा कमकुवत व्यवसाय प्रारूप असलेल्या कंपन्यांना संभाव्य गुंतवणुकीपासून दूर राखणे. या गुंतवणूक दृष्टिकोनामुळे फंडाला वेगवेगळ्या कालावधीत चांगल्या कामगिरीचा प्रत्यय देण्यास मदत झाली आहे.
सध्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या या फंडाच्या गुंतवणुकीचे वाटप लार्ज कॅपसाठी ५८ टक्के, मिडकॅपसाठी ३८ टक्के आणि स्मॉलकॅपसाठी ४ टक्के असे आहे. फंडातील स्मॉल कॅपसाठी जास्तीत जास्त वाटप १५ टक्के राखले गेले आहे. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये बँक, वित्त, वाहन उद्योग, औषधी निर्माण आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. पोर्टफोलिओ बांधणीचा विचार करताना, देशांतर्गत आणि जागतिक संरचनात्मक बदलांमुळे व्यवसाय चक्रांवर परिणामाने चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.
चांगली कामगिरी करणारे लार्ज आणि मिड कॅप फंड:
फंड / परतावा एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षं
आयसीआयसीआय प्रु. १७.२७ १७.५२ २३.७८
एचडीएफसी १४.७६ १४.३५ २३.९३
कोटक १४.१३ १२.१० १९.०५
एसबीआय १४.०४ १५.७० २०.७०
डीएसपी १२.०९ १०.१९ १७.७४
(७ मार्च २०२३ पर्यंतची आकडेवारी, स्रोत – व्हॅल्यू रिसर्च)