मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने शुक्रवारी दमदार १,२९२ अंशांची मुसंडी घेतली, तर निफ्टी पुन्हा एकदा विक्रमी उच्चांकावर विराजमान झाला. सलग पाच सत्रांतील घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी पडलेल्या किमतीवर समभागांची खरेदी केली. यामध्ये इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या मोठ्या कंपन्यांच्या समभाग खरेदीला प्राधान्य दिसून आले.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,२९२.९२ अंशांनी वधारून ८१,३३२.७२ पातळीवर स्थिरावला. सत्रांतर्गत त्याने १,३८७.३८ अंशांची कमाई करत ८१,४२७.१८ ही उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ४२८.७५ अंशांची उसळी घेतली आणि तो २४,८३४.८५ या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला. निफ्टीने सत्रांतर्गत २४,८६१.१५ या विक्रमी शिखराला स्पर्श केला होता. गेल्या शुक्रवारपासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण सुरू होती. आधीच्या पाच सत्रांत मिळून, सेन्सेक्स १,३०३.६६ अंशांनी घसरला, तर निफ्टीने ३९४.७५ अंश गमावले आहेत.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

हेही वाचा >>>आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक विक्रीला वेग; संभाव्य खरेदीदारांवर रिझर्व्ह बँकेचे शिक्कामोर्तब लवकरच

जागतिक पातळीवर अमेरिकेच्या सकारात्मक सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) मजबूत वाढीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील भांडवली बाजार सावरले. गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, तिमाहीत अमेरिकेच्या जीडीपीत २.८ टक्के अशी सार्वत्रित अपेक्षेपेक्षा मजबूत वाढ दिसून आली. याचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले आणि केंद्रीय अर्थसंकल्पानंतर झालेल्या पडझडीतून बाजार सावरताना दिसून आले. गुंतवणूकदार ‘बाय-ऑन-डीप’ म्हणजेच समभागांच्या किमतीत घसरण झाल्यानंतर खरेदीचे धोरण अवलंबताना दिसत आहेत. कंपन्यांची तिमाही कामगिरी पाहून ते विशिष्ट कंपन्यांच्या समभागांवर लक्ष केंद्रित करत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, सर्व क्षेत्रीय निर्देशांक शुक्रवारी सकारात्मक पातळीवर स्थिरावले. यात धातू आणि माहिती-तंत्रज्ञान निर्देशांक आघाडीवर राहिले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअलचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील नेस्ले वगळता सर्व कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले. यामध्ये भारती एअरटेल ४.५१ टक्क्यांसह अग्रेसर राहिला. अदानी पोर्ट्स, सन फार्मा, टाटा स्टील, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील आणि महिंद्र अँड महिंद्र यांचे समभाग तेजीत होते.

हेही वाचा >>>Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! सोन्याचे भाव कोसळले; १० ग्रॅमचा भाव ऐकून आताच सराफा बाजार गाठाल!

गुंतवणूकदार ७.१० लाख कोटींनी श्रीमंत

भांडवली बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या मत्तेत शुक्रवारच्या सत्रात ७.१० लाख कोटींनी भर पडली. शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्सने १,३०० अंशांची झेप घेतल्याने मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ७,१०,२३५.४५ कोटींनी वाढून ते ४५६.९२ लाख कोटी (५.४६ ट्रिलियन डॉलर) रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहे.

सेन्सेक्स ८१,३३२.७२ १,२९२.९२ (१.६२%)

निफ्टी २४,८३४.८५ ४२८.७५ (१.७६%)

डॉलर ८३.७२ -६ पैसे

तेल ८२.०४ -०.४०

Story img Loader