मुंबईः प्रतिष्ठित किर्लोस्कर समूहाचे अंग असलेली बँकेतर वित्तीय कंपनी अर्का फिनकॅप लिमिटेडने प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्याचे सुरक्षित, विमोचन करण्यायोग्य अपरिवर्तनीय रोख्यांच्या (नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर – एनसीडी) सार्वजनिक विक्रीतून ३०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. गुरुवार, ७ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या रोखे विक्रीचे जेएम फायनान्शियल आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वीची एडेलवाइज सिक्युरिटीज) यांच्याकडून व्यवस्थापन पाहिले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… बँकांच्या बुडीत, निर्लेखित कर्जांवर श्वेपत्रिकेची मागणी, दोषींवर कारवाईचाही बँक कर्मचारी संघटनेचा आग्रह

या रोख्यांवर त्रैमासिक आणि वार्षिक व्याज पर्यायासह ९ टक्के ते १० टक्के वार्षिक दराने व्याज (कूपन दर) गुंतवणूकदारांना मिळविता येईल. हे रोखे २४ महिने, ३६ महिने आणि ६० महिने अशा तीन मुदत कालावधीचे आहेत. २० डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीस खुल्या असलेल्या या रोख्यांना, क्रिसिल रेटिंग्स लिमिटेडद्वारे ‘क्रिसिल एए-/सकारात्मक’ असे मानांकन मिळविले आहे. विक्रीपश्चात रोखे मुंबई शेअर बाजारावर सूचिबद्ध करणे प्रस्तावित आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the kirloskar group a non banking financial company appealed investors about sale of non convertible bonds print eco news asj
Show comments