सेन्सेक्समधील वजनदार कंपन्या असलेल्या आयटीसी आणि स्टेट बँकेने सरलेल्या मार्च तिमाहीत चमकदार आर्थिक कामगिरी नोंदवली. परिणामी गुंतवणूकदारांनी गुरुवारच्या सत्रात त्यात नफावसुलीला प्राधान्य दिल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये शतकी घसरण झाली. दिवसातील बहुतांश काळ सेन्सेक्सने सकारात्मक पातळीवर व्यवहार केल्यानंतर अखेर तो १२८.९० अंशांनी घसरून ६१,४३१.७४ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ६१,९५५.९० हा उच्चांक आणि ६१,३४९.३४ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५१.८० टक्क्यांनी घसरून १८,१२९.९५ पातळीवर स्थिरावला.

अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र संकटातून सावरत असल्याच्या सकारात्मक घडामोडींमुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये त्याचे सकारात्मक पडसाद उमटले. मात्र, देशांतर्गत बाजारात नफावसुली झाल्याने अखेरच्या तासात मंदीवाल्यांनी ताबा मिळविला. निफ्टी वायदेबाजारातील किमतीवर आधारित असलेल्या इंडिया व्हीआयएक्स निर्देशांक खाली आल्याने तो बाजारातील स्थिरता, गुंतवणूकदारांमधील वाढता विश्वास आणि दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे वातावरण असल्याचे सूचित करतो, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
Rupee depreciated by 5 paise against the dollar
ढासळता रुपया नव्या तळाला; डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ८४.३७ चा नीचांक
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर

हेही वाचाः बाजारातील परदेशी वित्ताला घरघर; मार्च तिमाहीत गुंतवणुकीत ११ टक्क्यांनी घट

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये आयटीसी, स्टेट बँक, टायटन, पॉवर ग्रिड, लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. मार्च २०२३ अखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत आयटीसीने २२.६६ टक्क्यांची वाढ नोंदवत ५,२२५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. तरीही आयटीचे समभाग २ टक्क्यांनी घसरले. तर पत गुणवत्तेत सुधारणा आणि निव्वळ व्याजापोटी उत्पन्नात वाढीमुळे चौथ्या तिमाहीत स्टेट बँकेने १६,६९४ कोटींचा विक्रमी निव्वळ नफा नोंदवूनही बँकेच्या समभागात १.७७ टक्क्यांची घसरण झाली.

हेही वाचाः महिला सन्मान बचतपत्रावर मिळणारे व्याज करपात्र; पण…