भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ची अदाणी समूहातील सात कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य ४४,६७० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हिंडेनबर्ग अहवालातील आरोपांमुळे समभाग मूल्यातील पडझडीने अडचणीत आलेल्या अदाणी समूहावर सरकारी मालकीच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने मात्र विश्वास दाखवत प्रत्यक्षात गुंतवणूक वाढवली होती. ‘एलआयसी’ने अदाणी समूहातील कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य विद्यमान वर्षातील एप्रिल महिन्यापासून ५,५०० कोटी रुपयांनी वाढले आहे.

‘एलआयसी’ची सर्वाधिक गुंतवणूक अदाणी समूहातील अदाणी पोर्ट्समध्ये आहे. त्यात ९.१२ टक्के हिस्सेदारी असून, मुंबई शेअर बाजारातील समभागाच्या ७१७.९५ या बंदभावानुसार गुंतवणुकीचे बाजारमूल्य १४,१४५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडमध्ये ४.२५ टक्के हिस्सेदारी असून, बुधवारच्या २,४७६.९० रुपये या बंद भावानुसार १२,०१७ कोटी रुपये मूल्य झाले आहे. तर अदाणी टोटल गॅस लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट या दोहोंमधील गुंतवणुकीचे मूल्य १०,५०० कोटी रुपये आहे. अदाणी समूहातील अदाणी ट्रान्समिशन लिमिटेड, अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि एसीसी या कंपन्यांमध्येदेखील ‘एलआयसी’ची मोठी गुंतवणूक आहे.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
sensex drops 110 points nifty settles at 23532
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ

हेही वाचाः गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे सेन्सेक्समध्ये २०० अंशांची घसरण

विद्यमान वर्षातील जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर झालेल्या हिंडेनबर्ग अहवालानंतर अदाणी समूहातील सर्वच कंपन्यांचे बाजार भांडवल घसरले होते. परिणामी, अदाणी समूहातील गुंतवणूकदारांचे एकूण गुंतवणूक मूल्यदेखील लक्षणीयरीत्या घटले होते आणि एलआयसीच्या गुंतवणुकीलाही याचा जबर तडाखा बसला होता. तरीही सरलेल्या मार्च तिमाहीत एलआयसीने अदाणी समूहातील गुंतवणुकीत वाढ केली. भांडवली बाजाराकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, ‘एलआयसी’च्या अदाणी समभागातील गुंतवणुकीचे मूल्य २४ जानेवारीला सुमारे ८१,२३६ कोटी रुपये होते. मात्र, हिंडेनबर्ग अहवालातील आरोपांनंतर अदाणी समूहातील सर्वच कंपन्यांमधील गुंतवणुकीचे मूल्य २४ फेब्रुवारी रोजी २९,८९३.१३ कोटी रुपयांपर्यंत घसरले होते.

हेही वाचाः अब्जाधीशांच्या यादीत मोठा उलटफेर, गौतम अदाणींनी मारली बाजी; अ‍ॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांची क्रमवारी घसरली

कंपनी हिस्सेदारी (३१ मार्च २०२३) (३१ डिसेंबर २०२२)
अदाणी एंटरप्रायझेस ४.२६% ४.२३% ( ०.०२%)

अदाणी ट्रान्समिशन ३.६८% ३.६५% ( ०.०३% )
अदाणी ग्रीन १.३५% १.२८% ( ०.०७%)

अदाणी टोटल गॅस ६.०२% ५.९६% ( ०.०६%)
अदाणी पोर्ट्स ९.१२% ९.१४% (-०.०२%)

अंबुजा ६.२९% ६.३३% (-०.०४%)
एसीसी ५.१३ % ६.४१% (-१.३१%)