लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : आरोग्यसुविधा तंत्रज्ञान क्षेत्रातील इंडेजीन लिमिटेड कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत असल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. या माध्यमातून कंपनीची १,८४२ कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची योजना आहे.
इंडेजीनने आयपीओसाठी प्रतिसमभाग ४३० ते ४५२ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. सुकाणू गुंतवणुकदारांसाठी आयपीओची विक्री ३ मे रोजी खुली होईल. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी ती ६ मे रोजी सुरू होईल आणि ८ मे रोजी बंद होईल.
आयपीओच्या माध्यमातून कंपनी नव्याने ७६० कोटी रुपयांचे समभाग प्रस्तुत करणार असून, ऑफर फॉर सेलच्या (ओएफएस) माध्यमातून कंपनीचे २.३४ कोटी समभाग विक्रीसाठी आणि त्यायोगे कंपनी १,०८२ कोटी रूपयांच्या समभागांची विक्री करणार आहे. तर नव्याने जारी समभागांच्या माध्यमातून आणखी ७६० कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे.
हेही वाचा >>>म्युच्युअल फंडांचा ‘सही’ विश्वास दाता! : ए. बालासुब्रमणियन
नव्याने जारी समभागांच्या विक्रीद्वारे उभारलेल्या निधीचा वापर कर्ज फेडण्यासाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, कंपनीने मागील काळात केलेल्या अधिग्रहणांपैकी एकासाठी स्थगित मोबदला देण्यासाठी, अजैविक वाढीसाठी वापरला जाण्याचे प्रस्तावित आहे.