मुंबई: जागतिक भांडवली बाजारातील कमकुवत कल, तसेच माहिती-तंत्रज्ञान, धातू आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या समभागांमध्ये झालेल्या नफावसुलीने प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात नकारात्मकता दर्शवत, ३५२ अंशांनी घसरणीसह ७३ हजाराच्या पातळीखाली स्थिरावला.
इन्फोसिस, टीसीएस, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसह या निर्देशांकात वजनदार स्थान असलेल्या समभागांवर विक्रीचा मारा झाल्याने प्रमुख निर्देशांकांना सलग दुसऱ्या सत्रात नकारात्मकतेने वेढले. एकंदर अस्थिरतेने ग्रस्त व्यवहारात सोमवारी मुंबई शेअर बाजारात मुख्य निर्देशांक सेन्सेक्स शुक्रवारच्या बंद पातळीच्या तुलनेत आणखी ३५२.६७ अंशांनी (०.४८ टक्के) घसरून ७२,७९०.१३ अंशांवर बंद झाला. या निर्देशांकातील ३० पैकी तब्बल २६ समभाग घसरले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ९०.६५ अंशांनी (०.४१ टक्के) घसरून दिवसअखेर २२,१२२.०५ अंशांवर बंद आल. या निर्देशांकात सामील ५० पैकी बहुतांश म्हणजेच ३७ समभाग घसरणीसह बंद झाले.

आदित्य बिर्ला समूहाची कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजने पेंट्स विभागात प्रवेश केल्यानंतर देशांतर्गत पेंट्स मार्केटमधील वाढत्या स्पर्धेबद्दल विश्लेषकांनी चिंता व्यक्त केल्याने सेन्सेक्स समभागांमध्ये एशियन पेंट्स सर्वाधिक ३.९ टक्क्यांनी घसरला. तर अमेरिकी अर्थव्यवस्थेत चलनवाढीची चिंता वाढल्यामुळे निर्यातप्रवण इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक, विप्रो आणि टेक महिंद्र या माहिती-तंत्रज्ञान समभागांनी घसरण अनुभवली. दुसरीकडे, लार्सन अँड टुब्रोने सर्वाधिक २.३६ टक्क्यांची वाढ साधली, तर पॉवर ग्रिड, हिंदुस्तान युनिलीव्हर आणि नेस्ले हे समभाग कमाईसह बंद झाले.

nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
cop 29 climate change conference in baku capital of azerbaijan
विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 26 February 2024: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, आजचा भाव काय?

व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात अनुक्रमे ०.३८ टक्के आणि ०.०६ टक्क्यांची घसरण सोमवारच्या सत्रात आढळून आली. मुंबई शेअर बाजारात एकंदर ४,१०८ समभागांचे व्यवहार झाले, त्यापैकी २,२६८ समभागांचे मूल्य घसरले, तर १,७१० समभागांचे मूल्य वधारले.

पेटीएमच्या समभागांत आणखी ५ टक्के वाढ

संकटग्रस्त तंत्रज्ञानाधारीत वित्तीय सेवा कंपनीचा समभाग सोमवारच्या व्यवहारात आणखी ५ टक्क्यांनी वाढून राष्ट्रीय शेअर बाजारावर ४२८.१० रुपयांवर पोहोचला. शेअर बाजारात सलग पाचव्यांदा समभागाने त्याची वरची सर्किट मर्यादा सोमवारी काहीशी घसरणीने सुरुवात करूनही गाठली. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला पेटीएम पेमेंट्स बँकेचे ग्राहक यूपीआय हँडल ‘@paytm’ वापरून इतर चार-पाच बँकांकडे तिचे व्यवहार स्थलांतरित करण्याच्या शक्यतेची तपासणी करण्यास सांगितले. मध्यवर्ती बँकेचे हे पाऊल दिलासादायी संकेत असल्याचे मानून समभागाने शुक्रवारच्या सत्रातही ५ टक्क्यांच्या कमाल मर्यादेपर्यंत वाढ साधली होती. दरम्यान दलाली पेढ्या मॉर्गन स्टॅन्ले,बर्नस्टाइन यांनी पेटीएमच्या समभागाचे नजीकच्या काळातील लक्ष्य वाढवून अनुक्रमे ५५५ रुपये आणि ६०० रुपये असल्याचे सांगणारे अहवाल प्रसिद्ध केले आहेत.