मुंबई: कॅनडा आणि भारतादरम्यान राजनैतिक संबंध ताणले गेल्याने त्याचे पडसाद भांडवली बाजारावर देखील उमटले. सीपीपीआयबी आणि सीडीपीक्यू या सारख्या कॅनडास्थिच पेन्शन फंड हे भारतातील काही प्रमुख कंपन्यांमध्ये सर्वात मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत, तसेच ७० अन्य सूचिबद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.

वाढत्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, कॅनडा पेन्शन फंडाची गुंतवणूक असलेल्या कोटक महिंद्र बँक, झोमॅटो, इंडस टॉवर, नायका या कंपन्यांचा समभागात विक्री वाढली आणि या समभागांमध्ये प्रत्येकी २.४ टक्क्यांपर्यंत घसरण गुरुवारी झाली. बाजार विश्लेषकांच्या मते, याचा दीर्घकाळ संमभागांवर परिणाम राहण्याची शक्यता नाही.

Story img Loader