Investment In Indian Share Market: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण होत असलयाचे पाहायला मिळत आहे. पण, असे असूनही, आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीला विश्वास आहे की, जागतिक स्तरावर कोणत्याही मोठ्या नकारात्मक घटना न घडल्यास, भारतीय शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकतं. मॉर्गन स्टॅनलीनं म्हटलं आहे की, सध्याचा करेक्शनचा (घसरण) टप्पा संपल्यानंतर, भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा इतर उदयोन्मुख शेअर बाजारांपेक्षा चांगली कामगिरी करू शकतील. दरम्यान हा बदल येत्या काही महिन्यांतच दिसून येईल, असंही मॉर्गन स्टॅनलीनं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरज नसलेल्या वस्तूंवरील खर्च वाढण्याची शक्यता

मॉर्गन स्टॅनलीनं म्हटलं आहे की, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे, जी शेअर बाजाराची मुख्य ताकद आहे. सुधारित व्यापार संतुलन, घटती वित्तीय तूट आणि कमी चलनवाढीचा दर हे दर्शवितात की अर्थव्यवस्था स्थिर आहे. मॉर्गन स्टॅनलीला पुढील ३-५ वर्षांत भारतीय कॉर्पोरेट उत्पन्न सुमारे १२-१८% वाढण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, खाजगी क्षेत्रातील भांडवली खर्चातही वाढ होईल आणि कॉर्पोरेट बॅलन्स शीट मजबूत होतील. याशिवाय, ग्राहकांचा खर्च वाढण्याची अपेक्षा आहे आणि गरज नसलेल्या वस्तूंवरील खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे.

ब्रोकरेजने म्हटले आहे की, २०२४ पर्यंत भारताचे दरडोई उत्पन्न २००० डॉलर्सच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे भारतीय ग्राहक आता अनावश्यक वस्तूंसाठी अधिकाधिक खर्च करतील हे दिसून येते.

विक्रीऐवजी खरेदीदारांची कमतरता

सध्याच्या करेक्शनमुळे, भारताचा बीटा इतर उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत ०.४ पर्यंत घसरला आहे. मॉर्गन स्टॅनलीने गेल्या महिन्यात सांगितले होते की, शेअर बाजारातील अलिकडच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत, परंतु बाजार लवकरच सावरू शकेल. मनोरंजक गोष्ट म्हणजे, शेअर बाजारातील अलिकडच्या करेक्शनबरोबरच व्यवहारात घट झाली आहे, ज्यामुळे आक्रमक विक्रीऐवजी खरेदीदारांची कमतरता दिसून येते, असे ब्रोकरेजने म्हटले आहे.

पहिल्यांदाच गुंतवणुकीचे संकेत

मॉर्गन स्टॅनलीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, “आमच्या प्रायोरिटी सेंटिंमेंट इंडिकेटरने २०२२ च्या मध्यापासून पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे संकेत दिले आहेत. जरी मार्च २०२० प्रमाणे बाजार थोडा अधिक घसरू शकते, तरी आम्हाला अर्थव्यवस्थेत मूलभूतपणे कोणतीही मोठी कमकुवतपणा दिसत नाही.”