आशीष ठाकूर

यंदा १ फेब्रुवारीला सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प नितांत सुंदर असल्याने, निफ्टी निर्देशांक आपला १७,९५० चा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर पार करण्याच्या तयारीत असतानाच, नेमके त्याच दिवशी अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणामुळे निफ्टी निर्देशांक कोसळला. त्या दिवशीची प्रत्येकाची एकच भावना होती अर्थसंकल्प आहे मनोहर तरी, पण निफ्टी निर्देशांक कोसळल्यामुळे गमते उदास भारी! अशा भावनांच्या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?

शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ६०,६८२.७० / निफ्टी: १७,८५६.५०

अर्थसंकल्प, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण, चलनवाढीची, सकल राष्ट्रीय उत्पादनाची आकडेवारी (जीडीपी वृद्धी दर), औद्योगिक विकास दर या अर्थक्षेत्रातील महत्त्वाच्या घटना किंबहुना ‘महत्त्वाचे वळणबिंदू’ असतात. हे महत्त्वपूर्ण आकडे जाहीर झाल्यानंतर प्रस्थापित धारणेला कलाटणी मिळू शकते. या घटनांची मानसिक, आर्थिक पूर्वतयारी म्हणजे ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू’ स्तर ही संकल्पना. २४ जानेवारी ते ३० जानेवारीच्या दरम्यान निफ्टी निर्देशांक १८,२०० वरून १७,४०५ पर्यंत खाली घसरलेला, त्यात भर म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेला ‘केंद्रीय अर्थसंकल्प’ अशा वेळेला भांडवली बाजाराच्या नजरेतून अर्थसंकल्पाचे विश्लेषण होणे गरजेचे असते. त्या दृष्टीने वाचकांसाठी विकसित केलेल्या ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेचा आधार घेत १७,९५० हा स्तर विकसित केलेला होता. आता अर्थसंकल्प सादर होऊन बारा दिवस उलटले तरी निफ्टी निर्देशांक १७,९५० चा स्तर पार करू शकलेला नाही. त्यामुळे अर्थसंकल्प ‘आहे मनोहर तरी’, निफ्टी निर्देशांक १७,९५० पार करू शकत नसल्याने ‘गमते उदास भारी’ अशी मनाची स्थिती आहे.

येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकावर १७,९५० ते १८,१०० च्या स्तराला ‘अनन्यसाधारण महत्त्व’ असेल.

भविष्यात निफ्टी निर्देशांकाने हा स्तर पार करत, या स्तरावर निर्देशांक पंधरा दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १८,३०० – १८,६०० – १८,९०० असे असेल, अन्यथा निफ्टी निर्देशांक १७,९५० ते १८,१०० चा स्तर पार करण्यास वारंवार अपयशी ठरल्यास आणि खालच्या बाजूला १७,८०० चा स्तर राखण्यास देखील अपयशी ठरल्यास, निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य १७,५०० व द्वितीय खालचे लक्ष्य १७,३१४ असेल.

शिंपल्यातील मोती — ॲफल इंडिया लिमिटेड

(शुक्रवारचा बंद भाव रु.१,०४९.०५)

जाहिरातीचा मुख्य उद्देश हा विविध कंपन्यांच्या उत्पादनांची माहिती देऊन, जाहिरात करून उत्पादनांचा खप व कंपनीला नवीन ग्राहक मिळवून देणे. बदलत्या काळानुसार हीच जाहिरात मोबाईलवर प्रकाशित /प्रदर्शित करणारी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेला ‘ॲफल इंडिया लिमिटेड’ हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ आहे.

कंपनीचा आर्थिक आढावा घेता डिसेंबर २०२१ मध्ये १११.२७ कोटींच्या विक्रीसमोर डिसेंबर २०२२ मध्ये १३७.२७ कोटींची विक्री साध्य करत, करपूर्व नफा १७.४० कोटींवरून २८.७३ कोटींवर, तर निव्वळ नफा १२.४७ कोटींवरून २१.४८ कोटींवर झेपावला. अशी ही उत्तम आर्थिक कामगिरी करणारी ही कंपनी मंदीप्रवण अशा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आहे हे सांगून खोटे वाटेल.

ॲफल इंडिया लिमिटेड समभागाची भांडवली बाजारातील वाटचाल पाहता १,००० ते १,२५० रुपयांच्या परिघात समभागाची सामान्य वाटचाल आहे. दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांना (गुंतवणूक कालावधी ३ ते ५ वर्षे) हा समभाग आता नजरेसमोर ठेवत बाजारात व समभागात जेव्हा मंदी येईल तेव्हा हा समभाग ९०० ते ८५० च्या दरम्यान घेता येईल. मात्र गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतवता वीस टक्क्यांच्या पाच तुकड्यात गुंतवून, दीर्घमुदती करता खरेदी केली जावी. समभाग सातत्याने १,२५० रुपयांच्या स्तरावर टिकल्यास समभागाचे प्रथम वरचे लक्ष्य १,३५० ते १,५०० व द्वितीय लक्ष्य १,८०० ते २,००० असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला ८०० रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा.

महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेले आहे.

उल्लेखनीय घटना: नोव्हेंबर महिन्यापासून मंदीप्रवण अशा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अथांग सागरात डुबकी मारून, सर्वतोमुखी, आघाडीच्या अशा प्रथम श्रेणीतील कंपन्या न निवडता, वेगळा मार्ग चोखाळत, पण या प्रक्रियेत गुणवत्तेशी, दर्जाशी कुठेही तडजोड न करता भविष्यातील उदयोन्मुख असे ‘शिंपल्यातील मोती’ निवडण्याची प्रक्रिया सुरू केली. ऑक्टोबरमध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल असंख्य किंतु-परंतु होते, पण आताच्या घडीला माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे मूल्यांकन हे आकर्षक होत असल्याने आता हे क्षेत्र गुंतवणूकयोग्य वाटत आहे. पण दरम्यानच्या चार, पाच महिन्यांतील या क्षेत्रातील नीचांक ते सुधारणेच्या संधीकाळातील प्रक्रियेत आपल्या मोत्यांनी मात्र उच्चांकाला गवसणी घातली. जसे की केपीआयटी टेक्नॉलॉजीचा १० जानेवारी २०२२ चा उच्चांक ८०१ रुपये होता ते सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी त्याने ८६२ चा नवीन उच्चांक नोंदवला. पर्सीस्टंट सिस्टिमचा ३ जानेवारी २०२२ चा उच्चांक ४,९८७ होता, तर ६ फेब्रुवारी २०२३ ला ४,९५० च्या समीप त्याची वाटचाल होती तर आर्थिक क्षेत्रातील आनंद राठी वेल्थचा १३ एप्रिल २०२२ चा उच्चांक ७२१ रुपये होता तो १ फेब्रुवारी २०२३ ला लीलया पार करत ८६२ रुपयांचा नवीन उच्चांक त्याने नोंदवला. हे सर्व बाजार गटांगळया खात असताना घडत होते. घडतंय ते नवलच!

निकालपूर्व विश्लेषण

१) बाटा इंडिया लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, १४ फेब्रुवारी

१० फेब्रुवारीचा बंद भाव – १,५२०.७० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,५५०रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,५५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,६०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,४५० रुपयांपर्यंत घसरण.

२)बायोकॉन लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, १४ फेब्रुवारी

१० फेब्रुवारीचा बंद भाव- २४२.३५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- २४५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २४५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २५५ रुपये, द्वितीय लक्ष्य २७० रुपये.

ब) निराशादायक निकाल: २४५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २२५ रुपयांपर्यंत घसरण.

३) सीमेन्स लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, १४ फेब्रुवारी

१० फेब्रुवारीचा बंद भाव – ३,१३०.७५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ३,०५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ३,०५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,३५० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,५०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ३,०५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,९५० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.